অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

कृषी अवजारांची निर्मिती

महाराष्ट्र राज्य कृषी उद्योग विकास महामंडळाद्वारे विवध कृषी यंत्रसामग्री व अवजारांची निर्मिती व विक्री केली जाते. कृषी अभियांत्रिकी कारखाना, चिंचवड, पुणे येथे 'कृषीउद्योग' या 'ब्रँड नेम'ने कृषी अवजारांची निर्मिती केली जाते.

उत्पादने

  • कृषीवेटर
  • ट्रॅक्टर, ट्रेलर व पॉवर टिलर
  • दुसऱ्या फेरीच्या मशागतीची अवजारे
  • नॅपसॅक स्प्रेअर
  • प्राथमिक मशागतीची अवजारे

 

कृषीवेटर
कृषीवेटर हे महामंडळाचे एक वैशिट्यपूर्ण असे कृषी अभियांत्रिकी उत्पादन आहे. कृषीवेटर हे रोटावेटरचे विकसित व सुधारित स्वरूप असून तांत्रिक वैशिष्ट्ये व उत्कृष्ट अभियांत्रिकी प्रमाणांच्या आधारे त्याची व्यावसायिक निर्मिती केली जाते.

उत्पादनासाठी लागणारे सुट्टे भाग, उत्पादित भाग व संपूर्ण निर्मित कृषीवेटरच्या गुणवत्ता तपासणीसाठी चिंचवड, पुणे येथील कृषी अभियांत्रिकी कारखान्यामध्ये सुसज्ज प्रयोगशाळा स्थापित करण्यात आली आहे. याद्वारे ग्राहकांना येथे उत्पादित करण्यात आलेल्या अवजारांच्या अवजारांची हमी दिली जाते. कृषीवेटर संपूर्ण देशभर उपलब्ध आहे. कृषीवेटरसाठी तीन प्रकारची ब्लेड्स (पाती) वापरली जातात व उपलब्ध ट्रॅक्‍टर व कामाच्या गरजेनुसार तीन वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये वेग नियंत्रित करता येतो.

कृषीवेटरची उपयुक्तता:

  • कृषीवेटरद्वारे पेरणीसाठी जमिनीची त्वरित मशागत करता येते. कृषीवेटरद्वारे नांगरणे, कुळवणे, ढेकळ फोडणे, सपाटीकरण (लेव्हलिंग) करणे अशी विवध कामे करता येणे सहज शक्य आहे.
  • कृषीवेटरद्वारे खोडक्यांचा बारीक भुगा केला जातो व तो पूर्णतः मातीमध्ये मिसळला जातो व त्याचेच पुढे सेंद्रिय खत तयार होते. यामुळे तण-नियंत्रण देखील होते.
  • अंतर मशागतीसाठी व भाताच्या चिखलणीसाठी (पडलिंग) उपयुक्त.
  • शेणखताच्या मिश्रणासाठी उपयुक्त.

तांत्रिक वैशिष्टये

  • उच्च एचपी ट्रॅक्टरसाठी संपूर्ण गेअर ड्राईव्ह ट्रान्समिशनवाले व कमी एचपी ट्रॅक्टरसाठी चेन ड्राईव्ह ट्रान्समिशनवाले कृषीवेटर उपलब्ध आहेत.
  • 'एल' टाईप, 'टाईन' टाईप व 'जे' टाईप दणकट रोटर (घुर्णी)
  • सर्व मॉडेल्सच्या ट्रॅक्टरना व पीटीओ स्पीडला चालेल असा टेलिस्कोपिक कार्डन शॅफ्ट.

फायदे

  • ३० ते ३५% खर्चाची बचत, ६० ते ६४% वेळेची बचत व १८ ते ३९% इंधनाची बचत.
  • कृषीवेटरचा योग्य वापर केल्यास दोन हंगामांमध्ये किंमत वसूल.
  • कमी वेळ व कमी खर्चिक कामामुळे मातीमधील आद्रता पुढील पिकासाठी उपयुक्त.
  • तांत्रिक प्राविण्य व सर्वोत्तम अभियांत्रिकी मूल्यांद्वारे निर्मित.
  • संपूर्ण भारतभर वितरण. काही मर्यादित ठिकाणी वितरण विनंती विचाराधीन.

ट्रॅक्टर, ट्रेलर व पॉवर टिलर

ट्रॅक्टर व पॉवर टिलरचे महामंडळाद्वारे वितरण केले जाते. महामंडळाद्वारे स्वतःच्या कृषी अवजारांचे उत्पादन व वितरण 'कृषीउद्योग' या 'ब्रँड नेम' खाली केले जाते.

विविध मॉडेल्स व एचपीचे (अश्वशक्ती) ट्रॅक्टर उपलब्ध:

  • हिंदुस्तान - २५, ३५, ४५, ५०, ६१, ८१ एचपी.
  • एचएमटी - २५, ३५, ४५, ४९, ५९, ७५ एचपी.
  • मिस्तुबिशी - एमटी १८० डी
  • महिंद्रा - २६५ डीआय, ३६५ डीआय.
  • एस्कोर्ट - ई ३३५ एमडीसी.
  • आयशर - २४१ एमसी, २४२ एमसी, २४३ एमसी, ३१२ एमसी, ३६४ एमसी, ३६९ एमसी.
  • टॅफे - २५ डीआय, ३० डीआय.
  • कॅप्टन मिनी ट्रॅक्टर - एफएच ७८५ डीआय, ११.८ एचपी.

ट्रॅक्टरसह ट्रेलर व पॉवर टिलरचे देखील वितरण केले जाते. ग्राहकांच्या मागणीनुसार १.५ मे.टन ते ८ मे.टन ट्रेलरचे वितरण केले जाते.

विविध मॉडेल्स व क्षमतेचे ट्रेलर उपलब्ध आहेत:

  • १.५ मे.टन दुचाकी (बिगर टिपिंग).
  • ३ मे.टन दुचाकी (टिपिंग / बिगर टिपिंग).
  • ४ मे.टन दुचाकी (टिपिंग / बिगर टिपिंग).
  • ६ मे.टन दुचाकी (टिपिंग / बिगर टिपिंग).
  • ६ मे.टन चार चाकी (टिपिंग / बिगर टिपिंग).

विविध मॉडेल्स व क्षमतेचे पॉवर टिलर उपलब्ध आहेत:

  • मिस्तुबिशी - १०, १२, १३.५ एचपी
  • कॅम्को - १२ एचपी
  • ग्रीव्हज - १२ एचपी

दुसऱ्या फेरीच्या मशागतीची अवजारे

  • थाळी असलेला कुळव
  • रेजर कम कुळव
  • वाफे तयार करण्यासाठी यंत्र (सारायंत्र)

नॅपसॅक स्प्रेअर

  • कीड-कीटक नियंत्रणासाठी पिकांवर कीटकनाशके फवारणी करण्यासाठी याचा वापर केला जातो.
  • दोन प्रकारांमध्ये उपलब्ध : १६ लिटर क्षमतेचे पितळ व प्लास्टिक स्प्रेअर.
  • पाठीचे दुखणे टाळण्यासाठी व आरामदायी वापरासाठी कुशनसह उपलब्ध.

पॉवर स्प्रेअर

  • पेट्रोलवर चालणारा - रॉकेलवर सुरु होणारा.
  • इंजिन संचलित स्प्रेअरपेक्षा वापरासाठी आरामदायी.
  • कीटकनाशक फवारणी व धुरळणीच्या वेळी जास्तीत जास्त पीक क्षेत्र व्यापते.
  • पिकं, फळबागा व भाजीपाल्यावर फवारणीसाठी उपयुक्त.
  • पाठीचे दुखणे टाळण्यासाठी व आरामदायी वापरासाठी कुशनसह उपलब्ध.

ट्रॅक्टरवर बसवलेला स्प्रेअर

  • आडवा सिंगल पिस्टन.
  • आडवा थ्री पिस्टन.

प्राथमिक मशागतीची अवजारे
पलटी नांगर

  • लांबी: ७१ इंच
  • उंची: ५० इंच
  • रुंदी: ४२ इंच
  • वजन: ३९० किलो
  • आकार: सिंगल, डबल व ४ बॉटम पलटी नांगर उपलब्ध
  • शक्ती स्त्रोत: ट्रॅक्टर संचालित (५०-५५ एचपी)

पोस्ट होल डीगर (छिद्र पडण्याचे यंत्र)

  • साधा नळीच्या आकाराचा पण दणकट सांगाडा.
  • ट्रॅक्टरच्या ३ पॉइंट जोडणीला जोडता येईल असे अवजार.
  • सर्व प्रकारच्या आणि मॉडेल्सच्या ट्रॅक्टरना उपयुक्त.
  • जलद, सुरक्षित व किफायतशीर कामकाज.
  • ट्रॅक्टरचा पीटीओ वेग: ५४० आरपीएम
  • तत्सम गिरमीटाचा वेग: १३० आरपीएम
  • छिद्राची कमाल खोली: ९० सेमी
  • खोदाई यंत्राचे वजन (गिरमीटाशिवाय): १६५ किलो
  • गिरमीट - ९" व्यास: १८ किलो
  • गिरमीट - १२" व्यास: ३० किलो
  • गिरमीट - १८" व्यास: ४२ किलो
  • गिरमीट - २४" व्यास: ६२ किलो
  • ट्रॅक्टर अश्वशक्ती आवश्यकता : ३५ एचपी आणि पुढे

 

स्त्रोत-   महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळ मर्या

अंतिम सुधारित : 1/12/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate