অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

ट्रॅक्‍टरची देखभाल वाढवते कार्यक्षमता

ट्रॅक्‍टरची देखभाल वाढवते कार्यक्षमता

ट्रॅक्‍टर शेतीमध्ये काम करीत असताना त्यांच्या विविध भागांची झीज होत असते. त्यामुळे ट्रॅक्‍टरची नियमित देखभाल केल्यास ट्रॅक्‍टरची काम करण्याची क्षमता व आयुष्य वाढते. त्यासाठी निरीक्षण, ॲडजस्टमेंट व दुरुस्ती या त्रिसूत्री लक्षात ठेवावी.
दररोजची देखभाल किंवा दर १० तासांनंतरची देखभाल 
1) ऑईल पंपामधील ऑइल लेव्हल चेक करणे. 
2) एअर क्‍लिनरमधील ऑइल चेक करणे. 
3) रॅडिएटरमधील पाण्याची लेव्हल चेक करणे. 
4) एअर क्‍लिनरचे प्रीक्‍लिनर साफ करणे. 
5) डिझेल टॅंकमधील डिझेलची पातळी चेक करणे. 
6) बॅटरीमधील इलेक्‍ट्रोलाइटची पातळी चेक करणे. 
7) टायरमधील हवा चेक करणे. 
8) फॅन बेल्टचा तणाव चेक करणे.

साप्ताहिक देखभाल किंवा दर ५० तासांनंतरची देखभाल

1) क्‍लच पँडल फ्री प्ले चेक करणे. 
2) सेडिमेंड बाऊल चेक करणे. 
3) फ्युएल फिल्टर बाऊल ड्रेन करणे. 
4) ट्रान्समिशन व हायड्रोलिक ऑइल चेक करणे. 
5) एअरक्‍लिनरचे ऑइल बदलणे. 
6) बॅटरी टर्मिनल्स चेक करणे. 
7) सर्व नट बोल्ट टाईट करणे. 
8) सर्व ग्रीस पॉइंटना ग्रीस करणे.

मासिक देखभाल किंवा दर १५० तासांनंतरची देखभाल

1) दर तासांनंतरची देखभाल पूर्ण करणे. 
2) रंजन ऑइल व ऑइल फिल्टर बदलणे. 
3) डायनॅमोमध्ये ते थेंब ऑइल टाकणे. 
4) बॅटरी टर्मिनल्सला पेट्रोलियम जेली लावणे.

त्रैमासिक देखभाल किंवा ३०० तासांनंतरची देखभाल

1) दर तासांनंतरची देखभाल पूर्ण करणे. 
2) स्टिअरिंग शाफ्ट एन्ड प्ले चेक करणे. 
3) (समोरील चाकाचे) टो-इन चेक करणे व ॲडजस्ट करणे. 
4) समोरच्या चाकाचे प्रीलोडिंग चेक करणे. 
5) टॅपेट क्‍लिअरन्स सेट करणे.

सहा महिन्यांनी देखभाल किंवा ६०० तासांनंतरची देखभाल

1) दर ३०० तासांनंतरची देखभाल पूर्ण करणे. 
2) प्रायमरी डिझेल फिल्टर इलिमेंट बदलणे. 
3) कुलिंग सिस्टिम फ्लश करणे. 
4) समोरचे टायर अदलाबदल करणे. 
5) इंजेक्‍शन प्रेशर चेक करणे. 
6) डिझेल टॅंक साफ करणे.

नऊ महिन्यांनी देखभाल किंवा ९०० तासांनंतरची देखभाल

1) दर तासांनंतरची देखभाल पूर्ण करणे. 
2) स्टिअरिंग गिअर बॉक्‍स ऑइल बदलणे. 
3) सेकंडरी डिझेल फिल्टर इलिमेंट बदलणे.

एक वर्षांनंतरची देखभाल किंवा १००० तासांनंतरची देखभाल

1) सर्व प्रकारचे ऑइल बदलणे जसे इंजिन ऑइल, गिअर बॉक्‍स, हायड्रोलिक, एअरक्‍लिनर आणि स्टिअरिंग इत्यादी. 
2) फ्युएल इंजेक्‍शन पंप चेक करणे. 
3) कॉम्प्रेशन प्रेशर चेक करणे. जर आवश्‍यक असेल तर इंजिन ओव्हरहॉलिंग करणे.
4) ब्रेक लायनिंग चेक करणे.

ट्रॅक विडथ ॲडजस्टमेंट

क्र. ---- ट्रॅक विडथ ---- बोल्ट ४’’ ---- रिम ८’’ ---- डिस्क १६’’ 
१ ---- ४८ ---- मध्ये ---- मध्ये ---- सरळ 
२ ---- ५२ ---- बाहेर ---- मध्ये ---- सरळ 
३ ---- ५६ ---- मध्ये ---- बाहेर ---- सरळ 
४ ---- ६० ---- बाहेर ---- बाहेर ---- सरळ 
५ ---- ६४ ---- मध्ये ---- मध्ये ---- उलटी 
६ ---- ६८ ---- बाहेर ---- मध्ये ---- उलटी 
७ ---- ७२ ---- मध्ये ---- बाहेर ---- उलटी 
८ ---- ७६ ---- बाहेर ---- बाहेर ---- उलटी 


संपर्क - प्रा. टी. बी. बास्टेवाड, ९४२३३४२९४१ 
(लेखक अ. भा. स. कृषी अवजारे व यंत्रे संशोधन प्रकल्प, डॉ. अण्णासाहेब शिंदे कृषी अभियांत्रिकी महाविद्यालय, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी येथे कार्यरत आहेत.) 
दूरध्वनी क्र. - ०२४२६-२४३२१९

स्त्रोत: अग्रोवन

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate