অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

बहुपयोगी पॉवर टिलर

 

पॉवर टिलरसोबत काम करीत असताना अंगावर सैल कपडे वापरू नयेत, तोंडावर व डोक्‍यावर चांगल्या कपड्याने गुंडाळून घ्यावे. पॉवर टिलरमुळे आंतरमशागतीची कामे वेळेत पूर्ण होतात. लहान शेतकऱ्यांसाठी पॉवर टिलर अत्यंत उपयुक्त आहे.

पॉवर टिलर विकत घेतल्यानंतर सोबत मिळणारी माहिती पुस्तिका काळजीपूर्वक वाचून सर्व भागांची व प्रणालींची माहिती करून घ्यावी. पॉवर टिलर शेतात वापरण्यापूर्वी मशिनचे काही भाग ढिले झाले असतील, तर ते घट्ट आवळावेत, तसेच झिजलेले, तुटलेले भाग बदलावेत. पॉवर टिलर चालविण्यापूर्वी सर्व शील्ड व गार्ड नीटपणे बसविल्याची खात्री करावी. शेतात वापरापूर्वी पॉवर टिलरच्या टाकीमध्ये इंधन भरावे, म्हणजेच इंजिन थंड असतानाच इंधन भरावे. पॉवर टिलर चालू करीत असताना डेप्थ रेग्युलेटर चालू अवस्थेत आहे, याची खात्री करूनच चालू करावा म्हणजे अपघात होणार नाही. पॉवर टिलरसोबत काम करीत असताना अंगावर सैल कपडे वापरू नयेत, तोंडावर व डोक्‍यावर चांगल्या कपड्याने गुंडाळून घ्यावे. पॉवर टिलर चालविताना फिरणाऱ्या भागांपासून हात व पाय यांचा बचाव करावा. विशेषतः रोटाव्हेटर जोडला असताना पाय रोटाव्हेटरच्या फिरणाऱ्या दात्यांमध्ये अडकणार नाहीत, याची दक्षता घ्यावी. जमीन ओली असेल, तर पॉवर टिलर चालवू नये. काम करीत असताना मध्येच अडथळा आल्यास पॉवर टिलर त्वरित बंद करावा. पॉवर टिलर चालू स्थितीत ठेवून सोडून जाऊ नये. पॉवर टिलर वळविताना किंवा वाहतूक करताना ट्रान्समिशनमुक्त करावे.

पॉवर टिलरचे व्यवस्थापन

अ) इंजिन व एअर क्‍लिनरमधील तेलाची पातळी तपासावी, ती कमी असल्यास बरोबर करून घ्यावी. 
ब) इंजिन फाउंडेशन व चॅसिस नट-बोल्ट घट्ट बसवावेत. तसेच चाकाचे व दातांचे नट बोल्ट ढिले झाले असल्यास ते घट्ट बसवावेत. 
क) चाकामधील हवेचा दाब तपासावा. प्रामाणिक दाबा इतकी चाकामध्ये हवा भरावी. 
ड) पॉवर लिटरच्या व्ही बेल्टचा ताण तपासून घ्यावा. बेल्टच्या मध्यभागी दाबल्यानंतर 12 मि.मी. पेक्षा जास्त दाबला जाणार नाही, अशा प्रकारे बेल्ट घट्ट करावा. 
इ) गिअर बॉक्‍स, रोटरी चेनमधील तेलाची पातळी तपासावी, तसेच नियमितपणे शिफारशीनुसार ऑइल फिल्टर, डिझेल फिल्टर आणि इंजिन ऑइल बदलावे. 
ई) इंजिनमध्ये थंडीच्या दिवसांत एस.ए.ई. 30 व उन्हाळ्यात एस.ए.ई. 40 प्रतीचे वंगण तेल वापरावे. 
ए) गिअर बॉक्‍समध्ये एस.ए.ई. 90 प्रतीचे तेल वापरावे. हे तेल 150 तासांनंतर बदलावे. 
ऐ) वेळोवेळी क्‍लच-शाफ्ट, क्‍लच रॉड, टेलव्हिल बुश, ऍक्‍सिलेटर केबल यांना तेल द्यावे. 
ओ) रोटाव्हेटर शाफ्टच्या ग्रीस कपमधील ग्रीस दर 25 तासांच्या कामानंतर बदलावा.

उपयोग पॉवर टिलरचा...

1) पॉवर टिलरला रोटाव्हेटर जोडून जमीन भुसभुशीत करण्याचे काम करता येते. एकाचवेळी नांगरणी आणि ढेकळे फोडणे ही दोन्ही कामे होतात, त्यामुळे ढेकळे फोडण्यासाठी जमिनीला स्वतंत्रपणे कुळवाच्या पाळ्या घालण्याची आवश्‍यकता राहत नाही. फळबागांमध्ये आंतरमशागत करतेवेळी दहा ते 15 सें.मी. खोलीपर्यंत तण समूळ काढले जाते. 95 टक्के क्षेत्रातील तणनिर्मूलन करता येते; तसेच फळझाडांच्या खालून व्यवस्थितपणे काम करता येत असल्याने झाडांच्या फांद्या मोडत नाहीत. 
2) फळझाडाभोवती रोटाव्हेटरला पॉवर टिलर उलट्या दिशेने चालवून आळे तयार करण्यासाठी कमी कष्टात, कमी खर्चात व कमी वेळेत वापर करता येतो. भातशेतीमध्ये रोटाव्हेटरच्या साह्याने चिखलणीचे काम सुलभरीत्या व प्रभावीपणे करता येते. 
3) पॉवर टिलरचलित बहुपीक टोकण यंत्राचा वापर करून भुईमूग, सूर्यफूल, करडई, सोयाबीन, मका, तूर, हरभरा, ज्वारी, गहू इत्यादी पिकांची टोकण करता येते. 
4) वनशेतीमध्ये झाडे लावण्यासाठी तसेच फळझाडांच्या लावणीसाठी खड्डे घेण्याचे काम पॉवर टिलरने करता येते. हे खड्डे खोदण्याचे यंत्र पॉवर टिलरच्या पुढील बाजूस जोडता येते. या यंत्राद्वारे 30 सें.मी. व्यासाचे व 45 सें.मी. खोलीचे खड्डे खोदता येतात. 
5) ट्रॅक्‍टरप्रमाणे पॉवर टिलरला ट्रॉली जोडून शेतीमालाची वाहतूक करता येते. 
6) पॉवर टिलरच्या मागील बाजूस जोडून भात मळणीयंत्र वापरता येते. हे मळणीयंत्र हवे त्या ठिकाणी नेण्यासाठी यंत्रास दोन रबरी चाके लावलेली असतात.
7) फळबागांमध्ये, तसेच वनशेतीमध्ये आंतरमशागतीसाठी पाच दातांचा कल्टिव्हेटर उपलब्ध आहे. कल्टिव्हेटरच्या साह्याने 15 सें.मी. खोलीपर्यंत मशागतीची खोली कमी-जास्त करता येते. एका दिवसात 1 ते 1.25 हेक्‍टर क्षेत्रावर आंतरमशागत शक्‍य होते. 
8) पाणी उपसण्याचा पंप, कडबा कटर, पिठाची गिरणी, गवत कापण्याचे यंत्र, जनरेटर इ. वापरता पॉवर टिलरच्या साहाय्याने करता येतो.

माहिती संदर्भ : अॅग्रोवन

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate