অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

बेदाणे प्रतवारीसाठी यंत्रे ठरतात फायदेशीर

बेदाणे प्रतवारीसाठी यंत्रे ठरतात फायदेशीर

अलीकडच्या काळात बेदाणे निर्मितीमध्ये बदल झाला आहे. मळणी यंत्र, फोल काढायचे यंत्र, सॉर्टर यंत्रामुळे बेदाणा प्रतवारी आणि गुणवत्तावाढीमध्ये सुलभता आली आहे. मजूर टंचाईमुळे यंत्राचा वापर वाढतो आहे.

हायजेनिंग पॅकिंग यंत्र

बेदाणा निर्मितीमध्ये अत्यंत सुलभता आणणारे हे यंत्र आहे. सर्व प्रक्रिया एकाच यंत्राद्वारे केल्या जातात. हे यंत्र सध्याच्या बेदाणा निर्मितीच्या प्रक्रियेतील आधुनिक यंत्र आहे. वाळलेला बेदाणा या यंत्रात टाकल्यानंतर तो स्वच्छ धुतला जातो. त्यातील कचरा बाजूला काढला जातो. सर्व प्रक्रिया संगणीकृत आहे. याची किंमत सुमारे अडीच कोटी रुपये इतकी आहे. सर्व प्रक्रिया यंत्राद्वारे होत असल्याने तयार होणारा बेदाणा अतिशय उत्कृष्ट प्रतिचा तयार होतो. ही यंत्रे प्रामुख्याने परदेशी बनावटीची आहेत. यंत्रांची किंमत जास्त असली तरी बेदाण्याच्या दर्जासाठी याचा वापर फायदेशीर ठरतो. मनुष्यबळाच्या खर्चात बचत हे या यंत्राचे मुख्य वैशिष्ट्य आहे.

काडी, कचरा स्वच्छ करणारे यंत्र

आपण ज्या प्रमाणे इतर धान्यांची मळणी यंत्राद्वारे करतो, हीच पद्धत बेदाण्यासाठी वापरली जाते. बेदाणा वाळल्यानंतर बेदाणा या यंत्रामध्ये टाकला जातो. या यंत्रामुळे बेदाण्याचे देठ, काडी, कचरा बाजूला होऊन बेदाणा एका बाजूला काढला जातो. देठ-काड्या स्वतंत्रपणे वेगळ्या होतात. सॉर्टर यंत्र ः रंगानुसार बेदाणा वेगळा करण्यासाठी सॉर्टरचा वापर केला जातो.

 

स्त्रोत: अग्रोवन

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate