অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

मशागतीसाठी कोणती अवजारे वापरावीत..


स्वयंचलित टूलबार

हे यंत्र 6.5 एच. पी. पेट्रोल इंजिनवर चालते. याला समोरील बाजूस विविध यंत्रे जोडण्याची व्यवस्था केलेली आहे. यंत्राला दोन टेन्शन क्‍लच दिले आहेत. एका टेन्शन क्‍लचच्या मदतीने इंजिनची शक्ती चाकांना, तसेच दुसऱ्या क्‍लचच्या साह्याने पुढील भागात जोडलेल्या अवजारास चालण्याकरिता गती दिली जाते. या यंत्राच्या उपयोगाने विविध जोडणी अवजारे वापरून पेरणी, डवरणी, फवारणी, कापणी करता येते. या यंत्राला विविध उपयंत्रे जोडता येतात.

स्वयंचलित टिलर

शेतीची आंतरमशागत करण्याकरिता, दोन ओळींमधील ओल असताना तण काढण्याकरिता व भातशेतात चिखलणी करण्याकरिता या यंत्राचा उपयोग होतो. हे यंत्र स्वयंचलित टूलबारला जोडले जाते. या यंत्राला असणारी "जे' आकाराची सोळा पाती एका आसावर फिरविली जातात. या यंत्राने साधारणतः 10 ते 12 सें. मी. खोलीपर्यंत मशागत केली जाते. या यंत्राची क्षेत्रक्षमता 0.09 हेक्‍टर प्रतितास आहे.

स्वयंचलित डवरणी - कोळपणी अवजार

स्वयंचलित टूलबारवर चालणाऱ्या डवरणी, कोळपणी यंत्राच्या साह्याने विविध अंतरांवरील दोन ओळींतून डवरणी, कोळपणी, लगेच उगवणीच्या दुसऱ्या दिवसापासूनसुद्धा सुलभतेने करता येते. या जोडणी अवजाराला दोन फुल व दोन हाफ स्विप तसेच फोरबार लिंकेजच्या विशिष्ट प्रकारच्या फ्रेमवर मांडणी केली आहे. यामुळे आवश्‍यकतेप्रमाणे दिलेल्या खोलीनुसार कोळपणी करता येते. फुल व हाफ स्विपच्या विशिष्ट रचनेमुळे पीक लहान असताना माती पडून झाकले जात नाही. पात्याची रचना बदलली असता, पिकांना मातीची भर देता येते. तंत्रशुद्ध रचनेमुळे स्विपला तण चिकटत नाही, त्यामुळे एकसारख्या खोलीवर डवरणी केली जाते.
संपर्क - 0724 - 2258200, विस्तार क्र. 1037 
कृषी शक्ती व अवजारे विभाग, 
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला

स्त्रोत: अग्रोवन

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate