অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

कीटकनाशके वापरतांना काळजी

शेतकर्यांनी कीटकनाशके खरेदी करतांना आणि वापरतांना घ्यावयाची सुरक्षाविषयक काळजी

खरेदी करतांना

हे करा

हे करु नका

कायदेशीर परवाना असणार्‍या नोंदणीकृत कीटकनाशक डीलरकडूनच कीटकनाशके/जैवकीटकनाशके खरेदी करा.

पदपथावरील/रस्त्याच्या कडेला बसणार्‍या किंवा कायदेशीर परवाना नसणार्‍या व्यक्तीकडून कीटकनाशके खरेदी करु नका.

दिलेल्या भागात वापरण्यासाठी एक वेळ पुरेल एवढेच कीटकनाशक खरेदी करा.

संपूर्ण हंगामासाठी मोठ्या प्रमाणात कीटकनाशक खरेदी करू नका.

कीटकनाशकांच्या पॅकवर/डब्यांवर मान्यतेची लेबल्स नीट पाहून घ्या.

मान्यतेची लेबल्स नसलेली कीटकनाशके खरेदी करू नका.

आवरणावरील बॅच नं., नोंदणी क्रमांक, उत्पादनाची तारीख/अंतिम मुदत इत्‍यादि बाबी तपासा.

अंतिम मुदत संपलेली कीटकनाशके कधीही खरेदी करू नका.

डब्यांत व्यवस्थित पॅक केलेलीच कीटकनाशके खरेदी करा.

ज्या डब्यांतून/पॅकमधून गळती होत असेल, डब्याचे/पॅकचे आवरण सैल झाले असेल किंवा सीलबंद नसेल तर अशी कीटकनाशके खरेदी करू नका.

साठवणीच्या वेळी

हे करा

हे करु नका

  • कीटकनाशके घराच्या आवारापासून दूर साठवा.
  • कीटकनाशके त्यांच्या मूळच्‍या डब्यांतच साठवून ठेवा.
  • कीटकनाशके आणि तणनाशके वेगवेगळी साठवून ठेवा.
  • जेथे कीटकनाशके साठवली असतील तिथे धोक्याची इशारा निर्देश लावून ठेवा.
  • कीटकनाशके लहान मुले आणि इतर पाळीव प्राणी यांच्यापासून दूर साठवून ठेवावीत.
  • साठवणीची जागा थेट ऊन आणि पाऊस यांपासून सुरक्षित असावी.
  • कीटकनाशके घराच्‍या परिसरांत साठवू नका.
  • कीटकनाशके त्यांच्या मूळच्‍या डब्यांखेरीज इतरत्र साठवून ठेऊ नका.
  • कीटकनाशके आणि तणनाशके एकत्र साठवू नका.
  • लहान मुलांना साठवणीच्या खोलीत जाऊ देऊ नका.
  • कीटकनाशके थेट ऊन किंवा पावसात ठेवू नका.

वापरतांना

हे करा

हे करु नका

  • परिवहनाच्‍या दरम्यान कीटकनाशके वेगळी ठेवा.
  • कीटकनाशके आणि खाद्यपदार्थ कधीही एकत्र ठेवू नका/ने आण करू नका.
  • मोठ्या प्रमाणात असणारी कीटकनाशके अत्यंत सांभाळून वापरण्याच्या जागी न्यावीत.
  • मोठ्या प्रमाणात असणारी कीटकनाशके कधीही डोक्यावरुन, खांद्यावरुन किंवा पाठीवरुन वाहून नेऊ नका.

फवारणीसाठी द्रावण तयार करतांना

हे करा

हे करु नका

  • नेहमी स्वच्छ पाणी वापरा.
  • संरक्षक कपडे वापरा. उदा. हातमोजे, चेहर्‍याचा मास्क, टोपी, ऍप्रन, पूर्ण विजार, इ. जेणेकरुन पूर्ण शरीर झाकले जाईल.
  • नाक, डोळे, कान, हात यांना कीटकनाशकाचा स्पर्श होणार नाही याची काळजी घ्या.
  • कीटकनाशकाच्या डब्यावर लिहिलेले निर्देश वापरण्यापूर्वी काळजीपूर्वक वाचा.
  • गरजेपुरतेच द्रावण तयार करा.
  • पूड स्वरूपात असणारी कीटकनाशके ही अशीच वापरावीत.
  • फवारणीची टाकी भरतांना कीटकनाशक आजूबाजूला सांडणार नाही याची दक्षता घ्या.
  • दिलेल्या प्रमाणातच कीटकनाशके वापरा.
  • तुमच्या जीवाला धोका निर्माण होईल अशी कोणतीही कृती करू नका.
  • गढूळ किंवा घाण पाणी वापरू नका.
  • संरक्षक कपडे वापरल्याशिवाय कधीही फवारणी द्रावण तयार करू नका.
  • शरीराच्या कोणत्याही भागावर कीटकनाशक पडणार नाही याची काळजी घ्या.
  • निर्देश न वाचता कधीही कीटकनाशक वापरू नका.
  • तयार केलेले द्रावण 24 तासांनंतर कधीही वापरू नका.
  • पूड कधीही पाण्यात मिसळू नका.
  • फवारणीच्या टाकीचा कधीही वास घेऊ नका.
  • जास्त प्रमाणात कीटकनाशके वापरू नका, त्यामुळे पिकांना आनि पर्यावरणाला धोका निर्माण होतो.
  • कीटकनाशकांचे काम पूर्ण होइपर्यंत काही ही खाऊपिऊ नका तसेच धूम्रपान करू नका किंवा काही ही चघळू नका.

उपकरणांची निवड करणे

हे करा

हे करु नका

  • योग्य प्रकारची साधने निवडा.
  • योग्य आकाराच्याच नोझल वापरा.
  • कीटकनाशके आणि तणनाशकांसाठी वेगवेगळी फवारणी यंत्रे वापरा.

  • गळणारी किंवा दोष असणारी साधने वापरू नका.
  • दोष असणार्‍या/मान्यता नसणार्‍या नोझल वापरू नका. चोंदलेली नोझल्स तोंडाने साफ करू नका. त्याऐवजी फवारणी यंत्राबरोबर असणारे टूथब्रश वापरा.
  • कधी ही कीटकनाशके आणि तणनाशकांसाठी एकच फवारणी यंत्र वापरू नका.

फवारणी द्रावण फवारतांना

हे करा

हे करु नका

  • सांगितलेले प्रमाण आणि द्रावण वापरा.
  • शांत आणि थंड दिवशी फवारणी करा.
  • साधारणतः व्यवस्थित उजेड असलेल्‍या दिवशी फवारणी करा.
  • प्रत्येक फवारणीसाठी आवश्यक ते फवारणी यंत्र वापरा.
  • फवारणी वार्‍याच्या दिशेने करावी.
  • फवारणी झाल्यानंतर उपकरणे आणि बादल्या स्वच्छ पाणी आणि साबण वापरुन धुवावीत.
  • फवारणी झाल्यानंतर लगेचच कोणाही पाळीव प्राण्याला/व्यक्तीला शेतात जाऊ देऊ नये.

  • कधी ही सांगितलेल्‍या प्रमाणापेक्षा जास्‍त आणि उच्‍च तीव्रता असलेले कीटकनाशक वापरू नका.
  • उष्ण आणि भरपूर वारा असलेल्‍या दिवशी फवारणी करु नका.
  • पावसाच्या अगदी आधी किंवा लगेचच नंतर फवारणी करू नका.
  • इमल्सिफायेबल कॉन्सेन्ट्रेड द्रावणे बॅटरीवर चालणार्‍या
  • ULV फवारणी यंत्रामध्ये वापरू नका.
  • वार्‍याच्या विरुद्ध दिशेने फवारणी करू नका.
  • कीटकनाशके मिसळण्यासाठी वापरलेले डबे, बादल्या व्यवस्थित धुतल्यानंतर ही कधी ही घरगुती वापरासाठी घेऊ नयेत.
  • संरक्षक कपडे घातल्याशिवाय नुकतीच फवारणी केलेल्या शेतात कधीही जाऊ नये.

फवारणीनंतर

हे करा

हे करु नका

  • राहिलेल्या द्रावणाची सुरक्षित ठिकाणी (उदा. पडीक/ निर्मनुष्य क्षेत्र) विल्हेवाट लावा.
  • वापरलेले/रिकामे डबे दगड/काठीच्या साह्याने चेपा आणि त्यांना दूर निर्मनुष्य ठिकाणी, आजुबाजूला पाण्याचा स्त्रोत नसलेल्‍या ठिकाणी खोल मातीमध्ये पुरुन टाका.
  • खाण्यापिण्यापूर्वी/धूम्रपान करण्यापूर्वी हातपाय व तोंड पाणी व साबणाने स्वच्छ धुवा.
  • विषबाधा झाल्याची लक्षणे दिसू लागल्यास प्रथमोपचार करा आणि रुग्णाला त्वरित डॉक्टरांकडे घेऊन जा. डॉक्टरांना रिकामा डबादेखील दाखवा.
  • राहिलेले द्रावण पाण्याच्या स्त्रोतांमध्ये किंवा त्यांच्या जवळ फेकून देऊ नका.
  • वापरलेले/रिकामे डबे इतर वस्तू साठवण्यासाठी वापरात आणू नका.
  • आंघोळ न करता किंवा कपडे न धुता काही ही खाऊपिऊ/धूम्रपान करू नका.
  • विषबाधा झाल्याची लक्षणे आढळल्यास डॉक्टरांकडे जाणे टाळू नका कारण त्यामुळे रुग्णाच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो.

स्त्रोत: www.ppqs.gov.in

अंतिम सुधारित : 12/20/2019



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate