অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

पोल्ट्री खत - भूमिगत पद्धती

पोल्ट्री खत देण्यासाठी भूमिगत पद्धती फायदेशीर शेतातील दुर्गंधी, खताचा अपव्यय टाळणे शक्य

सरळ जमिनीखाली पोल्ट्री खत देण्यासाठी सबसरफेस लिटर ॲप्लिकेशन उपकरणाचा वापर अमेरिकी कृषी संशोधन संस्थेच्या संशोधकांनी केला आहे. या पद्धतीचे प्रयोग मका पिकामध्ये मोठ्या क्षेत्रावर घेण्यात आले आहेत. त्यामुळे हवा व पाण्याच्या स्रोताचे प्रदूषण रोखण्यासोबतच पिकांसाठी पोल्ट्री खतातील पोषक घटक अधिक कार्यक्षमपणे उपलब्ध होत असल्याचे दिसून आले आहे.

अनेक वेळा शेतकरी रासायनिक खतांना पर्याय म्हणून पोल्ट्री खताचा वापर करतात. त्यातून पिके आणि मातीसाठी योग्य ते पोषक घटक उपलब्ध होतात. मात्र, शेतामध्ये पोस्ट्री खताचा वापर केल्यानंतर त्याच्या दुर्गंधीमुळे शेतामध्ये काम करणे अवघड होते. त्यामुळे पोल्ट्री खत देण्यासाठी सबसरफेस लिटर ॲप्लिकेशन प्रणालीचा वापर करण्यासाठी संशोधकांनी अधिक प्रमाणात पोल्ट्री खताची उपलब्धता असलेल्या डावियस प्रांताची निवड केली होती. केन्टूकी विद्यापीठातील मृदा व विस्तार संशोधक इडविन रिट्चे यांनी सांगितले, की जमिनीसाठी पोल्ट्री खत हे अत्यंत उपयोगी असे खत आहे. त्यातून पिकांना योग्य ती मूलद्रव्ये उपलब्ध होतात. मात्र, जमिनीवर पोल्ट्री खताच्या वापरामुळे पर्यावरण प्रदूषित होते. त्यामुळे सरळ जमिनीमध्ये वाळलेले पोल्ट्री खत देण्यासाठी सबसरफेस लिटर ॲप्लिकेशन उपकरणाचा वापर करण्यात आला.

सबसरफेस लिटर ॲप्लिकेशन उपकरणाच्या निर्मितीसाठी संशोधक करामात सिस्टानी हे आपल्या विद्यार्थ्यांसोबत गेल्या १० ते १२ वर्षांपासून संशोधन करीत आहेत. त्या विषयी माहिती देताना सिस्टानी म्हणाले की, या आधी पोल्ट्री खताचा सरळ जमिनीखाली वापर करण्याचे प्रयोग गवते आणि कपाशी पिकासाठी करण्यात आला आहेत. या वेळी प्रथमच मका पिकासाठी मोठ्या प्रमाणात याचा वापर केला आहे.

असे होतात या पद्धतीचे फायदे


अमेरिकेमध्ये मक्याचे उत्पादन धान्य आणि बायोमास असे दोहोसाठी घेतले जाते. त्यामध्ये मक्याच्या वाढीच्या पाचव्या अवस्थेमध्ये सबसरफेस प्रणालीद्वारे पोल्ट्री खतांचा वापर केला असता बायोमासचे अधिक उत्पादन मिळण्यास मदत होते.
- या तंत्रज्ञानामुळे पाण्याचे प्रदूषण रोखणे शक्य होते. हवेमध्ये अमोनियाचे उत्सर्जन होण्याच्या प्रमाणात ९० ते ९५ टक्के घट झाली. खतातील सर्व पोषक घटक मातीमध्ये राहून अपधावेसोबत वाहून जाणे रोखले गेले.
- तसेच शेतामध्ये सम प्रमाणामध्ये खत पोचवणे शक्य होते. त्यामुळे एकूण खताच्या प्रमाणात बचत होते.

 

---------------------------------------------------------------------------------------------------

स्त्रोत: अग्रोवन-

 

अंतिम सुधारित : 4/26/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate