অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

बायोगॅस स्लरी - सेंद्रिय खत

बायोगॅस स्लरी - उत्तम सेंद्रिय खत

बायोगॅसपासून मिळणारे खत हे द्रवरूप आणि घनरूपात (वाळवून) अशा दोन प्रकारे वापरता येते. सदरच्या खतामुळे जमिनीची सुपिकता वाढविण्यास मदत होते. पिकांच्या उत्पादनातही वाढ होते. कंपोष्ट खतामधून मिळणारी अन्नद्रव्ये आणि बायोगॅस खतामधून मिळणारे अन्नद्रव्ये यांचा तपशील चौकटीत पाहिल्यास हे आपल्या लगेच लक्षात येईल.

द्रवरूपातील स्लरी खत

द्रवरूपातील स्लरी खत शेतात वापरणे जास्त फायदेशीर आहे. द्रव खतात वेगवेगळी खनिजे असतात. स्लरीरूपात खत शेतात वापरल्यास खत शेतामध्ये मुरून पिकास उपयुक्त ठरते. गोबरगॅस व लाभार्थीचे शेत यामधील अंतर जास्त असल्यास किंवा वाहतूक करण्यास अडचण असल्यास द्रवरूपातील खत शेतामध्ये नेणे अडचणीचे होईल. अशावेळी गॅसप्लॅंटजवळ खत साठविण्यासाठी खड्डा तयार करावा लागेल. खत साठविण्यासाठी आऊटलेटला लागून (रेचक कुंडी) दोन खड्डे करावे लागतील. एक खड्डा भरल्यानंतर दुसऱ्या खड्ड्यात स्लरी सोडावी. खत वाळल्यानंतर ते हंगामानुसार शेतात वापरावे. तीन घनमीटर क्षमतेच्या बायोगॅसपासून अंदाजे दीड एकर क्षेत्रासाठी खत उपलब्ध होऊ शकते.
विजय आजगेकर
संपर्क : 9421472229 
(लेखक जिल्हा परिषद, कोल्हापूर येथे कृषी अधिकारी (बायोगॅस) आहेत.)

 

अंतिम सुधारित : 4/29/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate