অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

गांडूळखत

गांडूळखत

निरूपयोगी वस्तू म्हणजे विखुरलेली संसाधने आहेत. शेतीच्या विकामांमधून जैविक पदार्थांचा एक मोठा भाग निर्माण होतो, डेअरी फार्मचे टाकाऊ पदार्थ आणि जनावरांची विष्ठा जी बहुतेक एका कोप-यात फेकल्यासारखी नासत असतात, त्यांना घाण वास येत असतो. हे मूल्यवान साधन योग्य प्रकारे कंपोस्टिंग करून त्याचे खत बनविले जावू शकते. मुख्य उद्देश जैविक कच-याला कंपोस्ट करून चांगल्या गुणवत्तेचे खत तयार केले जावू शकते ज्या योगे आपल्या ‘’पोषक/जैविक पदार्थाच्या भुकेल्या’’जमिनीचे पोट भरेल.

गांडुळाच्या विविध स्थानीय जातींचा वापर करून खत तयार करणे

जगामध्ये गांडुळांच्या सुमारे दोन हजार पाचशे जाती सापडतात त्यातल्या पांचशेपेक्षा जास्त भारतामध्ये आहेत. गांडुळांच्या जातीतील विविधता जमीनीवर अवलंबून आहे. त्यामुळे योग्य प्रकारच्या खतासाठी योग्य ती जात घ्यावी. वर्मीकंपोस्टिंग करण्यामधील हे एक महत्वाचे पावूल आहे. कोठूनही गांडुळांची आयात करायची गरज नाही. भारतात वापरल्या जात असलेल्या स्थानीय जाती आहेत; पेरियॉनिक्स एक्सकेव्हेटस आणि लॅपिटो माउरिती. यांचे कंपोस्ट कोठेही तयार होवू शकते जसे खड्डयात, क्रेटमध्ये, सिमेंटच्या टाकीमध्ये, किंवा कंटेनरमध्ये.

स्थानीय गांडुळे कशी गोळा करावीत

गांडुळांचे वास्तव्य असलेली जमीन ओळखून काढा. 500 ग्राम गूळ आणि 500 ग्राम ताजे शेण 2 लीटर पाण्यात मिसळा आणि 1 गुणिले 1 च्या क्षेत्रात जमिनीच्या पृष्ठभागावर शिंपडा. वाळलेले गवत आणि जुना गोणपाट यांनी झाका. 20 ते 30 दिवस पाणी शिंपडत राहा. एपिजिक आणि ऍनिसिक स्थानीय गांडुळांचे मिश्रण एका जागी तयार होईल आणि हे एकत्र करून वापरू शकता.

कंपोस्ट खड्ड्याची तयारी

कोणत्याही सोयिस्कर आकाराची कंपोस्ट पिट परसदारी किवा अंगणात तयार करता येते. सिंगल पिट असो, दोन असोत किंवा कोणत्याही आकाराची टाकी योग्य पाणीपुरवठा करण्यासाठी असावी. पिटचा किंवा कप्प्याचा सर्वांत योग्य व सोयिस्कर आकार 2 मी. X 1 मी. X 0.75 मी. आहे आणि तो बायोमास व शेतीचा कचरा यांच्या आकारावर अवलंबून आहे. मुंग्यांपासून संरक्षणासाठी, वर्मीपिटच्या मध्यभागी पाण्याचा एक कप्पा असणे फार गरजेचे आहे.

चार कप्पे असलेली टाकी/पिट सिस्टम

फोर चेंबर किंवा फोर टँक पध्दतीच्या पिटची बांधणी गांडुळांच्या सोयिस्कर व निरंतर हालचालींसाठी असते ज्या योगे ती एका कप्प्यातून फिरत कंपोस्ट पदार्थासकट दुस-या आधीच संरक्षित केलेल्या कच-यामध्ये पोचतात.

वर्मीबेडची तयारी

वर्मीबेड (वर्मी म्हणजे गांडुळे आणि बेड म्हणजे गादी) सर्वांत खाली ओलसर, मउ मातीचा थर, सुमारे 15 ते 20 सेमी. जाडीच्या तुटक्या विटा आणि जाडसर वाळू यांचे थर देणे. चिखलाच्या मातीत गांडुळे चांगली राहतात, ते त्यांचे घर असते. 15-20 सेमी. जाडीचा बेड असलेल्या, 2 मी. X 1 मी. X 0.75 मी.च्या कंपोस्ट पिटमध्ये 150 गांडुळे राहतात, त्यांच्या वर्मीबेडची जाडी 15-20 सेंमी. असते. जनावारांचे मूठभर शेण सहज वर्मीबेडवर पसरावे. नंतर कंपोस्ट पिटमध्ये वाळलेली पाने किंवा चिरलेला वाळलेल्या गवताचा 5 सेंमी. जाडीचा थर पसरावा. गवताच्या जागी शेतातील कचरा किंवा बायोमास कचरा पण चालतो. बेड कोरडा किंवा ओलसर नसायला हवा. मग तो खड्डा नारळाच्या पानांनी किंवा जुन्या गोणपाटाने पक्ष्यांपासून वाचविण्यासाठी झाकून ठेवावा. बेडवर प्लॅस्टिक शीट कधीही वापरू नये कारण त्या गरम होतात. पहिल्या 30 दिवसांनंतर, जनावरांचे ओले जैविक शेण आणि/किंवा स्वयंपाकघर किंवा हॉटेल किंवा होस्टेलमधून पाला-पानांचा कचरा 5 सेंमी. जाडीच्या थरात टाकावा. असे आठवड्यातून दोनदा करावे. हे जैविक मिश्रण एखाद्या कुदळीने किंवा खुरप्याने वेळोवेळी मिसळत राहावे. पिटमध्ये ओलावा ठेवण्यासाठी नियमितपणे पाणी द्यावे. जर हवामान कोरडे असेल तर थोड्या वेळाच्या अंतराने पाणी घालावे.

कंपोस्ट केव्हा तयार होते

कंपोस्टचा रंग करडा झाला किंवा ते सैलसर झाले म्हणजे तयार होते. ते काळे, ग्रेन्यूलर (चहाच्या भुकटीसारखे), हलके आणि आर्द्रतायुक्त असेल. 60-90 दिवसांत (पिटच्या आकाराप्रमाणे) कंपोस्ट तयार व्हायला हवे ज्याचा संकेत गांडुळांच्या कास्टिंगने (वर्मीकंपोस्ट) मिळतो जे बेडवर असतात. आता हे वर्मीकंपोस्ट पिटमधून शेतात टाकायला हरकत नाही. कंपोस्टमधून गांडुळांना बाहेर काढण्यासाठी, बेड रिकामे करण्याच्या 2-3 दिवस आधीपासून पाणी घालणे बंद करा. यामुळे 80 टक्केहून जास्त गांडुळे खाली जावून बसतील. हे किडे बाहेर काढण्यासाठी गाळणी देखील वापरू शकता आणि याप्रकारे गांडुळे आणि घन पदार्थ वेगळे निघाले की मग त्यांना परत पिटमध्ये टाकावे म्हणजे पुन्हा प्रक्रिया सुरू होईल. कंपोस्टचा वास मातीसारखा असतो. घाण वास असल्यास जिवाणूंची प्रक्रिया अजून चालू आहे असे कळते. दमट वास आल्यास उष्णतेमुळे नायट्रोजन तत्वे कमी होत आहेत हे समजते. असे झाल्यास, पुन्हां सुरूवात करा किंवा ढीग वा-यावर ठेवा. त्यात अजून चोथा घाला आणि ढीग कोरडा ठेवा. पॅक करण्यापूर्वी कंपोस्ट गाळून घ्यावे. ही पैदास उन्हात ठेवावी ज्यामुळे गांडुळे ढीगाच्या खाली जावून बसतील. दोन किंवा चार पिट सिस्टममध्ये, पहिल्या चेंबरमध्ये पाणी घालणे थांबवा म्हणजे किडे एका कप्प्यातून दुसयात जेथे त्यांच्या साठी योग्य वातावरण आहे अशा जागी जातील. पैदास चक्री पध्दतीने घ्या.

वर्मी कंपोस्टचे फायदे

जैविक कचरा गांडुळे लवकर मऊ करतात, ज्‍यायोगे एक स्थिर, चांगला दिसणारा पदार्थ, ज्‍याचे संभाव्य मूल्‍य खूप जास्‍त आहे आणि जमीनसुध्‍दा शेतीसाठी तयार होते असा पदार्थ तयार होतो. वर्मी कंपोस्‍ट हे खनिजांचा समतोलपणा, पोषक तत्‍वांचा पुरवठा करणारे असते आणि यामुळे जमिनीला पुष्‍कळ प्रकारचे पोषण एकाच वेळी उपलब्‍ध होते. वर्मीकंपोस्‍टमुळे विषाणूंच्या संख्या कमी होते. वर्मीकंपोस्टिंग, त्‍यांचेच अवशेष फेकून दिल्‍यानंतर येणा-या पर्यावरणीय समस्‍या कमी करतात. वर्मीकपोस्टिंग हे आर्थिक पातळीवर खाली असणा-या लोकांसाठी शेतीचे आणि मिळकतीचे एक पूरक साधन आहे हे जाणून घेण्‍याची गरज आहे. जर प्रत्‍येक गावांतील बेरोजगार तरूण/स्त्रिया यांचे समूह सहकारी समितीची स्‍थापना करतील आणि कच-यापासून वर्मीकंपोस्‍ट तयार करून तेच गावांत जुजबी किंमतीवर विकतील तर त्‍यांना मिळकतीचे एक साधन उपलब्‍ध होईल. तरूणांना केवळ मिळकत नाही तर गावाला चांगल्‍या गुणवत्तेचे खत देखील मिळेल.

 

स्त्रोत : पोर्टल कन्टेट टिम

अंतिम सुधारित : 5/25/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate