অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

आधुनिक संगणीकृत दुग्धव्यवसाय

वास्तविक दुग्ध  व्यवसाय (Dairy Faming) हे अतिशय विशाल असे उद्योगक्षेत्र आहे म्हणून अनेक आयटी सॉफ्टवेअर कंपन्या याकडे आकर्षित झालेल्या आहेत. तरुणवर्गातील एक मोठा गट असा आहे की, जो आता नवीन तंत्रज्ञानाचा वापर करुन शेतीव्यवसायात उतरण्याचे धाडस करत आहे. ब-याचशा सॉफ्टवेअर कंपन्यानी सध्या लघु आणि मध्यम शेतक-यावर लक्ष केंद्रीत केलेले आहेत. ज्याच्याकडे साधारणपणे ५ ते २५ गाई/म्हशी आहेत.

ज्यांनी आतापर्यंत कोणतेही तंत्रज्ञानाचे सहाय्य घेतलेले नाही अशांसाठी दुध उत्पादन, त्यातील टप्पे आणि दुध मार्केटिंग यासाठी संगणकप्रणाली हा एक उत्तम उपाय आहे. पारंपरिक पध्दतींनुसार खुप मजुर कामाला लावून अधिक दुध उत्पादन मिळविण्याचा प्रयत्न केला जातो. मात्र जेव्हापासून गोठ्यामध्ये स्वच्छता, जनावरांना योग्यवेळी त्यांच्या दुध उत्पादनानुसार संतुलित खाद्य देणे या सर्व गोष्टींकरिता नवीन तंत्रज्ञानाचा वापर होवू लागला, तेव्हापासून पारंपरिक व्यवस्थापनाच्या बाबी मागे पडल्या. दुध उत्पादन क्षेत्रात गोठवणूक यंत्रणा बसविणेही अधिक फायदेशीर ठरू लागली. यासाठी विंजेची गरज भासत असली तरी देखील गायींच्या शेणापासून बायोगॅस निर्मिती करुन ही गरज सहजपणे भागविता येवू शकते. संगणकाचे महत्व हे सर्व क्षेत्रात आहे. सद्यस्थितीत संगणकाशिवाय आज कोणतेही काम भागात नाही.

आपल्या समोर सर्व सुखसुविधा उपलब्ध आहेत. मोबाईल अॅप, सॉफ्टवेअर, इंटरनेट सुविधा परंतु आपण स्वतः ठरविलें पाहिजे की आपल्याला त्याचा उपयोग किंती व कसा घ्यावयाचा आहे. फार्मिग म्हटले की डेअरी कॅटल फार्म, डेअरी गोष्ट फार्म,डेअरी बफेलो फार्म, अॅग्रिकल्चर फार्म इ. वेगवेगळे फार्म तयार करु शकतो व त्याबाबतची संपूर्ण माहिती संगणकामध्ये सॉफ्टवेअरव्दारे साठवून ठेवू शकतो. त्यामध्ये पायाभूत सुविधांच्या विकासापासून ते दुध उत्पादन, दुध साठवणूक, खाद्य व चान्याचे अचुक नियोजन, गुरांच्या आरोग्याची काळजी, प्रजनन विंषयक माहिती, नवजात अर्भकाची माहिती संकलेित करणे, नवीन विकत घेतलेल्या गाई/ म्हशींची माहिती, उत्पादन व्यवस्थापन, प्रगत पशुखाद्य व्यवस्था, मोठ्या प्रमाणावर दुध थंड करण्याच्या पध्दती, पशु आरोंग्यस्थितीं लसीकरण, औषधोंपचार, गाय विंर्ण, भाकड़ काळ जन्म, आजार, पशुआरोग्य संबधित विविध चाचण्या, वासरांचे वजन (Production Management, Advanced Animal Feeding Facility, Smart Bulk MilK COOler Monitoring System, Health Status, Waccinations, Medications, Calving, Drying off, Birth, Diseases, Testing, cal Weight) इत्यादी माहिती संकलित केली जावू शकते. डेअरी फॉर्मगसाठी सॅॉफ्टवेअरचा वापर केला तर गुरांच्या कळपाची उत्पादनक्षमता वाढते. ती फक्त योग्य नियोजन केल्यामुळेच.

अद्यावत संगणक प्रणालीमध्ये कार्य करण्याची माहिती

आपणाकडे असलेल्या डेअरी फॅर्मचा झोन वायफाय केलेला असावा. जेणेकरुन आपल्याकडे असलेल्या गाई किंवा म्हशीं यांच्याशी आपला संपर्क ह्या प्रत्येक जनावराला दिलेल्या इयरटॅग मार्फत तयार झालेल्या.


नखर (Unique Identification Number) नुसार  जनावराची माहिती ही संगणकामध्ये (सर्व्हर ) इयरटॅग

"या मार्फत (Animal Identification Tags & Readers (Ear Tags)  दर्शविलेल्या छायाचित्राप्रमाणे साठवली जाते. त्यामुळे पुन्हा पुन्हा गाई/म्हशींची माहिती भरण्याची गरज भासत नाही. फक्त काही सुधारणा असल्या तरच उदा. आरोग्याबाबतची माहिती किंवा दुध उत्पादन इ. माहिती तसेच जर आपणास आपल्या डेअरी फार्मचे मार्केटिंग करावयाचे असल्यास किंवा जवळच्या १० ते १५ किलोमीटर पर्यंतच्या दुध संकलन केंद्राजवळील पशुधनाची माहिती घ्यावयाची असल्यास आपण Anima|dentification Tags & Readers (Ear Tags). हा  त्या जनावराला सुधा लावू शकतो   व वेळोवेळी त्या जनावराची माहिती आपल्या सव्र्हरवर देवून त्या जनावराची काळजी घेवू शकतो.

त्यामुळे आजुबाजून्या खेडोपाडी जे गोपालक आहेत त्यांना जर त्याचा फायदा झाला तर आपोआपच डेअरी फॉर्मधारकांना त्याचा निश्चित फायदा होईल व दुध उत्पादनक्षमता वाढेल. या संदर्भातील सगळे मुल्यमापन हेक्लाउडमार्फत पार पड़ते. गुरे आणि दुध शिंतकरण केंद्रावर लावलेल्या सैन्सरच्या माधमातून शेतक-यापर्यंत पोहचणारी माहिती फक्त आपणास समजून घ्यावी लागेल. ती प्रसंगी पशुवैद्यकामार्फत पोहचवावी लागेल.

ही सर्व माहिती वायरलेस नेटवर्कच्या माध्यमातून 3सर्विस प्रोव्हायडर  (Service Prowider) च्या सर्व्हरपर्यंत येईल. विशेष म्हणजे पशुपालक हि सर्व माहिती  Mobile Android Application किंवा एस.एम.एस. (SMS) व्दारे गुरांना दिलेल्या युआयडी नंबर (Unique Identification Number) टाइप केल्यानंतर मिळेल .

सध्यस्थितीत बाजारामध्यें संगणकोंचे इटरनेटमार्फत जाले सर्व खेड़ोंपाड़ीं पोहोचले आहे. त्यामुळे ज्याच्याकडे साधारणतः ५ ते २५ गाई/म्हशी आहेत त्यांनी जर इंटरनेटवर गुगल सर्च इंजीनामार्फात  Download free download Modern Dairy Farm Management Software Key Word टाईप  करून सर्च केले तर आपल्याला बरेचशे ओपन सोर्स सॉफ्टवेअर (ओपन source software) हे मोफत डाउनलेोड करुन वापरण्यासाठी मिळू शकतात किंवा जे सॉफ्टवेअर विकत मिळत असेल तें काही दिवसांसाठी संबधित सॉफ्टवेअर कंपनी ट्रायल बेर्सीसवर ग्राहकांना मोफत वापरण्यासाठी देतात. काही सॉफ्टवेअर आपणास इंटरनेटद्वारे मिळू शकतात व ते मोफत व ऑनलाईन रजिस्टर करुन ऑनलाईन वापरू शकतात.तरी शेतक-यांनी/ पशुपालकांनी या आधुनिक संगणीकृत प्रणालीचा दुग्धव्यवसायामध्ये वापर करून दुध उत्पादनक्षमता वाढविण्याचा प्रयत्न करावा.


स्रोत - कृषी विभाग महाराष्ट्र शासन

 

अंतिम सुधारित : 7/26/2023



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate