অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

बटेरपालनाबाबत माहिती

बटेरपालनाबाबत माहिती

  1. जगभर आढळणाऱ्या बटेर पक्ष्यांच्या अनेक जातींपैकी "जपानी लाव्ही' (कॉटरनिक्‍स कॉटरनिक्‍स जॅपोनिका) ही जात धंदेवाईक बटेरपालनासाठी अतिशय उपयुक्त आहे. सरकारी परवाना घेऊन या पक्ष्यांचे व्यावसायिकरीत्या संगोपन करता येते.
  2. बटेर हा अतिशय झपाट्याने वाढणारा पक्षी आहे. एक दिवसाचे पिल्लू फक्त सहा ग्रॅम वजनाचे असते. साधारणतः पाच आठवड्यांत हे पक्षी 150 ते 180 ग्रॅम वजनाचे होतात आणि असे पक्षी बाजारपेठेत मांसासाठी विकता येतात.
  3. या पक्ष्यांमध्ये मरतुकीचे प्रमाण अत्यल्प असते, तसेच त्यांना सहसा कोणत्याही रोगाची लागण होत नाही. रोगप्रतिकारक शक्ती उत्तम असल्यामुळे बटेर कोणत्याही हवामानात उत्तमरीत्या वाढू शकतात.
  4. वयात आलेले बटेर पक्षी साधारणतः सहा ते सातव्या आठवड्यापासून अंडी देऊ लागतात. ही अंडी 18 दिवसांच्या उबवणुकीनंतर पिल्ले निर्माण करण्यासाठी वापरता येतात.
  5. बटेर पक्षी हे गादी पद्धतीने किंवा पिंजरा पद्धतीनेही पाळता येतात. सर्वसाधारणपणे पिंजरा पद्धत या पक्ष्यांसाठी लोकप्रिय आहे. गादी पद्धतीत या पक्ष्यांना पाळल्यास लहान वयातील मरतुकीचे प्रमाण कमी राहते.
  6. लहान वयातील ब्रूडिंग व इतर व्यवस्थापन कोंबड्यांच्या पिलांप्रमाणेच करावे लागते. फक्त लाव्हीची पिल्ले ही आकाराने खूपच लहान असल्याने व सुरवातीच्या पाच- सहा दिवसांमध्ये खूपच अशक्‍त असल्याने त्यांच्यावर सतत लक्ष द्यावे लागते. खाद्याची व पाण्याची भांडी योग्य पद्धतीची निवडणे जरुरीचे आहे.

 

आर. डी. बेडसे, दरेगाव, जि. नाशिक
संपर्कः 
022 - 24130162, 24137030 
कुक्कुटपालनशास्त्र विभाग, पशुवैद्यक महाविद्यालय, परळ, मुंबई

स्त्रोत: अग्रोवन

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate