অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

रोग अन्वेषण विभाग, पुणे

प्रस्तावना

पशुआरोग्य हा पशुधन व्यवसायाचा मुख्य कणा आहे. पशुधनातील रोग प्रादुर्भावामुळे आर्थिक नुकसान तर होतेच पण त्यचबराबर जनावरांत मर्तुक आणि त्यामुळे उत्पादन घटते. राष्ट्रीय कृषि आयोग असे नमुद करते की, पशुधन क्षेत्रातील वाढीसाठी प्रामुख्याने जनावरांतील सांसर्गिक रोग याबर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे.

इतिहास आणि पार्श्वभुमी

इंपेरीअल जिवाणूशास्त्र प्रयोगशाळा ही संस्था सर्वप्रथम पुणे येथे स्थापन झाली.ती १८९० या वर्षात मुक्तेश्वर येथे स्थलांतरीत झाली. तीचे नांव आता भारतीय पशु विज्ञान संशोधन संस्था (आय. व्ही. आर.आय.) असे आहे.

  • १९३२ रोग अन्वेषण विभागाची मुंबई येथे स्थापना
  • १९४७ या विभागाची पुणे येथे स्थलांतर आणि महाराष्ट्र राज्यसाठी राज्यस्तरीय प्रयोगशाळा म्हणून कार्यरत
  • १९७० रोग अन्वेषण विभागाची कोल्हापूर येथे रोग निदान प्रयोगशाळा(वराह) म्हणून स्थापना
  • १९७२ लाळखुरकूत रोग प्रयोशाळेची स्थापना
  • १९७५ जिवाणूशास्त्र व विकृतिशास्त्र प्रयोगशाळांची स्थापना
  • १९८०विषशास्त्र व परोपजिवी शास्त्र प्रयोगशाळांची स्थापना
  • १९८३ सनिरीक्षण, पशुरोग व कुक्कुट रोग प्रयोगशाळांची स्थापना
  • १९८५ स्वतंत्र उतीसंवर्धन प्रयोगशाळेची स्थापना
  • १९९८ पश्चिम विभागातील राज्यांसाठी (मध्यप्रदेश, गुजराथ, छत्तीसगड,गोवा महाराष्ट्र दिव-दमण - हवेली ) संदर्भिय प्रयोगशाळा म्हणून मान्यता.

रोग अन्वेषण विभागाची उदिष्टे

  • रोग प्रादुर्भावामधून नमुन्यांचे संकलन करणे
  • उती नमुने अन्वेषित करून रोगाचे निदान पक्के करणे
  • पशुधनातील व कुक्कुट पक्ष्यातील रोग प्रादुर्भाव निश्चीत करणे
  • क्षेत्रिय अधिका-यांना रोग प्रादुर्भाव आटोक्यात आणण्यासाठी मार्गदर्शन करणे
  • विषबाधा निदानासाठी विषशास्त्रिय चाचण्या करून मर्तुक आटोक्यात आणण्यासाठी उपाययोजना सुचविणे
  • राज्यातील ज्ञात व अज्ञात रोगाचे अन्वेषण करणे
  • पशुधनातील क्षय,जोन्स सांसर्गिक गर्भपात व कुक्कुट पक्ष्यातील सालमोनेल्लसीस या आर्थिक दृष्ट्या महत्वाच्या रोगाच्या नियंत्रणासाठी चाचण्या करणे
  • राज्यातील आणि राज्यबाहेरील रोग निदान प्रयोगशाळांना रोग निदानासंबंधी प्रशिक्षण आयोजित करणे.
  • निर्यातक्षम पशुधन,कुक्कुट व मांसजन्य पदार्थ यांचेसंदर्भात प्रमाणपत्र देणे
  • राज्यातील आय.बी.आर., सांसर्गिक गर्भपात, पी.पी.आर. व इतर रोगाचें सर्वेक्षण करणे
  • रोगप्रदुर्भावासंबंधीची आणि व झालेल्या आर्थिक नुकसानीबाबत अन्वेषण करून माहीती घेणे

विभागीय रोग निदान प्रयोगशाळा (पश्चिम विभाग)-उदिष्टे

  • रोग प्रादुर्भावामधून नमुन्यांचे संकलन करणे
  • सदर संस्था पश्चिम विभागातील राज्यांसाठी जिवाणू, विषाणू, परोपजिवी आणि इतर आर्थिक दृष्ट्या महत्वाच्या रोगांसाठी संदर्भिय प्रयोगशाळा म्हणून काम करेल
  • पश्चिम विभागातील राज्यांमधील रोगांबाबत माहीती गोळा करून इतर राज्यांना पुरवठा करेल
  • वर्गीकृत केलेले जिवाणू, विषाणू, परोपजिवी जंतू यांची जपणूक करेल तसेच आवश्यकतेप्रमाणे राष्ट्रीय जपवणूक प्रयोगशाळा येथे पाठविणे
  • रोग निदानासाठी मान्यताप्राप्त असणा-या चाचण्या प्रमाणित करून त्याबरोबर रोग निदान करणे व तसेच इतर राज्यतील प्रयोगशाळांना माहीती देणे
  • इतर राज्यतील प्रयोगशाळेतील अधिका-यांना रोग निदानासंबंधी प्रशिक्षण देणे
  • पशुधनातील क्षय, जोन्स, सांसर्गिक गर्भपात, आय.बी.आर.व कुक्कुट पक्ष्यातील सालमोनेल्लसीस याआर्थिक दृष्ट्या महत्वाच्या रोगाच्या नियंत्रणासाठी चाचण्या करणे.
  • भारत सरकार, कृषि खाते, पशुसंवर्धन विभाग यांनी ठरवून दिलेल्या उदा. बी.एस.ई ./ स्क्रेपी इत्यादी रोगांसाठी सर्वेक्षण करणे

--------------------------------------------------------------------------------------------------

स्त्रोत: योजना आणि धोरणे - पशुसंवर्धन विभाग, महाराष्ट्र शासन, (भारत)

अंतिम सुधारित : 7/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate