অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

बर्ड-फल्यु संक्षिप्त माहिती

एव्हीएन इनफल्युएन्झा / बर्ड-फल्यु - माहिती

एव्हीएन इनफल्युएन्झा किंवा बर्ड फल्यु हा कुक्कुटवर्गीय पक्षांमधील विषाणूजन्य रोग अहे.पक्षी वर्ग,मनुष्यप्राणी तसेच इतर सस्तन प्राण्यांना या विषाणूंची बाधा होवू शकते.
सदर विषाणू ऑथ्रोमिक्सोव्हायरीडी कुटुंबातील असून आरएनए प्रकारच्या प्रथिनांपासून बनलेला आहे व त्याचे चार प्रकार- ,,क व थोगोटो विषाणू असे आहेत.

त्यापैकी प्रकारापासून प्राण्यास व पक्षास, ‘ प्रकारच्या विषाणूपासून सील मध्ये व प्रकारच्या विषांणूपासून वराहांमध्ये हा आजार होतो. आजपावेतो 63 देशांमध्ये सदर रोगाचा उद्रेक झालेला आहे.

एव्हीएन इनफल्युएन्झा हा घातक सांसर्गिक विषाणूजन्य आजार असून त्यामुळे पक्षांमध्ये मोठया प्रमाणावर मर्तुक होते.या रोगामध्ये श्वसनसंस्था,पचनसंस्था तसेच मज्जासंस्थेवर विपरित परिणाम होतात.

पाणथळ जागेजवळ वास्तव्यास असणारे जंगली पक्षी,पाणकोंबडी,बदके,राजहंस बगळे व फिरते पक्षी यांचे शरीरात सदर रोगाचे विषाणू मोठया प्रमाणावर आढळतात व ते विषाणूवाहकाचे कार्य करतात.एव्हीएन इनफल्युएन्झा या आजारामध्ये कधी कधी कुठल्याही प्रकारची लक्षणे न दिसता पक्षांमध्ये मोठया प्रमाणावर मर्तुक होते.

सदर विषाणूच्या आवरणांवर हिमऍग्ल्युटीनीन व न्युरामिनीडेज नावाची प्रथिनें असतात.या प्रथिनांमध्ये छोटया व मोठया प्रमाणावर जनुकीय बदल घडत रहातात.

आजपावेतो हिमऍग्ल्युटीनीन प्रथिनांचे एच-1 ते एच-16 व न्युरामिनीडेज प्रथिनांचे एन-1 ते एन-9 असे उप प्रकार आढळले आहेत. ज्यापैकी एच-5 व एच-7 हे उपप्रकार अत्यंत घातक आहे त्यांचे मुळे पक्षांमध्ये कोणत्याही प्रकारची लक्षणे न दिसता 100 टक्के मर्तुक होते.

पक्षांतर्गत रोग प्रसाराचे मार्ग

  • पक्षी एकमेकांच्या सानिध्यात आल्यास हवेद्वारे प्रसार
  • आजारी पक्षांक्ष्या श्वासनलिकेतील स्त्रावावाटे वा विष्ठेच्या थेट संपर्कात आल्यास
  • सदर विषांणूचे उत्पादन व वाढ पक्षांच्या आंतडयांमध्ये मोठया प्रमाणावर होते व तो लाळ, नाकातील स्त्राव व विष्ठे वाटे बाहेर टाकल्या जातो.
  • आजारी पक्ष्यांच्या एक ग्रॅम विष्ठे पासून सुमारे एक दशलक्ष पक्षांना या रोगाची बाधा होउ शकते.
  • जे पक्षी आजारातून बरे झालेले आहेत ते कमीतकमी दहा दिवस त्यांचे लाळेतून अथवा विष्ठे वाटे रोगजंतुचा प्रसार करतात.

लक्षणे

अचानकमोठया प्रमाणावर मर्तूक, शक्तिपातहोणे,भूकमंदावणे,डोक्यावर, डोळयाभोवती,
तुरा,गलोल ,पायावर सूज येणे.तुरा व गलोल जांभळट होणे.नाकावाटे स्त्राव,खोकला व शिंका येणे.तसेच पातळ हगवण होणे.

शवविच्छेदनातील ठळक बदल

श्वास नलिका व घसा यांचेमध्ये रक्तस्त्राव, श्वास नलिकेचा दाह,प्रोव्हेंट्रीक्यूलस, यकृत व मांडीच्या स्नायू मध्ये रक्तस्त्राव होणे,प्लीहा मोठी होणे

रोग आटोक्यात आणण्यासाठीचे उपाय

हा रोग वेगवेगळया प्रकारे प्रसारित होत असल्यामुळे खालील प्रमाणे ऊपाययोजना अमलांत आणावी.

  • जैव सुरक्षा ऊपाययोजनांची कठोर अंमलबजावणी
  • जंगली व स्थलांतरण करणारे पक्षांना प्रक्षेत्रावर प्रतिबंध करावा
  • मृत पक्षांची त्वरीत विल्हेवाट काळजीपूर्वक करणे अत्यावश्यक आहे.विल्हेवाटीसाठी जाळणे अथवा पुरणे यापैकी एक पर्याय निवडावा
  • पक्षी व पक्षांपासून निर्मित अंडी,मांस ईत्यादीच्या वाहतुकीवर नियंत्रण ठेवणे
  • नियमितपणे पक्षांचे रक्तजल ,विष्ठा, नाकांतील व घशातील स्त्राव नमुने गोळा करून तपासणी करून घेणे.

-----------------------------------------------------------------------------------------------------

स्त्रोत: पशुसंवर्धन विभाग, महाराष्ट्र शासन, (भारत)

अंतिम सुधारित : 7/8/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate