Skip to content. | Skip to navigation

Vikaspedia


T2 2019/10/14 06:53:31.523699 GMT+0530
मुख्य / शेती / पशूपालन / गुरे पालन / अशी आहे जनावरांची पचन संस्था
शेअर करा

T3 2019/10/14 06:53:31.529048 GMT+0530
Views
 • स्थिती: संपादनासाठी खुला

T4 2019/10/14 06:53:31.558093 GMT+0530

अशी आहे जनावरांची पचन संस्था

जनावरांच्या पचनसंस्था त्यांच्या जठराच्या रचनेप्रमाणे दोन प्रकारच्या असतात. एक सामान्य पचन संस्था म्हणजेच मनुष्य प्राण्याप्रमाणे "सिंपल स्टमक' प्रकारची रचना असते.

 1. जनावरांच्या पचनसंस्था त्यांच्या जठराच्या रचनेप्रमाणे दोन प्रकारच्या असतात. एक सामान्य पचन संस्था म्हणजेच मनुष्य प्राण्याप्रमाणे "सिंपल स्टमक' प्रकारची रचना असलेली तर दुसरी "रुमिनंट स्टमक' प्रकारची रचना, ज्यामध्ये जठर चार वेगवेगळ्या कप्प्यांमध्ये विभागलेले असते.
 2. पहिल्या प्रकारची रचना श्‍वान, मांजर, डुक्कर, घोडे, गाढव या प्राण्यांमध्ये असते तर दुसरी रुमिनंट स्टमक प्रकारची चार कप्प्यांची जठर रचना गोवंशीय, महिषवंशीय प्राणी तसेच शेळ्या, मेंढ्या, उंट, हरीण, हत्ती यांच्यामध्ये असते.
 3. जठराच्या अशा योजनेप्रमाणेच या जनावरांच्या खाद्य पचविण्याच्या क्रियेमध्ये फरक असतो. सामान्य पचन संस्था असलेले प्राणी रवंथ करीत नाहीत आणि त्यांना जठरातून तोंडात माघारी घेऊन रवंथ करतात; पण ते उलटी करू शकत नाहीत. आणखी एक महत्त्वाचा फरक म्हणजे पहिल्या प्रकारच्या जनावरांच्या तोंडामध्ये वरच्या तसेच खालच्या जबड्याला समोरच्या दंतपंक्ती तसेच सुळे असतात; परंतु रुमिनंट जठर असलेल्या जनावरांमध्ये फक्त खालच्याच जबड्याला संपूर्ण दात असतात; पण वरच्या जबड्याला फक्त दाढा असतात, कारण निसर्गतःच हे प्राणी संपूर्ण शाकाहारी आहेत.
 4. जनावरांची पचननलिका ओठापासून सुरू होऊन मोठ्या आतड्यांच्या शेवटी असलेल्या गुदद्वारापर्यंत संपते. त्याचबरोबर अन्ननलिकेतील अवयवांचा यामध्ये महत्त्वाचा सहभाग असतो.
 5. प्राण्यांच्या जठरामध्ये पचनासाठी क्‍लिष्ट असलेल्या पदार्थांचे आंबवून पचनास सुलभ पदार्थामध्ये रूपांतर करणारा एक अति महत्त्वाचा घटक असतो तो म्हणजे जठरातील सहजच कायमस्वरूपी रहिवाशी असलेले काही मित्र सूक्ष्म जीवाणू.

पचनसंस्थेचे कार्य

 1. अतिशय ढोबळ अन्नातील सूक्ष्म पोषक तत्त्वे शरीराला मिळवून देणे.
 2. शरीराच्या सगळ्या क्रिया करण्यासाठी लागणारी ऊर्जा निर्मिती.
 3. शरीराला लागणारे पाणी पचवणे आणि चयापचयाच्या क्रियेतून निर्माण होणारे अनावश्‍यक घटक मलमूत्राच्या रूपाने बाहेर विसर्जित करणे.

पोटशूळ आजार

 1. जनावरांमध्ये जिवाणूमुळे आंत्रविषार, ई.कोलाय, साल्मोनेला, क्षयरोग, विषाणू बाधा, विषारी पदार्थांमुळे पोटशूळ आढळतो. जंत कृतींमुळेदेखील पोटशूळ दिसते.
 2. जनावरांना झालेल्या पचन संस्थेच्या सांसर्गिक आजारांमध्ये शरीराचे तापमान वाढलेले आढळते.

लक्षणे

 1. पोटशूळ झालेले जनावर अस्वस्थ होते, उठ-बैस करते, वेदनेने विव्हाळते, पाय पोट ताणते. शेण, लघवी होत नाही, चारापाणी खाणे बंद होते. नंतर जुलाब होऊन पातळ शेणामधून शेम आणि रक्तदेखील पडते.
 2. डोळे खोल जातात, त्वचा निस्तेज कोरडी सुरकुतलेली दिसते आणि मृत्यूदेखील होतो.

उपचार

 1. आजाराची लक्षणे दाखविणाऱ्या जनावरांच्यावर तातडीने पशुवैद्यकाकडून उपचार करावेत.
 2. आंत्रविषार किंवा जुलाब असलेल्या जनावरांच्या शरीरात पाणी आणि क्षार कमी पडतात, त्यामुळे तत्काळ औषधोपचार करून शरीरातील पाणी आणि आवश्‍यक क्षार आणि शर्करा सलाइनमधून देऊन प्राण वाचवावे लागतात.

 

डॉ. प्रशांत पवार 
(लेखक क्रांतिसिह नाना पाटील पशुवैद्यकीय महाविद्यालय, शिरवळ, जि. सातारा येथे कार्यरत आहेत)

स्त्रोत: अग्रोवन

3.20338983051
आपल्या सूचना पोस्ट करा

(वरील विषयासाठी जर तुमच्या काही प्रतिक्रिया किंवा सूचना असतील तर या ठिकाणी नोंदवा)

Enter the word
नेवीगेशन

T5 2019/10/14 06:53:31.796174 GMT+0530

T24 2019/10/14 06:53:31.802745 GMT+0530
Back to top

T12019/10/14 06:53:31.373492 GMT+0530

T612019/10/14 06:53:31.392655 GMT+0530

T622019/10/14 06:53:31.512269 GMT+0530

T632019/10/14 06:53:31.514305 GMT+0530