Skip to content. | Skip to navigation

Vikaspedia


T2 2019/10/17 18:03:28.955704 GMT+0530
मुख्य / शेती / पशूपालन / गुरे पालन / उवा-गोचीड नियंत्रण
शेअर करा

T3 2019/10/17 18:03:28.961680 GMT+0530
Views
  • स्थिती: संपादनासाठी खुला

T4 2019/10/17 18:03:28.991691 GMT+0530

उवा-गोचीड नियंत्रण

बाह्य परोपजीवींच्या प्रादुर्भावामुळे जनावरांचे शरीर खाजते, केस गळतात, जनावर अस्वस्थ होते, त्यांचे वजन कमी होते, दूध उत्पादनात घट येते.

जनावरांमध्ये उवा, माश्‍या, गोचीड या प्रकारांतील बाह्य परोपजीवींची समस्या मोठ्या प्रमाणात आढळते. बाह्य परोपजीवींच्या प्रादुर्भावामुळे जनावरांचे शरीर खाजते, केस गळतात, जनावर अस्वस्थ होते, त्यांचे वजन कमी होते, दूध उत्पादनात घट येते. याशिवाय या परोपजीवींमुळे जखमेमध्ये आसडी पडते, जिवाणू, विषाणू, रक्तातील कृमींमुळे आजार वाढतात. या बाह्य परोपजीवींच्या नियंत्रणासाठी अनेक औषधे उपलब्ध आहेत; परंतु ही औषधे विषारी असल्यामुळे त्यापासून जनावरांना विषबाधा होण्याची शक्‍यता असते. हे लक्षात घेऊन स्वस्त व सुरक्षित असा औषधी वनस्पतींचा वापर अत्यंत गुणकारी ठरतो.

उपयुक्त औषधी वनस्पती

वेखंड

वेखंड अथवा वचा या नावाने ओळखली जाणारी वनस्पती आहे. चेतना संस्थेच्या आजारात ही वनस्पती वापरली जाते. या वनस्पतीची पावडर उवा, गोचीड यांसारख्या बाह्य कृमींच्या नियंत्रणासाठी वापरावी. ही पावडर जनावरांच्या शरीरावर लावत असताना, केसांच्या उलट दिशेने लावावी, म्हणजे ती केसांच्या मुळांपर्यंत (त्वचेपर्यंत) पोचते.

कडुनिंब

कडुनिंब तेल हे बाह्य परोपजीवींच्या नियंत्रणासाठी अत्यंत गुणकारी आहे. हे तेल जनावरांच्या शरीरावर लावावे. यास असणारा उग्र वास आणि चव यामुळे बाह्य परोपजीवींची भूक नष्ट होते. त्यामुळे ते मरतात.

करंज

कडुनिंब तेलाप्रमाणेच करंज तेलामध्ये कीटकनाशक गुणधर्म आहेत. या तेलाचा वापर जनावराच्या शरीरावर लावण्याकरिता करावा. यामुळे बाह्य परोपजीवी मरतात.

सीताफळ

सीताफळाची पाने व बी हे चांगले कीटकनाशक आहे. सीताफळाची पाने सावलीत वाळवून याची पावडर करावी किंवा बियांची बारीक पावडर करावी. पावडर जनावरांच्या शरीरावर केसांच्या उलट दिशेने लावावी.

बावनचा

बावनचा किंवा बावची या वनस्पतीचे तेल कीटकनाशक म्हणून जनावरांच्या शरीरावर लावावे. यामुळे हे कीटक मरतात.

कण्हेर

फुलांसाठी प्रसिद्ध असलेली ही वनस्पती. हिची पाने अथवा मूळ परोपजीवींच्या विरोधात अत्यंत गुणकारी आहे. याचा वापर जनावराच्या शरीरावर बाहेरून लावण्याकरिता करावा.

सिट्रोनेल्ला

सिट्रोनेल्ला गवताचा उग्र वास असतो. सिट्रोनेल्ला, जिरॅनियम या तेलांचा वापर केल्याने बाह्य परोपजीवी जनावराच्या शरीरापासून दूर जातात.

निलगिरी तेल

निलगिरी तेलाचा वापर अत्यंत उपयुक्त आहे. या तेलामुळे बाह्य परोपजीवी जनावरांच्या शरीरापासून दूर जातात. तसेच काही बाह्य परोपजीवी मरतात.

वनस्पतींचा एकत्रित वापर  
वेखंड ः 15 ग्रॅम
सीताफळ (बी व पाने) ः 10 ग्रॅम
कण्हेर (मूळ व पाने) ः 5 ग्रॅम

 

अर्क तयार करण्याची पद्धत


1) या सर्व वनस्पती 150 ते 200 मि.लि. पाणी मिसळून उकळाव्यात. पाणी साधारणतः 40 ते 50 मि.लि.पर्यंत होईल तोपर्यंत उकळावे. नंतर हा अर्क गाळावा. चोथा वेगळा करावा.

2) या गाळलेल्या अर्कामध्ये कडुनिंब तेल 50 मि.लि., करंज तेल 50 मि.लि., सिट्रोनेला तेल 5 मि.लि., जिरॅनियम तेल 5 मि.लि., निलगिरी तेल 5 मि.लि. या प्रमाणात मिसळावे. या मिश्रणातून 30 मि.लि. मिश्रण वेगळे घेऊन ते एक लिटर पाण्यात मिसळावे. या द्रावणात 50 ग्रॅम साबणाचा चुरा मिसळावा.

3) हे मिश्रण जनावरांच्या अंगावर फवारावे. यामुळे बाह्य परोपजीवी मरतात.

4) जनावरांमध्ये माईटमुळे खरुज हा त्वचाविकार होतो. या माईटच्या नियंत्रणासाठी हे मिश्रण उपयोगी आहे.

------------------------------------------------------------------------------------------------------

स्त्रोत : अग्रोवन

2.81132075472
फड बन्सी बाबुराव Jan 09, 2018 07:20 PM

शेळी वर पिसा आहे उपाय काय

विशाल पाटील Oct 27, 2017 09:35 PM

म्हैसीची कास सोकली आहे उपाय सांगा

आपल्या सूचना पोस्ट करा

(वरील विषयासाठी जर तुमच्या काही प्रतिक्रिया किंवा सूचना असतील तर या ठिकाणी नोंदवा)

Enter the word
नेवीगेशन

T5 2019/10/17 18:03:29.240770 GMT+0530

T24 2019/10/17 18:03:29.247372 GMT+0530
Back to top

T12019/10/17 18:03:28.878331 GMT+0530

T612019/10/17 18:03:28.896362 GMT+0530

T622019/10/17 18:03:28.944255 GMT+0530

T632019/10/17 18:03:28.945301 GMT+0530