Skip to content. | Skip to navigation

Vikaspedia


T2 2019/10/18 14:07:35.897968 GMT+0530
मुख्य / शेती / पशूपालन / गुरे पालन / गाई, म्हशींचे आरोग्य जपा
शेअर करा

T3 2019/10/18 14:07:35.903742 GMT+0530
Views
  • स्थिती: संपादनासाठी खुला

T4 2019/10/18 14:07:35.934947 GMT+0530

गाई, म्हशींचे आरोग्य जपा

पावसाळ्यामध्ये हवेतील आर्द्रता वाढते, तसेच तापमानही कमी होते. याचा गाई व म्हशींची प्रकृती तसेच दूध उत्पादनावर परिणाम होतो.

पावसाळ्यामध्ये हवेतील आर्द्रता वाढते, तसेच तापमानही कमी होते. याचा गाई व म्हशींची प्रकृती तसेच दूध उत्पादनावर परिणाम होतो. हे लक्षात घेऊन गाई, म्हशी आणि गोठ्याची स्वच्छता, संतुलित आहार, जंतनिर्मूलन, प्रजनन व्यवस्थापन आणि स्वच्छ दूधनिर्मितीवर लक्ष द्यावे.

गोठ्याचे व्यवस्थापन


  • गाई- म्हशींकरिता गोठा बांधताना उंच ठिकाणी, तसेच पुरेशी हवा व भरपूर सूर्यप्रकाश येईल असा असावा.
  • गोठ्याचे छप्पर गळत असल्यास दुरुस्त करून घ्यावे.
  • गोठ्याच्या बाहेरील जागेवर खड्डे असल्यास त्या ठिकाणी मुरूम टाकून जागा कोरडी करावी, त्यामुळे कीटकांचा प्रसार होणार नाही. गोठा कोरडा ठेवावा. गोठ्यातील जमीन मुरूम टाकून ठोकून घ्यावी. खाचखळगे असल्यास बुजवावेत.
  • शेण गोठ्यापासून किमान १०० मीटर अंतरावर खताच्या खड्ड्यात टाकावे.
  • गोठ्याच्या आतमध्ये ओलसरपणा अधिक असल्यास त्यापासून बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव, जंतबाधा होण्याची शक्यता असते. अशा वेळी गोठ्यातील जमीन कोरडी ठेवण्याकरिता ज्वारीच्या किंवा गव्हाच्या भुश्श्यामध्ये योग्य प्रमाणात चुन्याची पावडर मिसळून त्याचा पातळ थर जमिनीवर पसरावा. गोठ्यातील भिंतींना आतून चुना लावावा. गोठा कोरडा व निर्जंतुक ठेवावा.

पावसाळ्यातील आहार व्यवस्थापन

१) पावसाळ्यामध्ये गाई-म्हशींना अपचन, पोटफुगी व पातळ हगवण अशा समस्या उद्भवतात. म्हणून पावसाळ्यात सकस व संपूर्ण आहाराचे व्यवस्थापन करावे. गाई व म्हशींकरिता आहार तयार करताना त्यामध्ये प्रामुख्याने हिरवा चारा २० ते २५ किलो, वाळलेला चारा (कडबा कुट्टी/ सोयाबीन किंवा चण्याचा भुसा) ६ ते ८ किलो, खनिज मिश्रण ५० ते ६० ग्रॅम, जीवनसत्त्वे १०० ग्रॅम/ प्रति १०० किलो खाद्य एवढ्या प्रमाणात दिल्यास गाई-म्हशींना जीवनावश्यक खाद्य घटक योग्य प्रमाणात मिळतात, त्यामुळेच त्यांचे आरोग्य चांगले राहते.

२) दुधाळ गाई- म्हशींच्या दूध उत्पादनात वाढ होण्यासाठी योग्य प्रमाणात खुराकाची गरज असते. अशा वेळी प्रति दोन लिटर दूध उत्पादनामागे एक किलो खुराक दिल्यास दुधाची प्रत व स्निग्धांश टक्केवारी, तसेच प्रमाण टिकून राहते.

-- डॉ. शीला बनकर, डॉ. विजय बसुनाथे

------------------------------------------------------------------------------------------

स्त्रोत: अग्रोवन

 

2.890625
आपल्या सूचना पोस्ट करा

(वरील विषयासाठी जर तुमच्या काही प्रतिक्रिया किंवा सूचना असतील तर या ठिकाणी नोंदवा)

Enter the word
नेवीगेशन

T5 2019/10/18 14:07:36.173644 GMT+0530

T24 2019/10/18 14:07:36.180215 GMT+0530
Back to top

T12019/10/18 14:07:35.823846 GMT+0530

T612019/10/18 14:07:35.843001 GMT+0530

T622019/10/18 14:07:35.886573 GMT+0530

T632019/10/18 14:07:35.887483 GMT+0530