Skip to content. | Skip to navigation

Vikaspedia


T2 2019/06/27 10:04:5.515772 GMT+0530
मुख्य / शेती / पशूपालन / गुरे पालन / गाई-म्हशींसाठी आंबोण
शेअर करा

T3 2019/06/27 10:04:5.521800 GMT+0530
Views
  • स्थिती: संपादनासाठी खुला

T4 2019/06/27 10:04:5.553936 GMT+0530

गाई-म्हशींसाठी आंबोण

संतुलित आहारामध्ये आंबोणाला अतिशय महत्त्व आहे. यामध्ये प्रथिने आणि ऊर्जा याचं प्रमाण अधिक असते.

संतुलित आहारामध्ये आंबोणाला अतिशय महत्त्व आहे. यामध्ये प्रथिने आणि ऊर्जा याचं प्रमाण अधिक असते. खुराक म्हणजेच आंबोण 100 किलो मिश्रण तत्त्वावर नमुना बनवावे. ज्यामध्ये विविध खाद्य घटक वापरण्यात येतात. जनावरांना ऊर्जा पुरविण्याकरिता आंबोणामध्ये मका, ज्वारी, बाजरी यासारखी तृणधान्य वापरतात. तर प्रथिनांचं स्रोत म्हणून सरकी, भुईमूग, जवस, तीळ, सूर्यफूल यापासून मिळणारी पेंड वापरावी.

तृणधान्य किंवा कडधान्यापासून मिळणारे दुय्यम पदार्थ उदा. भाताचा किंवा गव्हाचा कोंडा, भाताचे पॉलिश, कडधान्यापासून डाळी बनविताना मिळणारी तूर, उडीद, मूग चुणी यांचा समावेश होतो. त्याचप्रमाणे खुराकात एक ते दोन टक्के खनिज मिश्रण, एक टक्के शिंपला पूड किंवा डायकॅल्शिअम फॉस्फेट आणि एक टक्का मीठ यांचादेखील अवलंब केला जातो. खुराकात विविध खाद्य घटक वापरण्याचे कारण म्हणजे एका पदार्थातील अन्नघटकांची उणीव दुसऱ्या पदार्थातील अन्नघटकातून भरून निघते. आंबोणामध्ये साधारणतः 25 ते 35 टक्के पेंड, 25 ते 35 टक्के तृणधान्य, 25 ते 45 टक्के तृणधान्यापासून आणि 20 ते 30 टक्के कडधान्यापासून मिळणारे दुय्यम पदार्थ, एक ते दोन टक्के खनिज मिश्रण आणि एक टक्का मीठ यांचा समावेश होतो.

गाईसाठी आंबोण


दुभत्या जनावरास आंबोण देण्याचे प्रमाण त्यांच्या दुग्धोत्पादनावर अवलंबून असते. दुधाळ गाईस एक ते 1.5 किलो आंबोण शरीरपोषणासाठी आणि एक किलो आंबोण प्रति 2.5 किलो दुग्धोत्पादनासाठी देण्यात यावा. उदा. 400 किलो वजनाची गाय 15 किलो दुग्धोत्पादन देत असेल, तर तिला 1.5 किलो आंबोण शरीरपोषणासाठी आणि सहा किलो आंबोण 15 किलो दुग्धोत्पादनासाठी असं 7.5 किलो आंबोण द्यावे. आंबोण व्यतिरिक्त अशा गाईस चार ते पाच किलो सुका चारा आणि आठ ते दहा किलो ओला चारा देण्यात यावा.

म्हशींसाठी आंबोण


दुधाळ म्हशींना प्रति किलो दुग्धोत्पादनासाठी लागणारी अन्नघटक गाईंना लागणाऱ्या अन्नघटकांपेक्षा अधिक असतात. याचे कारण म्हणजे म्हशींच्या दुधामध्ये स्निग्धांशाचे प्रमाण गाईच्या दुधापेक्षा अधिक असते. म्हशींच्या बाबतीत सांगायचं झालंच तर शरीर पोषणासाठी 1.5 ते दोन किलो आंबोण आणि प्रति दोन किलो दुग्धोत्पादनासाठी एक किलो आंबोण या प्रमाणात देण्यात यावे. उदा. 500 किलो वजनाची म्हैस दहा किलो दुग्धोत्पादन देत असेल, तर तिला दोन किलो आंबोण शरीरपोषणासाठी आणि पाच किलो आंबोण दहा किलो दुग्धोत्पादनासाठी असे एकूण सात किलो आंबोण द्यावे. आंबोणाव्यतिरिक्त अशा म्हशींस सहा ते सात किलो सुका चारा आणि 10 ते 12 किलो ओला चारा देण्यात यावा. आंबोण जनावरास देण्याअगोदर आठ ते 12 तास भिजून ठेवावे, म्हणजे ते रुचकर होते. त्याची पाचकतादेखील वाढते. 

- डॉ. गादेगावकर, 9869158760 
क्रांतिसिंह नाना पाटील पशुवैद्यकीय महाविद्यालय, शिरवळ, जिल्हा सातारा

- गिरिधर शेवाळे, श्रीपूर, जि. सोलापूर

माहिती संदर्भ : अॅग्रोवन

3.06849315068
संदीप शिंगे May 23, 2017 04:45 PM

फुले तफुले त्रिवेणी गाय हवी आहे 90*****50

माने तुशार मानेमाने Nov 01, 2015 12:11 PM

आंबोन विशयीची माहिती पाहीजे

आपल्या सूचना पोस्ट करा

(वरील विषयासाठी जर तुमच्या काही प्रतिक्रिया किंवा सूचना असतील तर या ठिकाणी नोंदवा)

Enter the word
नेवीगेशन

T5 2019/06/27 10:04:6.205752 GMT+0530

T24 2019/06/27 10:04:6.212133 GMT+0530
Back to top

T12019/06/27 10:04:5.436518 GMT+0530

T612019/06/27 10:04:5.458351 GMT+0530

T622019/06/27 10:04:5.503989 GMT+0530

T632019/06/27 10:04:5.504892 GMT+0530