Skip to content. | Skip to navigation

Vikaspedia


T2 2019/10/17 18:00:6.007795 GMT+0530
मुख्य / शेती / पशूपालन / गुरे पालन / गाई- म्हशींसाठी गोठा
शेअर करा

T3 2019/10/17 18:00:6.013579 GMT+0530
Views
  • स्थिती: संपादनासाठी खुला

T4 2019/10/17 18:00:6.045176 GMT+0530

गाई- म्हशींसाठी गोठा

गोठा चांगला असेल तर जनावरांचे स्वास्थ्य चांगले राहते. सुधारित पद्धतीमुळे गोठ्यातील कामे सहजपणे होतात, मनुष्यबळ कमी लागते

गोठा चांगला असेल तर जनावरांचे स्वास्थ्य चांगले राहते. सुधारित पद्धतीमुळे गोठ्यातील कामे सहजपणे होतात, मनुष्यबळ कमी लागते, तसेच जनावरांचे दुग्ध उत्पादन वाढते. गोठा बांधताना शेतातील उंचावर असलेली कठीण व सपाट जागा निवडावी, जेणेकरून गोठ्यातील मल-मूत्र, सांडपाणी याची विल्हेवाट व्यवस्थित लावता येईल. चाऱ्यासाठी योग्य प्रकारची गव्हाण आणि प्रत्येक जनावरास हालचालीसाठी पुरेशी जागा मिळेल याची काळजी घ्यावी. गोठ्याचे छत योग्य उंचीवर आणि न गळणारे असावे. गोठ्यात भरपूर सूर्यप्रकाश व हवा खेळती राहील अशी व्यवस्था असावी.

गोठ्यातील गटार, गव्हाण व जनावरांना उभे राहण्याच्या जागेवर भरपूर सूर्यप्रकाश येण्यासाठी शक्‍यतो लांबीच्या बाजूने गोठा दक्षिण-उत्तर दिशेस असावा. गोठ्यातील जमिनीकरिता भाजलेल्या विटा किंवा दगडी फरशा असाव्यात. जमिनीस गव्हाणीकडून उतार दिलेला असावा. जनावरांना योग्य पद्धतीने चारा खाता येईल या पद्धतीने गव्हाण बांधावी. गव्हाणीचा पृष्ठभाग गुळगुळीत आणि काठ गोलाकार असावा. गोठा हवेशीर राहील या पद्धतीने भिंतीचे बांधकाम करावे. गोठ्यातील छत वजनाने हलके, कठीण व टिकाऊ असावे. जनावरांना ताजे व स्वच्छ पाणी सदैव उपलब्ध राहण्यासाठी टाकी कॉंक्रिटमध्ये बांधून घ्यावी. जनावरांचे शेण- मूत्र जमा करण्यासाठी गोठ्याच्या कडेने योग्य आकाराचे गटार करावे. गोठा बांधताना पशुतज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

गोठा बांधण्याच्या पद्धती

शेपटीपुढे शेपटी पद्धत


या पद्धतीमध्ये जनावरांना धुण्यासाठी व दूध काढण्यासाठी दोन्ही ओळींमधील जागा अधिक उपयोगी पडते. जनावराचे तोंड बाहेरच्या बाजूस असल्याने संसर्गजन्य रोग होण्याची शक्‍यता कमी असते, तसेच बाहेरच्या बाजूने ताजी हवा मिळते. दूध काढणाऱ्यांवर देखरेख करणे सोपे जाते. माजावरील जनावरे सहज ओळखता येतात. मजूर कमी लागतात. 

तोंडाकडे तोंड पद्धत


तोंडाकडे तोंड करून बांधलेल्या जनावरांचे योग्य पद्धतीने निरीक्षण करता येते. गोठ्याच्या दोन्ही बाजूस मोकळी जागा असल्यामुळे सूर्यप्रकाश भरपूर मिळतो. जनावरांना चारा टाकणे सोपे जाते. रोगप्रसार कमी प्रमाणात होतो.

 

संपर्क फोन नं.- 02426 - 243361 
गो संशोधन व सुधार योजना, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी

- पुंडलिक सावळे, शिरूर, जि. पुणे

माहिती संदर्भ :अॅग्रोवन

3.13725490196
Abhishek Desai Jan 28, 2018 01:41 PM

जनावरयाचा गोठाची माहीती पाहीजे आहे

Shubham Nagpure Jan 14, 2018 06:20 PM

सर
मला म्हशी पालनाचा व्यवसाय करायचा आहे ।
काही अनुदान आहे काय ।
कोणत्या जातीची निवड करावी

विक्रम राजपूत Oct 11, 2017 10:39 AM

मला म्हशी पालन व्यवसाय चालु करायचा आहे.त्यासाठी काही आनूदान आहे का?
त्याची माहीती हवी आहे.
89*****25 या नंबर वरती माहिती सेंट करा।।

विक्रम राजपूत Oct 11, 2017 10:36 AM

गोठा फाईल भारण्या साठी काय काय डोकुंमेन्ट लागतात ।।

भरत गवड Sep 20, 2017 10:33 AM

मला गोठा बांधायचा आहे तर त्यासाठी काय अनुदान मिळते का?

आपल्या सूचना पोस्ट करा

(वरील विषयासाठी जर तुमच्या काही प्रतिक्रिया किंवा सूचना असतील तर या ठिकाणी नोंदवा)

Enter the word
नेवीगेशन

T5 2019/10/17 18:00:6.381600 GMT+0530

T24 2019/10/17 18:00:6.387776 GMT+0530
Back to top

T12019/10/17 18:00:5.909301 GMT+0530

T612019/10/17 18:00:5.928943 GMT+0530

T622019/10/17 18:00:5.996389 GMT+0530

T632019/10/17 18:00:5.997377 GMT+0530