Skip to content. | Skip to navigation

Vikaspedia


T2 2019/10/14 07:23:21.028727 GMT+0530
मुख्य / शेती / पशूपालन / गुरे पालन / गाई, म्हशीतील 'कास दाह'
शेअर करा

T3 2019/10/14 07:23:21.034537 GMT+0530
Views
  • स्थिती: संपादनासाठी खुला

T4 2019/10/14 07:23:21.069445 GMT+0530

गाई, म्हशीतील 'कास दाह'

गाई, म्हशीतील कासदाह आजाराचे नियंत्रण करण्यासाठी त्याची लक्षणे व त्यासाठी जनावरांचे योग्य व्यवस्थापन याबाबतची माहिती येथे देण्यात आलेली आहे.

कासदाह हा आजार गोठ्यातील अस्वच्छतेमुळे होतो. या आजारामध्ये जिवाणू रक्तातून कासेत शिरकाव करतात, तसेच जिवाणूंचा सडातून शिरकाव होऊन कास बाधित होण्याचे प्रमाण जास्त असते. जिवाणू कासेतील दूध तयार करणाऱ्या पेशींना इजा करून पेशी निकामी बनवतात. कासेतील पेशी काम करत नसल्यामुळे कास दगडासारखी टणक बनते, कुठल्याही महागड्या औषधोपचाराला देखील प्रतिसाद देत नाही.

लक्षणे :


1) कासदाहमध्ये जनावरांना ताप येतो, खाणे, पिणे कमी होते. दुधात बदल होऊन दूध विरजल्याप्रमाणे किंवा गाठीच्या स्वरूपात येते. 
2) बऱ्याचदा पू, रक्त किंवा पू आणि रक्तमिश्रित अथवा पाण्यासारखे पातळ दूध येते. या रोगाचा तत्काळ, तसेच दीर्घकालीन परिणाम दूध उत्पादनावर आणि दुधातील फॅटवर होतो. 
3) बाधित जनावरांच्या उपचारासाठी आणि त्यांचा सांभाळण्याचा खर्च अधिक असतो. आजारी जनावर बाजारात विक्रीसाठी नेले असता कमी किंमत येते.

जनावरांचे व्यवस्थापन :

1) जनावरे बांधण्याची जागा स्वच्छ, कोरडी व हवेशीर असावी. 
2) गोठा नियमित स्वच्छ व निर्जंतुक ठेवावा. यासाठी गोठ्यात शिफारशीत जंतुनाशक द्रावण शिंपडावे. जंतुनाशक द्रावण उपलब्ध नसल्यास उकळत्या पाण्याने गोठा स्वच्छ करावा. 
3) दूध काढण्यापूर्वी जनावरांचे मागील पाय, शेपटी आणि कास कोमट पाण्याने स्वच्छ धुवावी. कास कोरड्या सुती कपड्याने पुसून घ्यावी. 
4) दूध काढण्यापूर्वी हात निर्जंतुक करावेत. धार काढताना पहिल्या दोन ते तीन धारा दुधाच्या भांड्यात न घेता, दुसऱ्या भांड्यात घेऊन त्याची योग्य विल्हेवाट लावावी. कारण पहिल्या धारांमध्ये जंतूंचे प्रमाण जास्त असते. या धारा जमिनीवर पडू देऊ नयेत. 
5) सर्व निरोगी जनावरांचे दूध अगोदर काढावे. आजारी जनावरांचे दूध वेगळे काढावे. 
6) गाई, म्हशीने पान्हा सोडल्यावर लवकरात लवकर म्हणजे साधारणत: सात मिनिटांच्या आत धार काढावी. 
7) दूध काढण्याच्या वेळेमध्ये बदल करू नये. 
8) धार अंगठा मुडपून न काढता पूर्ण हातानेच काढावी, कारण अंगठ्याचा दाब पडल्यामुळे जखम होऊन जंतूसंसर्ग लवकर होऊ शकतो. 
9) दूध पूर्णपणे काढावे. अपुरे दूध काढल्यास कासेमध्ये जंतूंची वाढ होते, कारण दूध हे जंतूंच्या वाढीसाठी पोषक असते. 
10) संपूर्ण दूध काढल्यानंतर गाईच्या सडाला सुरकुत्या पडतात, त्यावरून दूध पूर्ण निघाले आहे असे समजावे. 
11) दूध काढणीनंतर कासेला निर्जंतुक द्रावणाने (एक टक्के पोटॅशिअम परमॅंग्नेट) पुसावे, कारण दूध काढल्यानंतर जवळपास अर्धा तास सडांची छिद्रे मोकळी असतात. त्यामुळे जंतू सडात शिरकाव होण्याची शक्‍यता असते. 
12) दूध काढल्यानंतर जनावरास बसू देऊ नये. हिरवा चारा खायला द्यावा. जनावर बसल्यामुळे जमिनीवरील जंतू सडात प्रवेश करतात. 
13) जनावरांना पशुतज्ज्ञांच्या सल्ल्याने नियमित जंतुनाशके पाजावीत, शिफारशीत वेळेत लसीकरण करावे, त्यामुळे जनावरांची रोगप्रतिकारक शक्ती वाढते. 
14) जनावरांच्या खुराकामध्ये दररोज क्षारमिश्रणे द्यावीत. 
15) जनावर आटत असल्यास पशुवैद्यकांच्या सल्ल्याने कासेमध्ये प्रतिजैवके सोडावीत. 
16) दूध उत्पादन किंवा दुधामध्ये कोणताही बदल आढळून आल्यास त्वरित पशुवैद्यकाच्या मदतीने उपचार करावा.
संपर्क : 
डॉ. मीरा साखरे, 942375949. 
पशुवैद्यक व पशुविज्ञान महाविद्यालय, परभणी

स्त्रोत: अग्रोवन

3.08974358974
संतोष मोटे. (नाशिक) Sep 22, 2019 10:38 PM

म्हशीच्या कासेस सारखी सुज यते कास दगडासारखि घट्ट आहे ऊपाय सांगा.

Shamrao kunjam Mar 26, 2018 04:31 PM

पशुपालन व्यवसाय करावयाचा आहे याबाबत मार्गदर्शन हवे आहे.

गणेश वाळुंज Jan 26, 2018 08:39 PM

माझ्या कडे जर्षि गाई आहे गाई ची फॅट नाही बसत त्या साठी उपाय सांगा

कुमार पाटील, जयसिंगपूर . Jun 10, 2017 11:01 PM

कासेस सारखी सुज यते,दुध कमि होते कास दगडासारखि घट्ट होते ऊपाय सांगा

संतोष May 25, 2017 08:33 AM

म्हशीच्या पुडिल दोन थानाना सूज आली आहे,व त्यातून रक्त येते आहे यावर उपाय काय?

आपल्या सूचना पोस्ट करा

(वरील विषयासाठी जर तुमच्या काही प्रतिक्रिया किंवा सूचना असतील तर या ठिकाणी नोंदवा)

Enter the word
नेवीगेशन

T5 2019/10/14 07:23:21.368753 GMT+0530

T24 2019/10/14 07:23:21.374640 GMT+0530
Back to top

T12019/10/14 07:23:20.950241 GMT+0530

T612019/10/14 07:23:20.973085 GMT+0530

T622019/10/14 07:23:21.017809 GMT+0530

T632019/10/14 07:23:21.018661 GMT+0530