Skip to content. | Skip to navigation

Vikaspedia


T2 2019/06/24 16:39:22.725721 GMT+0530
मुख्य / शेती / पशूपालन / गुरे पालन / गोचिडामुळे जनावरांमध्ये होतो बबेसियोसीस, थायलेरियोसीस
शेअर करा

T3 2019/06/24 16:39:22.731469 GMT+0530
Views
 • स्थिती: संपादनासाठी खुला

T4 2019/06/24 16:39:22.964402 GMT+0530

गोचिडामुळे जनावरांमध्ये होतो बबेसियोसीस, थायलेरियोसीस

ज्या गोठ्यांमध्ये जनावरांची स्वच्छता राखली जात नाही, तेथे गोचिडांचा प्रादुर्भाव आढळतो. गोचिड जनावरांचे रक्त शोषण करतात. त्यामुळे रोगसंक्रमण होते.

ज्या गोठ्यांमध्ये जनावरांची स्वच्छता राखली जात नाही, तेथे गोचिडांचा प्रादुर्भाव आढळतो. गोचिड जनावरांचे रक्त शोषण करतात. त्यामुळे रोगसंक्रमण होते. मादी गोचिड गोठ्याच्या फटींमध्ये अंडी घालते. उबवणीनंतर अंड्यांमधील डिंबके जवळपासच्या कुरणांमधल्या गवत आणि झुडपांवर जातात. जनावरे या कुरणात चरायला गेल्यावर त्यांच्या अंगावर संक्रमण करतात.

गोचिडांनी रक्त शोषण केल्यामुळे जनावरांना रक्तक्षय होतो. तसेच काही प्रजातींचे गोचिड जनावरांच्या रक्तामध्ये विषारी पदार्थ सोडतात, त्यामुळे जनावरांना लकवादेखील होऊ शकतो. जनावरांमध्ये बबेसियोसीस, थायलेरियोसीस ऍनाप्लास्मोसीस या आजारांचे संक्रमण होते.

लक्षणे

 1. जनावरांची भूक मंदावते आणि दुग्धोत्पादनात लक्षणीय घट होते.
 2. गोचिड ताप या आजारामध्ये जनावरांना सडकून ताप येतो, जनावरांच्या लसीकाग्रंथी आणि यकृताला सूज येते. रक्तातील लाल पेशींचे प्रमाण कमी होऊन रक्तक्षय होतो.
 3. जनावरांना कॉफीच्या रंगासारखी लघवी होते, काही वेळा कावीळसुद्धा होते.
 4. जनावरे धापा टाकतात.

उपाययोजना

 1. गोठ्याची आणि जनावरांची स्वच्छता ठेवावी. दर पंधरा दिवसांनी एकदा जनावरांना स्वच्छ आंघोळ घालावी.
 2. कडुनिंबाच्या पाल्याचे द्रावण, तंबाखूच्या पानांचा अर्क गोठ्यामध्ये फवारून गोठा स्वच्छ करावा. त्यामुळे गोचिडांवर नियंत्रण मिळविता येते.
 3. गोठ्यामध्ये जर भिंतींना चिरा पडलेल्या असतील तर डांबराचा लेप देऊन बुजवून टाकाव्यात.
 4. गोठ्यातील भिंतींना चुना मारावा, ज्यामुळे मादी गोचिडांना गोठ्यामध्ये अंडी घालायला सोयिस्कर जागा उपलब्ध राहणार नाही.
 5. गोठ्यातील जनावरे बाहेर काढून गोठ्यामध्ये असलेल्या फटी मशालीच्या वापराने जाळून टाकाव्यात. त्यामुळे तेथे लपलेल्या गोचिडांच्या इतर अवस्था जळून जातील.
 6. जनावरांच्या अंगावर असणारी गोचिडांचे डिंबके ही जवळपासच्या कुरणांमधल्या गवतावर व झुडपांवर असतात. त्यामुळे अशा बाधित कुरणांमध्ये व्यवस्थित नांगरणी करून घेतली असता, जनावरांना गोचिडांचा होणारा संसर्ग टाळता येऊ शकतो.
 7. चराऊ कुरणांमध्ये स्टायलोझॅन्थेस, पेनीसेटम या प्रजातींचे गवत किंवा झुडपे लावल्यास त्यांच्या गोचिडविरोधी वासामुळे गोचिडांना कुरणापासून दूर ठेवता येऊ शकते.
 8. विदेशामध्ये गोचिड ताप पसरविणाऱ्या काही जातींच्या गोचिडांच्या नियंत्रणासाठी लस उपलब्ध आहे. आपल्या देशामध्ये अजून अशा प्रकारची लस व्यावहारिकदृष्ट्या उपलब्ध नाही; पण नजीकच्या काळात आयव्हीआरआय या संस्थेकडून अशा प्रकारची लस उपलब्ध होण्याची शक्‍यता आहे.

 

संपर्क : डॉ. जगदीश गुडेवार : 9730066847
(लेखक मुंबई पशुवैद्यक महाविद्यालय, परळ, मुंबई येथे कार्यरत आहेत)

स्त्रोत: अग्रोवन

3.03636363636
lengare kaka Sep 05, 2016 10:25 PM

बुटलेक्स इंजेकशन दिल्यानंतरही जनावराचा ताप कमी होत नाही तरी उपाय सुचवावा .

आपल्या सूचना पोस्ट करा

(वरील विषयासाठी जर तुमच्या काही प्रतिक्रिया किंवा सूचना असतील तर या ठिकाणी नोंदवा)

Enter the word
नेवीगेशन

T5 2019/06/24 16:39:23.769003 GMT+0530

T24 2019/06/24 16:39:23.775645 GMT+0530
Back to top

T12019/06/24 16:39:22.533546 GMT+0530

T612019/06/24 16:39:22.657239 GMT+0530

T622019/06/24 16:39:22.700490 GMT+0530

T632019/06/24 16:39:22.701338 GMT+0530