Skip to content. | Skip to navigation

Vikaspedia


T2 2019/06/27 09:29:57.166454 GMT+0530
मुख्य / शेती / पशूपालन / गुरे पालन / गोठ्यामध्ये ठेवा स्वच्छता
शेअर करा

T3 2019/06/27 09:29:57.171905 GMT+0530
Views
  • स्थिती: संपादनासाठी खुला

T4 2019/06/27 09:29:57.201066 GMT+0530

गोठ्यामध्ये ठेवा स्वच्छता

जनावरांचे आरोग्य चांगले ठेवायचे असेल तर गोठ्यामध्ये स्वच्छता ठेवणे फार महत्त्वाचे आहे. जनावरे आणि गोठ्यातील स्वच्छतेमुळे परजीवींचा प्रादुर्भाव नियंत्रित राहतो.

जनावरांचे आरोग्य चांगले ठेवायचे असेल तर गोठ्यामध्ये स्वच्छता ठेवणे फार महत्त्वाचे आहे. जनावरे आणि गोठ्यातील स्वच्छतेमुळे परजीवींचा प्रादुर्भाव नियंत्रित राहतो.

  1. गोचिड नियंत्रण - गोचिड आपली अंडी गोठ्यातील गव्हाणी, कपारीमध्ये घालतात. या जागेची स्वच्छता करावी. गोचिडाची अंडी गोळा करून गोठ्याच्या बाहेर शेकोटीमध्ये जाळून टाकावीत. हा उपाय आठवड्याच्या अंतराने तीन वेळेस प्रत्येक हंगामामध्ये करावा. यामुळे कमी खर्चात गोचिड निर्मूलन करता येते.
  2. पिसवा नियंत्रण - जनावरांना चावणाऱ्या पिसवा आपला जीवनक्रम गोठ्यातील जाळे, जळमटे यांमध्ये पूर्ण करतात. गोठ्याची स्वच्छता केल्याने त्यांचे जीवनचक्र तुटते, त्यामुळे गोठ्यात पिसवांचा प्रादुर्भाव कमी होतो.
  3. उवा नियंत्रण - जनावरांच्या शरीराची स्वच्छता करावी. उवा त्यांची अंडी जनावरांच्या केसावर घालतात. हे लक्षात घेऊन ठराविक काळानंतर म्हशी भादराव्यात. घोड्यांना खरारा करावा. मेंढ्यांची योग्य काळात लोकर कापावी. जनावरांच्या शरीराची स्वच्छता ठेवावी.
  4. खरूज - जनावरांना खरजेचा प्रादुर्भाव झाला असेल तर ती जनावरे गोठ्यातील खरबडीत जागेवर शरीर घासतात. त्या वेळेस त्यांची अंडी तिथे पडतात. या अंड्यांचा इतर निरोगी जनावरांना स्पर्श झाल्यास खरजेचा झपाट्याने प्रसार होतो.
  5. कीटकवर्गीय माश्‍यांचे नियंत्रण - घरगुती माशी, स्टेबल फ्लाय, लापरोझिया, हिप्पोबोस्का या माश्‍या शेण, मलमूत्र यामध्येच अंडी घालून जीवनचक्र पूर्ण करतात. गोठ्यात पडलेले शेण, मलमूत्र व मूत्राने व्याप्त चारा उचलून शेणाच्या ढिगाऱ्यामध्ये कुजवल्यास या कीटकांचे जीवनचक्र पूर्ण होत नाही. परिणामी त्यांचा प्रादुर्भाव कमी होतो.
  6. आंत्रकृमींचे नियंत्रण - गाय, म्हैस विशेषतः शेळी, मेंढीमध्ये आंत्रकृमीची लागण झाल्यास कृमीची अंडी शेणाद्वारा बाहेर पडतात. हे लक्षात घेऊन गोठ्यामध्ये शेणाचा ढीग न ठेवता गोठा स्वच्छ करून गोठ्यापासून लांब ढिगाऱ्यामध्ये शेण कुजवल्यास कृमीची अंडी नष्ट होतात, त्यामुळे जनावरांतील आंत्रकृमींच्या प्रादुर्भावावर नियंत्रण मिळविणे शक्‍य होते. जंतनाशक पाजण्यावरील खर्च, वेळ वाचविता येतो.
  7. करडे, वासरातील रक्ती हगवण - लहान वयातील करडे व वासरे यांना आयमेरिया या आदिजीवीची लागण होते. मातीमध्ये त्यांची अंडी असतात. वासरे, करडांनी ही माती चाटल्यास ती त्यांच्या पोट्यात जातात. हे लक्षात घेऊन गोठ्याची स्वच्छता ठेवावी. ओलसर जागेवर सातत्याने चुना भुकटीचा वापर करावा.
  8. कोंबड्यातील रक्ती हगवण - ब्रॉयलर कोंबड्यांना आयमेरिया या आदिजीवीची लागण होते. याची लागण लिटरसाठी वापरलेल्या भुश्‍श्‍यातून होते म्हणून लिटरची स्वच्छता ठेवावी. लिटरमध्ये चुना भुकटीचा वापर करावा. प्रत्येक बॅचनंतर गादी बदलावी. शेडची स्वच्छता ठेवावी.
  9. कोंबडी शेडमधील घरगुती माशीचे नियंत्रण - कीटकवर्गीय माश्‍या आपली अंडी कोंबड्यांच्या विष्टेमध्ये घालतात. हे लक्षात घेऊन पोल्ट्रीशेडची स्वच्छता ठेवावी.

 

संपर्क - डॉ. नरळदकर, 9403847764. (संध्याकाळी 6 ते रात्री 8). 
(लेखक पशुवैद्यक व पशुविज्ञान महाविद्यालय, परभणी येथे कार्यरत आहेत)

स्त्रोत: अग्रोवन

3.03773584906
सुलेमान पठाण Sep 01, 2015 03:43 PM

शेलीच्या खरूज या रोगावर काय उपचार आहे.

आपल्या सूचना पोस्ट करा

(वरील विषयासाठी जर तुमच्या काही प्रतिक्रिया किंवा सूचना असतील तर या ठिकाणी नोंदवा)

Enter the word
नेवीगेशन

T5 2019/06/27 09:29:57.444840 GMT+0530

T24 2019/06/27 09:29:57.450580 GMT+0530
Back to top

T12019/06/27 09:29:57.070296 GMT+0530

T612019/06/27 09:29:57.089246 GMT+0530

T622019/06/27 09:29:57.155823 GMT+0530

T632019/06/27 09:29:57.156797 GMT+0530