Skip to content. | Skip to navigation

Vikaspedia


T2 2019/06/24 17:37:46.578801 GMT+0530
मुख्य / शेती / पशूपालन / गुरे पालन / जनावरांसाठी पूरक खाद्य मिश्रणे
शेअर करा

T3 2019/06/24 17:37:46.584297 GMT+0530
Views
  • स्थिती: संपादनासाठी खुला

T4 2019/06/24 17:37:46.616151 GMT+0530

जनावरांसाठी पूरक खाद्य मिश्रणे

उन्हाळ्यातील चारा कमतरतेचा परिणाम दुग्धोत्पादनावर होतो. सध्याच्या काळात धान्य मिश्रित खाद्य, ऊस चिपाडे, पीक अवशेषांपासून पूरक खाद्य मिश्रण तयार करणे आवश्‍यक आहे.

उन्हाळ्यातील चारा कमतरतेचा परिणाम दुग्धोत्पादनावर होतो. सध्याच्या काळात धान्य मिश्रित खाद्य, ऊस चिपाडे, पीक अवशेषांपासून पूरक खाद्य मिश्रण तयार करणे आवश्‍यक आहे. पशुतज्ज्ञांच्या सल्ल्याने खाद्य मिश्रण तयार करून त्याचा उपयोग चाराटंचाईच्या काळात करावा.

योग्य खाद्याअभावी जनावरांची वाढ खुंटते, प्रजोत्पादनावर परिणाम होतो. दूध, मांस उत्पादनात घट येते, विविध आजार होतात. हे लक्षात घेऊन जनावरांच्या आहारात पुरेसा चारा, खाद्य मिश्रणांचा वापर करावा. उन्हाळ्यात हिरव्या चाऱ्‍याची कमतरता असते. या काळात आपल्याला जनावरांच्या आरोग्य व्यवस्थापनासाठी पूरक खाद्य मिश्रण तयार करणे आवश्‍यक आहे.

धान्य मिश्रित खाद्य

वाढत्या व दुधाळ जनावरांसाठी वाळलेला कडबा, गवत, तूस आणि धान्य यांचे ५०-५० मिश्रण करून घ्यावे. ते जनावरांना खायला द्यावे. दररोज एका जनावराला दूध उत्पादनानुसार हे खाद्य मिश्रण द्यावे. यामुळे जनावरांची भूक वाढते, चाऱ्याची पचनीयता वाढते.

उसाच्या चिपाडांचा वापर

रस काढल्यानंतर उसाची चिपाडे फेकून दिली जातात. अशा चिपाडांचा वापर पूरक खाद्यनिर्मितीसाठी करता येतो. यासाठी ऊस चिपाड - ७० किलो, मळी १५ किलो, सरकी पेंड- १० किलो, युरिया-२ किलो, क्षार मिश्रण - २ किलो, मीठ-१ किलो अशा पद्धतीने शंभर किलो खाद्य मिश्रण करावे. हे खाद्य मिश्रण दररोज चाऱ्यासोबत मोट्या जनावरांना अडीच किलो इतके द्यावे.

पिकांच्या अवशेषापासून पूरक खाद्य

ज्वारी, मक्याची चिपाडे, सूर्यफूल, शेंगदाण्याचा भुसा, भुईमुगाची टरफले, जंगली गवत याचा उपयोग १२ ते १५ टक्के प्रथिने असलेले खाद्य बनविता होतो. या पदार्थातील गंधक व स्फुरद खाद्याची पचनीयता वाढविणासाठी मदत करते.

शंभर किलो खाद्य मिश्रणासाठी प्रमाण


पीक अवशेष - २५ किलो
शेंगाची टरफले - २५ किलो
गव्हाचा कोंडा - २० किलो
मका भरडा - १८ किलो
भुईमूग पेंड  ९ किलो
क्षार मिश्रण - २ किलो
मीठ - १ किलो

 

झाडपाल्यापासून खाद्य

उन्हाळ्यात पिंपळ, कडुनिंब, बाबूळ, बोर अशा झाडांची पाने हिरवी असतात. शेळ्या-मेंढ्यासाठी अशा झाडांचा पाला खाद्याचा घटक म्हणून वापरता येतो. अशा झाडपाल्यापासून खालीलप्रमाणे पूरक खाद्य बनवावे.

शंभर किलो पूरक खाद्य मिश्रणासाठी प्रमाण

झाडपाला - ५० किलो
भुईमूग पेंड - ५ किलो
बाबूळ शेंगा - २६ किलो
गूळ किंवा मळी - १५ किलो
युरिया - १ किलो
क्षार मिश्रण - २ किलो
मीठ - १ किलो

टीप - दररोज एका शेळी, मेंढीसाठी चाऱ्यासोबत एक किलो खाद्यमिश्रण द्यावे.
टीप - खाद्य मिश्रणात युरियाचा वापर शिफारशी इतकाच करावा.

संपर्क - डॉ. गणापुरे - ७५८८३१८२०५
(लेखक कृषी विज्ञान केंद्र, नंदुरबार येथे कार्यक्रम सहायक म्हणून कार्यरत आहेत)

स्त्रोत: अग्रोवन

2.8064516129
सतीश पवार Jan 24, 2018 02:54 PM

खनिज पदार्थ म्हणजे काय? व ते कशा पासुन बनते

सतीश पवार Jan 24, 2018 02:50 PM

खनिज पदार्थ म्हणजे काय? व ते कशा पासुन बनते

प्रविण Oct 30, 2017 01:03 AM

युरीया खत वापरायचा का ?

kashinath savanji May 28, 2016 10:32 AM

मला पशुखाद्य करायची आहे तरी मार्गमार्गदर्शन पाहिजे

आपल्या सूचना पोस्ट करा

(वरील विषयासाठी जर तुमच्या काही प्रतिक्रिया किंवा सूचना असतील तर या ठिकाणी नोंदवा)

Enter the word
नेवीगेशन

T5 2019/06/24 17:37:46.890672 GMT+0530

T24 2019/06/24 17:37:46.897251 GMT+0530
Back to top

T12019/06/24 17:37:46.364389 GMT+0530

T612019/06/24 17:37:46.392611 GMT+0530

T622019/06/24 17:37:46.568074 GMT+0530

T632019/06/24 17:37:46.568992 GMT+0530