Skip to content. | Skip to navigation

Vikaspedia


T2 2019/10/17 06:13:16.724729 GMT+0530
मुख्य / शेती / पशूपालन / गुरे पालन / जनावरांच्या खाद्यात मिसळा ऍझोला
शेअर करा

T3 2019/10/17 06:13:16.730725 GMT+0530
Views
 • स्थिती: संपादनासाठी खुला

T4 2019/10/17 06:13:16.761465 GMT+0530

जनावरांच्या खाद्यात मिसळा ऍझोला

दुधाळ जनावरांच्या खुराकावरचा खर्च कमी करण्याचा सोपा पर्याय म्हणजे ऍझोलाचा वापर. कमी जागेत ऍझोलाचे उत्पादन घेता येते. शिफारशीत प्रमाणात जनावरांच्या आहारात ऍझोलाचा वापर फायदेशीर ठरतो.

दुधाळ जनावरांच्या खुराकावरचा खर्च कमी करण्याचा सोपा पर्याय म्हणजे ऍझोलाचा वापर. कमी जागेत ऍझोलाचे उत्पादन घेता येते. शिफारशीत प्रमाणात जनावरांच्या आहारात ऍझोलाचा वापर फायदेशीर ठरतो.
ऍझोला ही पाण्यावर वाढणारी शैवालवर्गीय वनस्पती आहे. जनावरांच्या खाद्यामध्ये त्याचा पूरक म्हणून वापर करण्यात येतो.

 • झाडाच्या सावलीत नऊ फूट लांब, सहा फूट रुंद आणि नऊ इंच खोलीचा खड्डा करावा.
 • हा खड्डा चांगल्या प्रतिच्या प्लॅस्टिक कागदाने आच्छादून घ्यावा, त्यामुळे पाणी झिरपणार नाही.
 • खड्ड्यातील प्लॅस्टिक कागदावर 15 किलो माती पसरवून घ्यावी. त्यावर तीन किलो चांगले कुजलेले गाईचे शेण पसरावे. साधारणपणे 40 ग्रॅम सिंगल सुपर फॉस्फेट 10 लिटर पाण्यात चांगले मिसळून हे मिश्रण खड्ड्यात सोडावे. खड्ड्यात 8 ते 10 सें.मी. पाणी राहील याची काळजी घ्यावी. तयार खड्ड्यातील पाण्यात अर्धा ते एक किलो ऍझोलाचे कल्चर सोडावे. साधारणपणे 10 दिवसांत खड्डा ऍझोलाने भरून जातो.
 • जनावरांच्या संख्येनुसार शेतकऱ्यांनी एकापेक्षा अधिक खड्डे तयार करावेत.

ऍझोलातील विविध घटक

 • शुष्क ऍझोलात प्रथिने (25 ते 35 टक्के), आवश्‍यक अमिनो आम्ले (7 ते 10 टक्के) जीवनसत्त्वे, खनिज (कॅल्शियम, फॉस्फरस, पोटॅशियम, लोह, तांबे, मॅग्नेशिअम) 10 ते 15 टक्के असतात.
 • ऍझोलामध्ये उच्च दर्जाची प्रथिने व लिग्नीन अत्यल्प प्रमाणात असल्याने ऍझोला जनावरे सहज पचवू शकतात.

ऍझोलाचे फायदे

 • दुग्ध उत्पादनात 15 ते 20 टक्के (अर्धा ते एक लिटर प्रति जनावर) वाढ होते.
 • प्रचलित पशुखाद्यावरील खर्च 20 ते 25 टक्‍क्‍यांनी कमी होतो.
 • दुभत्या जनावरांसोबत कोंबड्या, शेळ्या, मेंढ्या, वराह यांच्या आहारात याचा वापर फायदेशरीर दिसून आला आहे.
 • ऍझोला उत्पादनावरील खर्च अत्यंत कमी असून त्या तुलनेत ऍझोला उत्पादन अधिक आहे.
 • कमी जागेत उत्पादन घेता येते, प्रकल्प सुरू करावयास लागणारी गुंतवणूक ही कमी आहे, दुधाची गुणवत्ता वाढते, जनावरांची प्रकृती सुधारून आयुष्यमानही वाढते.
 • जनावरांना ऍझोला देण्याची पद्धत आणि प्रमाण ः
 • जनावरांच्या आहारात किंवा इतर खुराकात ऍझोला जसेच्या तसे मिसळून देता येते. दुधाळ जनावरांना रोजच्या आहारात 2 ते 3 किलो ऍझोला वापरावे. जनावरांच्या आहारात ऍझोला देण्यापूर्वी स्वच्छ धुऊन घ्यावे.

ऍझोलाचे व्यवस्थापन

 • खड्ड्याची जागा भरपूर सूर्यप्रकाश मिळणारी असावी.
 • दर 25 ते 30 दिवसांनी खड्ड्यातील पाच टक्के माती ताज्या काळ्या मातीने बदलावी.
 • ऍझोलाचे वाळवी, मुंग्या, किडे यांपासून संरक्षण करावे.
 • दर पाच दिवसांनी खड्ड्यातील 30 टक्के जुने पाणी काढून त्यात ताजे पाणी मिसळावे.
 • खड्ड्यातील पाण्याची पातळी कायम 10 सें.मी. ठेवावी.
 • उन्हाळ्यातील कडक उन्हामुळे ऍझोलाचा रंग हिरवट तांबडा किंवा विटकरी होतो. त्याच्या वाढीवर परिणाम होतो.
 • ऍझोलानिर्मिती खड्ड्याच्या गारव्याला कुत्रे व अन्य प्राणी येऊन बसतात, त्यांच्या नियंत्रणासाठी खड्ड्याच्या बाजूने खांब रोवून दोरी, कापड किंवा गॅबियन जाळीचे कुंपण करावे.
 • झाडाखाली खड्डा केला असल्यास ऍझोलाच्या खड्यात पालापाचोळा पडून कुजल्याने ऍझोला खराब होऊ शकतो. त्यासाठी खड्ड्यावरून आच्छादन आवश्‍यक आहे.
 • शेण उपलब्ध आहे म्हणून अधिक वापर होतो, त्यामुळे अमोनिया निर्माण होऊन त्याचा वास ऍझोलाला येतो, त्यामुळे योग्य प्रमाणात शेणखत खड्ड्यातील पाण्यात मिसळावे.
 • पावसाळ्यात पावसाचे पाणी खड्ड्यात मिसळून ऍझोला वाहून जाऊ शकतो. त्यामुळे अधिक पावसाच्या ठिकाणी खड्डे अधिक उंचावर करावेत किंवा विटाच्या साह्याने नऊ इंची टाकी करावी.
 • पावसापासून संरक्षणासाठी खड्ड्यावर छत म्हणून 50 टक्के शेडनेटचा वापर करावा.


संपर्क ः कपिल इंगळे ः 8380984068.
(लेखक कृषी विज्ञान केंद्र, सगरोळी, जि. नांदेड येथे कार्यरत आहेत)

स्त्रोत: अग्रोवन

 

3.10204081633
तारकाचिह्नांवर जा आणि मूल्यांकन देण्यासाठी क्लिक करा
आपल्या सूचना पोस्ट करा

(वरील विषयासाठी जर तुमच्या काही प्रतिक्रिया किंवा सूचना असतील तर या ठिकाणी नोंदवा)

Enter the word
नेवीगेशन

T5 2019/10/17 06:13:17.010013 GMT+0530

T24 2019/10/17 06:13:17.016709 GMT+0530
Back to top

T12019/10/17 06:13:16.621005 GMT+0530

T612019/10/17 06:13:16.639934 GMT+0530

T622019/10/17 06:13:16.712596 GMT+0530

T632019/10/17 06:13:16.713657 GMT+0530