Skip to content. | Skip to navigation

Vikaspedia


T2 2019/06/26 11:29:25.662605 GMT+0530
मुख्य / शेती / पशूपालन / गुरे पालन / खुरांतील आजारावर उपचार
शेअर करा

T3 2019/06/26 11:29:25.668282 GMT+0530
Views
  • स्थिती: संपादनासाठी खुला

T4 2019/06/26 11:29:25.700673 GMT+0530

खुरांतील आजारावर उपचार

जनावरांच्या खुरांतील आजारावर काय उपचार करावेत याबाबतची माहिती येथे देण्यात आलेली आहे.

जनावरांमध्ये खुरांचे संसर्गजन्य आजार प्रामुख्याने आढळतात. या आजारांचा परिणाम जनावरांच्या दूध उत्पादनावर होतो. गोठ्यातील अस्वच्छता, दलदल आणि खडबडीत पृष्ठभाग या गोष्टी खुरांच्या आजारास कारणीभूत ठरतात.

उपाययोजना

1) जनावरांचे खूर कोरडे आणि स्वच्छ ठेवणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

2) गोठ्यातील मल-मूत्र वेळच्या वेळी साफ करावे. गोठ्यात पाणी साठू देऊ नये. सांडपाण्याची नीट व्यवस्था करावी.

3) गोठ्यामध्ये जाड थराचे भुश्‍शाचे बेडिंग तयार केले असता जनावरांच्या पायाचा संबंध शेण-मूत्राशी येत नाही, तसेच भुश्‍शाच्या थरामुळे खुरांची साफसफाई आपोआपच होऊन जाते.

4) गोठ्याच्या स्वच्छतेबरोबरच खुरांचे आणि गोठ्याचे निर्जंतुकीकरण नियमित केल्यास खुरांचे आजार कमी होतात. जसे आपण कासेचा दाह टाळण्यासाठी टीट डिपिंग करतो, त्याचप्रमाणे फूट बाथिंग करणे खुरांचे आजार टाळण्यास अत्यंत फायदेशीर ठरते. यासाठी शुद्ध पाणी किंवा साबणाचे पाणी, तसेच जंतुनाशकाच्या पाण्याची फवारणी गोठ्यात करावी.

5) खुरांच्या आरोग्यामध्ये वेळच्या वेळी खुरे कापून घेणे हा महत्त्वाचा भाग आहे. खुरांच्या झालेल्या कमी-जास्त वाढीमुळे जनावरास सर्व पायांवर संतुलित भार पेलणे कठीण जाते, त्यामुळे खुरांच्या आजारास जनावर लवकर बळी पडते.

6) एखादी गाय, जनावर लंगडत असल्यास त्याच्याकडे दुर्लक्ष न करता पशुवैद्यकाच्या सल्ल्यानेच उपचार करावेत.

संपर्क - डॉ. गायकवाड - 9004226664
क्रांतिसिंह नाना पाटील पशुवैद्यक महाविद्यालय, शिरवळ, जि. सातारा.

स्त्रोत: अग्रोवन

3.04166666667
आपल्या सूचना पोस्ट करा

(वरील विषयासाठी जर तुमच्या काही प्रतिक्रिया किंवा सूचना असतील तर या ठिकाणी नोंदवा)

Enter the word
नेवीगेशन

T5 2019/06/26 11:29:25.953307 GMT+0530

T24 2019/06/26 11:29:25.959893 GMT+0530
Back to top

T12019/06/26 11:29:25.562181 GMT+0530

T612019/06/26 11:29:25.582796 GMT+0530

T622019/06/26 11:29:25.651880 GMT+0530

T632019/06/26 11:29:25.652846 GMT+0530