Skip to content. | Skip to navigation

Vikaspedia


T2 2019/06/26 12:05:6.158028 GMT+0530
मुख्य / शेती / पशूपालन / गुरे पालन / जनावरांच्या तोंडातील जखम
शेअर करा

T3 2019/06/26 12:05:6.164260 GMT+0530
Views
  • स्थिती: संपादनासाठी खुला

T4 2019/06/26 12:05:6.197613 GMT+0530

जनावरांच्या तोंडातील जखम

चारा खाताना एखादी तार, सुई, खिळा, पत्रा किंवा कोणतीही जखम करू शकणारी वस्तू चाऱ्यात असल्यास तोंडात जखम होऊ शकते.

जनावरांना तोंडात जखम कशी होते व त्याने काय होते


जनावरांना अधाशीपणे चारा खाण्याची सवय असते. चारा खाताना एखादी तार, सुई, खिळा, पत्रा किंवा कोणतीही जखम करू शकणारी वस्तू चाऱ्यात असल्यास तोंडात जखम होऊ शकते. काही भागांत जनावरांना उसाचे वाढे चारा म्हणून देतात, अशा हिरव्या वाढ्यांमुळेही तोंडात जखमा झाल्याचे आढळते. त्याचप्रमाणे कडक, न चावल्या जाणाऱ्या चाऱ्यामुळे तोंडात जखम होऊ शकते. लाळ्या खुरकूत, तोंड येणे व बुळकांडी अशा रोगांतही तोंडात व्रण तयार होतात. तोंडातील मऊ त्वचा मृत होऊन गळण्यास सुरवात होते. बऱ्याच वेळा क्षारांच्या कमतरतेमुळे किंवा सवय म्हणून मोठ्या- जनावरांनाही अखाद्य वस्तू उदा. खडे, चामडे चघळण्याची सवय असते, त्यामुळे तोंडात जखमा होतात व व्रण तयार होतात.

तोंडात जखम झाल्यावर जनावर लाळ गाळते, जनावरास चारा खाता येत नाही, वेदना होतात, तोंडातील जखमांवर रोगजंतूंचा प्रादुर्भाव होतो व तोंडाची दुर्गंधी येते. अन्न न घेतल्याने जनावर भुकेलेले राहते, वजन घटते, उत्पादनावर विपरीत परिणाम होतो. बऱ्याच वेळा तोंडातील जखमांमधून रोगजंतूंचा प्रादुर्भाव होऊन लाकडी जीभ किंवा तोंडात बेंड, गळू येणे असे प्रकारही होऊ शकतात.

उपाय योजना


तोंडात जखम झाली असेल, तर त्यास पोटॅशिअम परमॅंगनेटच्या सौम्य द्रावणाने किंवा खाण्याच्या सोड्याच्या सौम्य द्रावणाने प्रथम धुऊन घ्यावे. यासाठी एक लिटर पाण्यात चिमूटभर (एक ते दोन ग्रॅम) पोटॅशिअम परमॅंगनेट, तर एक लिटर पाण्यात (दहा ग्रॅम) खाण्याचा सोडा टाकून द्रावण तयार करावे. तोंडाच्या स्वच्छतेनंतर हळद (30 ग्रॅम) आणि लोणी यांचे मलम करून तोंडात लावावे. उपचारासोबत जनावरांना मऊ चारा द्यावा. गरजेनुसार प्रतिजैविके, वेदनाशामके व जीवनसत्त्वाचे इंजेक्‍शन द्यावे. जनावरांना आराम द्यावा. 

संपर्क - डॉ. गिरीश यादव - 
पशुवैद्यकीय महाविद्यालय, मुंबई

बी. एस. काजळे, कोयनानगर, जि. सातारा

माहिती संदर्भ :अॅग्रोवन

2.89090909091
आपल्या सूचना पोस्ट करा

(वरील विषयासाठी जर तुमच्या काही प्रतिक्रिया किंवा सूचना असतील तर या ठिकाणी नोंदवा)

Enter the word
नेवीगेशन

T5 2019/06/26 12:05:6.530782 GMT+0530

T24 2019/06/26 12:05:6.537631 GMT+0530
Back to top

T12019/06/26 12:05:6.069690 GMT+0530

T612019/06/26 12:05:6.097797 GMT+0530

T622019/06/26 12:05:6.145604 GMT+0530

T632019/06/26 12:05:6.146560 GMT+0530