Skip to content. | Skip to navigation

Vikaspedia


T2 2019/10/18 13:49:8.679134 GMT+0530
मुख्य / शेती / पशूपालन / गुरे पालन / लाळ्या खुरकूत रोगाचे नियंत्रण
शेअर करा

T3 2019/10/18 13:49:8.689172 GMT+0530
Views
  • स्थिती: संपादनासाठी खुला

T4 2019/10/18 13:49:8.720358 GMT+0530

लाळ्या खुरकूत रोगाचे नियंत्रण

हा रोग खूर विभागलेल्या जनावरांना होतो. हा रोग प्रामुख्याने सांसर्गिक पाणी व खाद्य खाल्ल्याने होतो.

प्रस्तावना

 

सर्वसाधारणपणे डिसेंबरपासून ते जून महिन्यापर्यंत बऱ्याच भागांत लाळ्या खुरकुताच्या साथी येतात. हा रोग खूर विभागलेल्या जनावरांना होतो. हा रोग प्रामुख्याने सांसर्गिक पाणी व खाद्य खाल्ल्याने होतो. याची लक्षणे म्हणजे जनावरांचे खाणे- पिणे बंद होते. जनावरांस ताप येतो. दुधाळ जनावरांत दूधउत्पादनात घट येते. काही वेळेस उत्पादनक्षमता कायमची नष्ट होण्याची शक्‍यता असते. जनावरांच्या जिभेवर, टाळूवर व तोंडाच्या आतील भागात फोड येतात. जनावरांच्या तोंडातून चिकट तारेसारखी लाळ गळते. पुढील पायांमध्ये खुरातील बेचकीध्ये फोड येतात व जनावरांना मागील पायांत फोड तयार झाल्यास अपंगत्व येते. पायाने अधू असलेले पीडित जनावर रोगग्रस्त पाय सारखे झटकत असतात.

प्रतिबंधात्मक उपाय


1) या रोगाच्या साथीच्या काळात रोगी जनावरे कुरणात चरण्यासाठी जाऊ देऊ नयेत. रोगाचा प्रसार लाळेतून होत असल्याने रोगी जनावरांनी खाल्लेला चारा इतर जनावरांना खाऊ देऊ नये. 
2) रोगी जनावरे निरोगी जनावरांपासून वेगळी करावीत. त्यांच्यावर औषधोपचार करावा. 
3) रोगी जनावरांना सार्वजनिक ठिकाणी पाणी न पाजता वेगळ्या ठिकाणी पाणी पाजावे. रोगी जनावरांची बांधण्याची जागा रोज किमान एकदा जंतुनाशकाने धुवावी. 
4) जनावरांची दूध काढण्याची भांडी धुण्याच्या सोड्याने व गरम पाण्याने धुऊन घ्यावीत म्हणजेच त्यांचे निर्जंतुकीकरण होईल व रोगप्रसार टळेल. 
5) साथीच्या काळात जनावरे भरवत असताना आपले जनावर व भरविण्यासाठी वापरले जाणारे जनावर लाळ्या खुरकूतग्रस्त नाही याची काळजी घ्यावी. 
6) लाळ्या खुरकूत रोगावर लसीकरण हाच एकमेव उपाय आहे. सर्व जनावरांना लसीकरण केल्यास हा रोग शक्‍यतो होत नाही. या रोगाची लस वर्षातून दोन वेळा जनावरांना द्यावी. पहिली मात्रा सप्टेंबरमध्ये व दुसरी मात्रा मार्चमध्ये द्यावी.

 

महेंद्र मोटे - 9420947178

दिलीप तांबे, वाळुंज, जि.नगर

माहिती संदर्भ :अॅग्रोवन

 

2.91666666667
Santosh Pingale Dec 20, 2014 05:23 PM

पायातील नाख्यामधील खुरकुद झाल्यानंतर काय उपाय करावे?

आपल्या सूचना पोस्ट करा

(वरील विषयासाठी जर तुमच्या काही प्रतिक्रिया किंवा सूचना असतील तर या ठिकाणी नोंदवा)

Enter the word
नेवीगेशन

T5 2019/10/18 13:49:9.010780 GMT+0530

T24 2019/10/18 13:49:9.018693 GMT+0530
Back to top

T12019/10/18 13:49:8.591353 GMT+0530

T612019/10/18 13:49:8.619755 GMT+0530

T622019/10/18 13:49:8.667273 GMT+0530

T632019/10/18 13:49:8.668175 GMT+0530