Skip to content. | Skip to navigation

Vikaspedia


T2 2019/10/17 18:04:16.539853 GMT+0530
मुख्य / शेती / पशूपालन / गुरे पालन / जनावरांतील संसर्गजन्य रोगांवरील उपचार व लसीकरण
शेअर करा

T3 2019/10/17 18:04:16.545209 GMT+0530
Views
 • स्थिती: संपादनासाठी खुला

T4 2019/10/17 18:04:16.575330 GMT+0530

जनावरांतील संसर्गजन्य रोगांवरील उपचार व लसीकरण

पशुपालन व्यावसायामध्ये पशुपालकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. जागतिक बाजारपेठेतील स्पर्धेत टिकण्यासाठी दुग्धजन्य काळजी घेणे फार महत्वाचे आहे. जनावरांतील काही महत्वाचे रोग व त्यांवरील उपचारांविषयी आपण सविस्तर माहिती पाहूया.

पशुपालन व्यावसायामध्ये पशुपालकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. जागतिक बाजारपेठेतील स्पर्धेत टिकण्यासाठी दुग्धजन्य काळजी घेणे फार महत्वाचे आहे. जनावरांतील काही महत्वाचे रोग व त्यांवरील उपचारांविषयी आपण सविस्तर माहिती पाहूया.

अ) संसर्गजन्य रोग : हे रोग मुख्यतः विषाणू आणि जिवाणूंमुळे होतात. निरोगी जनावरांच्या शरीरात श्वसन, चारा, पाणी, सड, आजारी जनावराशी संपर्क आणि माणसांद्वारे रोगकारक जंतू प्रवेश करतात. जनावरांतील संसर्गजन्य रोग टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून नियमित लसीकरण करून घ्यावे. यामध्ये अँथेक्स, काळा पाय, लाळ्या-खुरकत रोग, बुळकांडी रोग, स्तनदाह व पायकूज यांचा समावेश होतो.

१) अॅश्रेक्स : गाईमध्ये सर्वांत जास्त प्रमाणात आढळणारा हा रोग असून घातकही आहे. या रोगामुळे जनावर जास्त दिवस जिवंत राहत नाही. हा रोग मोठे बीजाणू तयार करणा-या आयताकृती जिवाणूंपासून होतो. रवंथ करणा-या प्राण्यांमध्ये हा रोग जास्त प्रमाणात आढळून येतो. या जिवाणूला बीज तयार करण्यासाठी ऑक्सिजनची आवश्यकता असते. जनावरांमध्ये रोगाची लक्षणे जिवाणूच्या बीजांनी शरीरात प्रवेश केल्यानंतर ३ ते ७ दिवसांनंतर दिसून येतात. जनावरांमध्ये लक्षणे दिसू लागल्यानंतर जनावर दोन दिवसांत मृत पावते. या रोगाचा प्रसार प्रामुख्याने ज्या वेळी जनावरे चरण्यासाठी मोकळ्या कुरणात सोडलेली असतात, त्या वेळी हे बीजाणूश्वासोच्छसाद्वारे शरीरात प्रवेश करतात.

रोगकारक घटक

बेंसिल्स औश्रेक्स लक्षणे

 1. अचानक जनावर मृत पावणे. जनावर सर्वसामान्य दिसत असताना २ ते ३ तासांत मृत पावणे हे प्रमुख लक्षण दिसून येते.
 2. जनावरांना उद्य तापमान, घाबरल्यासारखे दिसणे, पाय तसेच शरीर थरथर कापणे, अशीही काही जनावरे थोड्या बहुत प्रमाणात लक्षणे दाखवतात.
 3. श्वासोच्छुासात येणारा अडथळा, धाप लागणे, जनावर जमिनीवर पडणे, अशी लक्षणे मृत्यूपूर्वी २४ तास दिसून येतात.
 4. जनावर मृत पावल्यानंतर शरीरातील रक्त गोठत नाही. त्यामुळे शरीराच्या उघड्या भागातून जसे की नाक, कान, तोंड यांमधून  रक्तप्रवाह चालू होतो.

उपचार व नियंत्रण

 1. रोगाची लागण झाल्यानंतर जनावर तत्काळ मृत पावत असल्यामुळे आपणाला यावर उपाय करणे शक्य नसते. त्यामुळे रोग होऊ नये, यासाठी प्रतिबंधक उपाययोजना करणे फायद्याचे ठरते.
 2. प्रतिबंधक उपायांमध्ये प्रतिजैविकाचा वापर करण्यात यावा. पेनिसिलीन, टेट्रासायकलीन, इरिथोमायसिन व सिप्रोफ्लोक्झान इत्यादींचा त्यात समावेश होतो.
 3. लाळ्या-खुरकत रोग : लाळ्या-खुरकत रोग हा संसर्गजन्य रोग तापमान तसेच तोंड, सड, खुराच्या मधून स्राव येत राहतो. रोगातून व्यवस्थितरीत्या बाहेर पडलेल्या जनावरांच्या पायाचे खूर खरबरीत व उद्ध्वस्त झाल्यासारखे दिसतात. रोगाचा प्रसार प्रत्यक्ष संपर्काद्वारे किंवा पाणी, शेण, चारा इ.च्या माध्यमातून अप्रत्यक्ष होतो. त्याचप्रमाणे जनावरांचे संगोपन करणा-या व्यक्ती, शेतातील उंदीर, जनावरे, पक्षी इ.च्या माध्यमातूनही प्रसार होतो.

लक्षणे

 1. उच्च ताप (१o४°- १0५° फेंरेनहाईट) येणे.
 2. तोंडाद्वारे तंतुमय अशी लाळ सतत येत राहते.
 3. तोंडावर व आतमध्ये पारदर्शक तंतुमय स्राव दिसू लागतो.
 4. शरीरात थकवा जाणवून अशक्तपणा येणे.
 5. संकरित गाई या रोगास अत्यंत संवेदनशील आहेत.

उपचार

 1. जखमेच्या बाहेरील भागावर पुतिनाशक लावल्यास जखम भरून येण्यास व त्यावरती माश्या बसण्यास प्रतिबंध होतो.
 2. सर्वसामान्य व स्वस्त उपाय म्हणजे जखम स्वच्छ करून घेऊन त्यावरती कोल टार व कॉपर सल्फेटचे ५:१ द्रावण लावणे.
 3. सावधगिरी  अ) जास्त दूध देणा-या दुभत्या गाई व विलायतीतील  ब) दोनदा प्रतिबंधक लसीकरण सहा महिन्यांच्या अंतराने करण्यात यावे. त्यानंतर प्रत्येक वर्षी एक लसीकरण करणे आवश्यक आहे.
 4. रोगाची लागण झालेली जनावरे कळपातून वेगळी करून त्यांच्यावर उपचार करण्यासाठी आपल्या जवळील पशुवैद्यकीय डॉक्टरांना तत्काळ बोलावणे.
 5. ब्लिचिंग पावडर किंवा जंतुनाशक कार्बनिक आम्लाद्वारे जनावरांच्या
 6. रोगाची लागण झालेल्या जनावरांची काळजी घेणा-या व्यक्ती, वापरण्यात येणारी उपकरणे ही वेगवेगळी असावीत. त्यांचा निरोगी जनावरांशी संपर्क येणार नाही, याची दक्षता घ्यावी. तसेच, ही उपकरणे योग्यरीत्या स्वच्छ व निर्जतुकीकरण करावीत.
 7. अतिरिक्त पशुखाद्याची योग्य प्रकारे विल्हेवाट लावावी.

मृत जनावरांची विल्हेवाट योग्य प्रकारे लावावी. माश्या, कीटक यांच्यावर नियंत्रण ठेवावे.

३) बुळकांडी रोग: गाय, म्हैस, शेळी, मेंढी, डुकर इ. प्राण्यांत मुख्यत्वे आढळतो. या रोगाचे विषाणूमुख्यत्वे तोंडातील लाळ, डोळ्यांतून व नाकातून येणारे स्राव, जनावरांचे मल-मूत्र यांमध्ये आढळतात. विषाणू प्राथमिक अवस्थेत शरीरातील रक्तप्रवाहाबरोबर वाहत असतात. सर्वसाधारणपणे विषाणूंचा प्रसार दूषित खाद्य व पाण्याद्वारे होतो. शरीराचे तापमान १o४° ते १o७° फॅरेनहाईटपर्यंत वाढत जाते. डोळे लालसर होऊन त्यातून सतत पाणी येणे, जनावरांच्या तोंडाचा वास येणे, चिकट रक्ताळलेले अतिसार अशी लक्षणे दिसून येतात. उपचार : पेनिसिलीन, स्ट्रेप्टोमायसीन, सल्फोनमाइड, आतडयातील प्रतिरोधक यांचा विषाणूवर कोणताही परिणाम होत नाही. परंतु, जिवाणूंमुळे बुळकांडी रोगासमवेत होणा-या इतर गुंतागुंतीच्या रोगांस प्रतिबंध करण्यास मदत करते.

४) स्तनदाह : जनावरांना शारीरिक ताण किंवा इजा यांमुळेसुद्धा स्तनग्रंथीला सूज येऊ शकते. संसर्गजन्य जिवाणू किंवा इतर सूक्ष्मजीव (बुरशी, किण्व किंवा विषाणू) हे प्राथमिक कास दाहचे कारक असतात. हे सूक्ष्मजीव स्तनांमध्ये आत प्रवेश करून प्रजनन होऊन त्यांची संख्या झपाट्याने वाढते. उपचार : रोगावरील उपचार हा त्याच्या स्थितीवर अवलंबून असतो. प्राथमिक अवस्थेत रोग नियंत्रणात आणणे शक्य होते. अॅकरीफ्लेविन, ग्रॉमीसीडीन, सल्फोमाइड, पेनिसिलीन आणि स्ट्रेप्टोमायसीन ही प्रभावी औषधे उपयुक्त ठरतात.

५) पायकूज : जनावरांच्या पायाच्या खुरांना इजा पोचून त्यामार्फत रोगाची लागण होते. अशा वेळी पशुवैद्याच्या मार्गदर्शनानुसार त्यावर

उपचार करण्यात येऊन त्या जनावरांचे बांधण्याचे ठिकाण कोरडे व

स्वच्छ असावे. त्यामुळे रोगाचा प्रसार कमी होण्यास मदत होईल. जर हा रोग सर्व कळपामध्ये जास्त प्रमाणात आढूळन आल्यास ५ टक्के कॉपर सल्फेट द्रावण करून त्यामधून जनावरांना दिवसातून दोन-तीन वेळा चालायला लावणे. जेणेकरुन नवीन लागण होण्यास काही प्रमाणात आळा बसेल. पाणी पाजण्याच्या ठिकाणातील चिखल काढून सिमेंटने त्याभोवती गिलावा द्यावा. जनावरांच्या आहारात प्रथिने, खनिजे आणि जीवनसत्वे यांचे योग्य प्रमाण राखल्यास खुरांच्या आरोग्यास पोषक ठरते व त्यामुळे रोगास प्रतिकार होण्यास मदत होते.

लसीकरण

जनावरांच्या घटसर्प, फ-या, फाशी, आंत्रविषार अशा प्राणघातक आजारांसाठी बाजारात लशी उपलब्ध आहेत. लसीकरण करण्यापूर्वी खालील गोष्ठी विचारात घ्याव्यात.

अ) लसीकरणापूर्वी काय काळजी घ्यावी?

 1. कोणत्याही जनावराला लसीकरण करण्यापूर्वी, आठवडाभर आधी जतनाशक औषध द्यावे.
 2. जनावरांच्या शरीरावरील गोचीड, गोमाश्या, उवा, लिखा, पिसवा इ. कीटकांचे योग्य प्रकारे नियंत्रण करावे.
 3. रोगप्रतिकारशक्ती निर्माण होण्यासाठी जनावरांना क्षार व जीवनसत्वांचा पुरवठा करावा.
 4. बैलाच्या शरीरावर ताण पडू नये म्हणून लसीकरणानंतर एक आठवडा बैलांना हलके काम द्यावे.
 5. उत्तम रोगप्रतिकारशक्ती निर्माण होण्यासाठी जनावरांना चांगला सकस आहार द्यावा.
 6. लसीकरण केलेल्या जनावरांमध्ये थोडे दिवस कॉरटीकोस्टेरॉईड/


प्रतिजैविकांचा वापर करू नये.

लसीकरण केल्यानंतर जनावरांचे अति उष्ण व अति थंड वातावरणापासून संरक्षण करावे तसेच दूरवरची वाहतूक टाळावी.

लसीकरणानंतर जनावरांमध्ये ताप येणे किंवा मान न हलवणे अशी लक्षणे आढळतात; परंतु ही लक्षणे तात्कालिक व सौम्य स्वरुपाची असतात.

लस दिल्यानंतर मानेवर गाठी येऊ नयेत म्हणून त्या जागेवर हलके चोळल्यास गाठ येत नाही. आलेल्या गाठीला कोमट पाण्याने शेकले, तर गाठ जिरुन जाते. मांसात द्यायच्या लशी मांसातच टोचाव्यात, तसेच कातडीखाली टोचायच्या लशी कातडीखालीच टोचाव्यात; अन्यथा गाठी येण्याचे प्रमाण वाढते.

लस दिल्यानंतर लशीमुळे गाभण जनावरे गाभडतात असे नसून सर्व गाभण जनावरांना लस देऊन घेणे महत्वाचे आहे. विशेषत: आंत्रविषार व धनुर्वांताची लस गाभण शेळ्या-मेंढ्यांना दिल्यामुळे विल्यानंतर जनावरांना व पिलांना हे आजार होत नाहीत. कारण, नवजात पिलांना चिकाद्वारे रोगप्रतिकारकशक्ती मिळते.

लसीकरणामुळे येणारा ताप व शारीरिक ताण यांमुळे थोड्या प्रमाणात दूध उत्पादन कमी होऊ शकते; परंतु ते केवळ १ ते २ दिवसच राहते, नंतर पूर्वीप्रमाणेच दूध उत्पादन मिळते.

ब) लसीकरण करतानाची काळजी

लस खरेदी करताना चांगल्या कंपनीची लस खरेदी करावी. कालबाह्य झालेली लस वापरु नये.

जनावराला ठरवून दिलेल्या मात्रेमध्येच लस द्यावी. स्वतः कमी किंवा जास्त मात्रा वापरु  नये.

लस ही नेहमी थंड, कोरड्या ठिकाणी ठेवावी. (फ्रिजच्या खालच्या कप्प्यात ठेवावी, बफांच्या कप्प्यात ठेवू नये.)

लस एका ठिकाणाहून दुस-या ठिकाणी ने-आण करताना उघड्यावर न आणता थर्मासमध्ये किंवा प्लॅस्टिकच्या पिशवीत बफत ठेवून आणावी.

उघड्यावरील लस जनावरांना टोचू नये. सारख्याच प्रमाणात द्यावी. दोन वेगवेगळ्या लशी एकत्र मिसळून टोचू नयेत. कळपातील सर्वच जनावरांना एकाच वेळी लसीकरण करून घ्यावे. लसीकरणाच्या जागेवर टींक्चर आयोडीन/ स्पिरिट लावू नये.

१०) लसीकरणासाठी वापरली जाणारी सुई किंवा सीरिज या उकळल्या

पाण्यात निर्जतुक केलेल्या असाव्यात, त्यांना कोणतेही रसायन लावू नये.

११) लसीकरण करण्यासाठी तयार केलेली लस लवकरात लवकर

वापरून संपवावी. शिल्लक लशीचा साठा करू नये. लसीकरण हे दिवसातील थंड वेळी (सकाळी किंवा सायंकाळी) करावे.

क) साथीनंतर लसीकरणाचा फायदा होतो का?

जनावरांना रोग होण्याची वाट न बघता ठरलेल्या वेळी वेळापत्रकानुसार वेळोवेळी लसीकरण करावे. रोगाची साथ येण्याअगोदर लसीकरण केल्यामुळे दोन ते तीन आठवडे रोग प्रतिकारकशक्ती निर्माण होण्यासाठी लागतात. त्यामुळे रोगाची साथ येण्याअगोदरच जनावरांच्या शरीरामध्ये रोग प्रतिकारकशक्ती निर्माण होते व होणारे नुकसान टाळता येते.

ड) लसीकरणासाठी योग्य वय

घटसर्प व फ-या या रोगांचे लसीकरण सहा महिन्यांच्या वासरांना किंवा त्यापेक्षा मोठ्या वयाच्या जनावरांत करावे. लाळ्या-खुरकत रोगाचे लसीकरण जर वासराच्या आईला केले नसेल, तर सहा ते आठ आठवडे वयाच्या वासरांना व त्यापुढील जनावरांना करावे.

आंत्रविषार या रोगाची लस वासराच्या आईला दिली नसेल, तर ती वासराला पहिल्या आठवड्यात द्यावी आणि दिली असेल, तर चार ते सहा आठवडे वयाच्या वासराला द्यावी.

इ) लसीकरण करूनही रोग उद्भवण्याची कारणे.

 1. लशीची साठवणूक योग्य पद्धतीने (थंड जागेत) केली नसल्यास.
 2. लशीची मात्रा योग्य प्रमाणात व योग्य ठिकाणी न दिल्यामुळे.
 3. लसीकरणातील अनियमितता, कालबाह्य झालेल्या लशीचा वापर करणे किंवा शिल्लक राहिलेल्या लशीचा पुढील वर्षी वापर करणे.
 4. अशक्त, आजारी जनावरांना लसीकरण केल्यास किंवा जनावरांत अंतर व बाह्य परोपजीवींचा प्रादुर्भाव असल्यास, तसेच जनावरांत जीवनसत्व व क्षारांची कमतरता असल्यास.

ई) रोगाची साथ आल्यानंतर घ्यावयची काळजी

 1. आजारी जनावरांना इतर जनावरांपासून वेगळे ठेवून जागेवरच चारापाणी द्यावे. चरण्यासाठी बाहेर सोडू नये.
 2. तळ्यातील, नदीनाल्यांतील पाणी पाजू नये.
 3. रोगाचा संसर्ग झालेल्या जनावरावर वेळेत उपचार करावेत.
 4. रोगाची साथ आलेल्या भागात जनावरे नेऊ नयेत किंवा त्या भागातील जनावरे इतर ठिकाणी नेऊ नयेत.
 5. तसेच, रोगाची साथ आलेल्या भागातील बाजार/ प्रदर्शन बंद ठेवावीत.
 6. मेलेल्या जनावरांची तसेच संसर्गेित मलमूत्र, चारा यांची योग्य ठिकाणी विल्हेवाट लावावी.
 7. जनावरांच्या गोठ्याचे जंतुनाशकाने निर्जतुकीकरण करून घ्यावे.
 8. रोगाची साथ आल्यानंतर परिसरातील इतर गावांतील जनावरांचे आधी लसीकरण करून घ्यावे, नंतर त्या गावाच्या जवळील, गावातील जनावरांचे लसीकरण करावे. शेवटी रोगाची साथ आलेल्या गावात लसीकरण करून घ्यावे. यामुळे रोगाची साथ नियंत्रणात येईल व दूरवर पसरणार नाही.

 

स्त्रोत - कृषी विभाग महाराष्ट्र शासन

3.10256410256
आपल्या सूचना पोस्ट करा

(वरील विषयासाठी जर तुमच्या काही प्रतिक्रिया किंवा सूचना असतील तर या ठिकाणी नोंदवा)

Enter the word
नेवीगेशन

T5 2019/10/17 18:04:16.834450 GMT+0530

T24 2019/10/17 18:04:16.841076 GMT+0530
Back to top

T12019/10/17 18:04:16.465996 GMT+0530

T612019/10/17 18:04:16.485254 GMT+0530

T622019/10/17 18:04:16.529654 GMT+0530

T632019/10/17 18:04:16.530466 GMT+0530