Skip to content. | Skip to navigation

Vikaspedia


T2 2019/10/18 14:03:44.840768 GMT+0530
मुख्य / शेती / पशूपालन / गुरे पालन / जनावरांना हवे स्वच्छ पाणी...
शेअर करा

T3 2019/10/18 14:03:44.846131 GMT+0530
Views
 • स्थिती: संपादनासाठी खुला

T4 2019/10/18 14:03:44.875929 GMT+0530

जनावरांना हवे स्वच्छ पाणी...

जनावरांच्या शरीराची लवचिकता पाण्यामुळे राहते. पचनक्रियेत अन्नघटक पाण्यात विरघळून त्यांचे संपूर्ण शरीरात विलयन होते व शरीरातील सर्व पेशींना पोषणद्रव्ये पुरवली जातात.

जनावरांच्या शरीराची लवचिकता पाण्यामुळे राहते. पचनक्रियेत अन्नघटक पाण्यात विरघळून त्यांचे संपूर्ण शरीरात विलयन होते व शरीरातील सर्व पेशींना पोषणद्रव्ये पुरवली जातात. शरीराचे तापमान पाण्यामुळे स्थिर राहण्यास मदत होते.

जनावरांना पिण्याचे स्वच्छ पाणी

शरीरातील टाकाऊ व विषारी पदार्थ शरीराबाहेर मूत्राद्वारे किंवा घामाद्वारे टाकण्यासाठी पाण्याची आवश्‍यकता असते. जनावरांमध्ये पाणी कमी पडले तर बरेचसे आजार होऊ शकतात. डोळे कोरडे होतात, कातडी अंगाला चिकटते, जनावरांच्या वजनात घट होते. पचनावर, मूत्राद्वारे व घामाद्वारे विषारी पदार्थ बाहेर पडण्यास परिणाम होतो, शरीराचे तापमान वाढते, मूत्रपिंड व मूत्राशयावर परिणाम होतो, दूध देण्याचे प्रमाण दहा ते 20 टक्‍क्‍यांनी घटते.

 1. जनावरांना नेहमी पिण्याचे पाणी स्वच्छ व मुबलक असावे. जनावरांच्या पिण्याच्या पाण्याची गुणवत्ता ही पाण्याचा रंग, वास, चव, तापमान, पाण्यातील गढूळपणा, पाण्याचा पी.एच. व त्यात मिसळलेले क्षार, जैविक तत्त्वे, जिवाणू इत्यादींवर अवलंबून असते.
 2. मुळात नैसर्गिक पाणी हे रंगविरहित असते. पाण्याला रंग हा त्यात मिसळलेली जैविक तत्त्वे, धातू व अणुजीव इत्यादींमुळे येत असतो. पाण्याला हिरवट रंग हा पाण्यातील वनस्पती, पालापाचोळा इत्यादींमुळे येतो. जनावरांना पिण्याचे पाणी हे स्वच्छ, रंगहीन व मुबलक प्रमाणात द्यावे. रंग असलेले पाणी जनावरांना पाजू नये.
 3. जनावरांच्या पिण्याच्या पाण्याला कुठलाही वास नसावा. पाण्याला वास त्यात मिसळलेल्या जैविक तत्त्वे, धातू, मातीचे कण इत्यादींमुळे येतो. नदीच्या, तळ्याच्या पाण्यात कुजलेली गवते, झाडे किंवा मेलेली जनावरे इत्यादींमुळे वास येतो. कुठल्याही प्रकारचा वास येणारे पाणी जनावरांना पाजू नये.
 4. जनावरांच्या पिण्याच्या पाण्याला उग्र चव नसावी. कीटकनाशके, कारखान्यांतील विषारी पदार्थ, गवत कुजून नदीतील पाण्याची चव बदलू शकते, असे पाणी जनावरांना पाजू नये.
 5. जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचे तापमान खूप कमी व खूप जास्त नसावे.
 6. पाण्याचा रंग किंवा गढूळतेनुसार पाण्यात दूषितपणा ओळखण्यास मदत होते. गढूळ पाणी जनावरांना देण्यास योग्य नसते.
 7. पाण्यामध्ये कुठल्याही प्रकारची जैविक तत्त्वे, क्षार, धातूचे कण प्रमाणापेक्षा जास्त असू नयेत.

जनावरांना द्या पुरेसे पाणी

 1. गुरांना पाण्याच्या प्रमाणाची आवश्‍यकता गुरांचा आहार, गुरांची जात, गर्भावस्था, वातावरणातील तापमान व दूध उत्पादनावर अवलंबून असते.
 2. दुभत्या जनावरांना पाणी दिवसातून दोनदा देण्यापेक्षा चार वेळा दिल्यास जनावरे 15 ते 20 टक्के जास्त दूध देतात. उन्हाळ्यात जनावरांना मुबलक व योग्य तापमानाचे पाणी मिळेल याची काळजी घ्यावी. दूध देणाऱ्या गाईंना एक वेळ जरी कमी पाणी मिळाले, तरी त्यांचे 20 टक्के दूध कमी होऊ शकते.
 3. उन्हाळ्यात जनावरांची पाण्याची गरज वाढते; परंतु पिण्याच्या पाण्याचे तापमान जास्त असेल, तर जनावरे गरजेपेक्षा कमी पाणी पितात, त्यामुळे पिण्याच्या पाण्याची साठवण किंवा व्यवस्था सावलीत करावी, जेणेकरून पाण्याचे तापमान योग्य राहून जनावरे जास्त पाणी पितात.
 4. जनावरांनी जर हिरवा चारा (65 ते 85 टक्के पाण्याचा अंश) खाल्ला, तर ते पाणी कमी प्रमाणात पितात; मात्र उन्हाळ्यात हिरव्या चाऱ्याची मात्रा कमी असते, त्यामुळे ते सुका / वाळलेला चारा जास्त खातात. त्यामुळे त्यांना उन्हाळ्यात जास्त पाणी पाजावे.
 5. नवीन आणलेली जनावरे शक्‍यतो पाण्यातील बदलामुळे पाणी कमी पितात. अशा वेळी पाण्यात थोडा गूळ टाकून पाणी पाजावे.
 6. दुभती जनावरे, गाभण जनावरे, लहान वासरे, भाकड जनावरे यांना पाणी स्वच्छ व मुबलक मिळेल याकडे लक्ष द्यावे.
 7. जनावरे आजारी पडली तर पाणी कमी पितात, त्यामुळे जनावरांच्या पिण्याच्या पाण्याच्या प्रमाणावर लक्ष ठेवावे.

 

स्त्रोत : अग्रोवन

जनावरांना हवे स्वच्छ पाणी...

3.14583333333
आपल्या सूचना पोस्ट करा

(वरील विषयासाठी जर तुमच्या काही प्रतिक्रिया किंवा सूचना असतील तर या ठिकाणी नोंदवा)

Enter the word
नेवीगेशन

T5 2019/10/18 14:03:45.104447 GMT+0530

T24 2019/10/18 14:03:45.110447 GMT+0530
Back to top

T12019/10/18 14:03:44.745821 GMT+0530

T612019/10/18 14:03:44.764283 GMT+0530

T622019/10/18 14:03:44.828930 GMT+0530

T632019/10/18 14:03:44.829841 GMT+0530