Skip to content. | Skip to navigation

Vikaspedia


T2 2019/10/18 14:09:48.123924 GMT+0530
मुख्य / शेती / पशूपालन / गुरे पालन / जांबच्या दुध डेअरीने पशुपालक आर्थिक स्वंयपुर्णतेकडे ...
शेअर करा

T3 2019/10/18 14:09:48.130410 GMT+0530
Views
  • स्थिती: संपादनासाठी खुला

T4 2019/10/18 14:09:48.169605 GMT+0530

जांबच्या दुध डेअरीने पशुपालक आर्थिक स्वंयपुर्णतेकडे ...

वतमाळ पासुन १० कि.मी. अंतरावर वसलेलं ३००० लोकसंख्येचं जांब हे संपुर्ण जंगलाने वेढलेलं गाव. यागावात चारा व पशुधनाची संख्या सर्वाधिक असुन येथे दुध व्यवसाय करणा-या पशुपालकांची संख्या लक्षणिय आहे.

यवतमाळ पासुन १० कि.मी. अंतरावर वसलेलं ३००० लोकसंख्येचं जांब हे संपुर्ण जंगलाने वेढलेलं गाव. यागावात चारा व पशुधनाची संख्या सर्वाधिक असुन येथे दुध व्यवसाय करणा-या पशुपालकांची संख्या लक्षणिय आहे. येथे २० ते २२ वर्षापुर्वी डेअरीचा प्रयोग फसला होता. ऐंशी टक्के आदीवासी असलेल्या गावातुन दुध संकलन व प्रक्रीया केंद्र उभे करण्यांचा निर्णय गाव समिती व सिएमआरसीने घेतला व तो पुर्णत्वास नेला. आता या दुध संकलन केंद्रामुळे महिलांची समाजात प्रतिष्ठा वाढली असुन पशुपालकाच्या आयुष्यात स्वंयपुर्णत: आली आहे.

गावात दुध संकलन सुरु करण्यासाठी गावाने एक बंद खोली देण्याचे कबुल केले. भांडवल कसे उभे कराव हा प्रश्न होता त्यासाठी जिल्हा उद्योग केंद्राच्या (PMGB) योजनेअंतर्गत कर्जाचा प्रस्ताव सेंट्रल बॅंक ऑफ इंडिया कडे सादर करण्यात आला. या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यानंतर प्रक्रीया केंद्रासाठी आवश्यक साधनसामुग्री घेण्यात आली. तेजस्विनी दुधसंकलन केंद्र या नावाने दुध डेअरीस सुरवात झाली.

गावातले सगळे दुध यवतमाळ शहरात जायचे चिल्लर विक्री नसल्याने घरात दुध मिळत नव्हते. बचत गटानी मिळुन वर्षभरापुर्वी दुध संकलन सुरु केले. दरोरोज सकाळी ६ वाजता साफसफाइ करुन केंद्र उघडले जाते. दुधातील फॅट तपासणे दुध चांगले आहे किंवा नाही हे सारे परिक्षण या महिला करतात. दुध संकलन केंद्रात दुध परिक्षणाची एक प्रयोगशाळाचं असुन याची जबाबदारी महिलाचं सांभाळतात. जांबगावातुन सरासरी २०० ते ३०० लिटर दुधाचे संकलन केले जाते. गावात चिल्लर विक्रीसाठी ३० लिटर दुध ठेवले जाते.  पशुपालकामध्ये सर्वाधिक महिला या बचत गटाच्या सदस्य असल्याने त्या महिला आपली दुध डेअरी समजुन केंद्राला दुध देत असतात.

पशुपालकांचा दुध यवतामळ शहरात नेउन विकण्याचा त्रास या केंद्रामुळे वाचला असुन त्यांना फॅट प्रमाणे दर मिळतो त्यामुळे ते खुप समाधानी आहे. सिएमआरसी सदर चे दुध  विक्रीसाठी विपणन व्यवस्था विकसित केली असुन यासाठी महिला आर्थिक विकास महामंडळाच्या मार्गदर्शनात शहरात भेसळी संदर्भात व आराग्याच्या बाबतीत जागृत असलेल्या अधिका-यांची भेट घेण्यात आली व सदर दुधाचे वैशिष्टये समजवुन व पटवुन देण्यात आले. आरोग्याच्या बाबतीत जागृत १५० ग्राहकाची नोंदणी करण्यात आली. माविम शेत ते थेट परिवार अभियान असे  नाव या ग्राहक नोंदणीला देण्यात आले. आजमीतीस यवतमाळ शहरात दररोज सरासरी १५० लिटर दुधाची विक्री शेत ते थेट परिवाराच्या माध्यमातुन केली जाते.

 

संकलीत दुधापैकी काही दुध हे प्रक्रीयेसाठी ठेवले जाते या दुधापासुन खवा, पनीर, पेढे व तुप तयार केले जाते. दुध संकलन केंद्र चालविणा-या महिलांना दुध डेअरीचे शास्रीय प्रशिक्षण देण्यात आले. यवतमाळ शहरात रानडे डेअरी व इतर डेअरी सोबत स्पर्धा करायची झाल्यास मार्केटींग कौशल्याचे प्रशिक्षण महिलांना देण्यात आले आहे. भविष्यात ही डेअरी उद्दोन्मुख महिलासाठी आदर्श राहील.

लेखक - शेख रसुल, माविम यवतमाळ

2.7037037037
आपल्या सूचना पोस्ट करा

(वरील विषयासाठी जर तुमच्या काही प्रतिक्रिया किंवा सूचना असतील तर या ठिकाणी नोंदवा)

Enter the word
नेवीगेशन

T5 2019/10/18 14:09:48.455058 GMT+0530

T24 2019/10/18 14:09:48.461803 GMT+0530
Back to top

T12019/10/18 14:09:48.005983 GMT+0530

T612019/10/18 14:09:48.041236 GMT+0530

T622019/10/18 14:09:48.111028 GMT+0530

T632019/10/18 14:09:48.112035 GMT+0530