Skip to content. | Skip to navigation

Vikaspedia


T2 2019/06/27 01:56:6.517180 GMT+0530
मुख्य / शेती / पशूपालन / गुरे पालन / पशुखाद्यासाठी ऍझोलाचा वापर
शेअर करा

T3 2019/06/27 01:56:6.522855 GMT+0530
Views
 • स्थिती: संपादनासाठी खुला

T4 2019/06/27 01:56:6.553240 GMT+0530

पशुखाद्यासाठी ऍझोलाचा वापर

ऍझोला लागवड करावयाच्या ठिकाणची जमीन समतल करावी. वाफा तयार करण्यासाठी विटांची 2 मी. x 2 मी.चौरसाकृती रचना करावी.

पध्‍दत

 • ऍझोला लागवड करावयाच्या ठिकाणची जमीन समतल करावी.
 • वाफा तयार करण्यासाठी विटांची 2 मी. x 2 मी.चौरसाकृती रचना करावी.
 • 2 मी. x 2 मी. आकाराचे प्लॅस्टिकचे कापड विटांनी बनविलेल्या चौरसाकृती खड्ड्यामध्ये अंथरावे.
 • 10 ते 15 किलो चाळून घेतलेली चांगली माती खड्ड्यामध्ये पसरावी.
 • दोन किलो शेण, 30 ग्रॅम सुपर फॉस्फेट हे 10 लिटर पाण्यात मिसळून एकजीव करून खड्ड्यात कागदावरील मातीवर पसरवून गादी करावी. त्यावर पाण्याची पातळी 10 सें.मी. होईपर्यंत पाणी टाकावे. बायोगॅस युनिटमधील स्लरी व जनावरांच्या गोठ्यातील, स्वयंपाकघरातील वाया जाणारे पाणीदेखील ऍझोला खड्ड्यात वापरता येऊ शकते.
 • त्यामध्ये 500 ग्रॅम ते एक किलो ऍझोलाचे कल्चर समप्रमाणात पसरावे. त्यावर ताजे पाणी शिंपडावे.
 • एक आठवड्यात ऍझोला चांगले वाढते. जाड हिरव्या गालिच्याप्रमाणे दिसू लागते.
 • 20 ग्रॅम सुपर फॉस्फेट व एक किलो शेणाचे पाण्यातील मिश्रण पाच दिवसांपासून एकदा या खड्ड्यात मिसळावे, जेणेकरून ऍझोलाची वाढ झपाट्याने होऊन दैनंदिन 500 ग्रॅम उत्पादन मिळेल.
 • शिफारशीनुसार मॅग्नेशिअम, लोह, तांबे, सल्फर इ. क्षार असणारे मिश्रण दर आठवड्याला यात मिसळावे.
 • दर महिन्यातून एकदा पाच किलो चाळलेली माती या खड्ड्यात मिसळावी, यामुळे मातीतील जास्तीचे नायट्रोजन जमा होऊन अन्नघटकांची कमतरता होणार नाही.
 • दर सहा महिन्यांनी गादीमधील माती, पाणी बदलावे. नवीन ऍझोला कल्चर यात सोडावे.
 • जर ऍझोलामध्ये रोगाचा प्रादुर्भाव झाला असेल तर त्याची विल्हेवाट लावून नव्याने ऍझोला लागवड करावी.
 • सुरवातीच्या लागवडीनंतर 15 दिवसांनी रोज उत्पादन मिळू शकते. ऍझोला गोळा करण्यासाठी चाळणी वापरावी.
 • ऍझोला वेगाने वाढतो आणि रोज 500 ते 600 ग्रॅम ऍझोला उत्पादन मिळू शकते.
 • गोळा केलेला ऍझोला स्वच्छ पाण्यात धुवावा, जेणेकरून त्याचा शेणाचा वास निघून जाईल.
 • उत्पादित ऍझोला रोजचे रोज काढणे आवश्‍यक आहे; अन्यथा, खड्ड्यामध्ये ऍझोलावाढीसाठी कमी जागा उरेल.

फायदे


 • दुधाळ जनावरांवर घेतलेल्या चाचण्यांद्वारा असे सिद्ध झाले आहे, की रोजच्या आहारात दोन किलो ऍझोला मिसळला, तर जनावरांच्या दुधात सर्वसाधारणपणे 15 टक्के वाढ होते.
 • ऍझोला हे जनावरांच्या खुराकासाठी 15 ते 20 टक्के इतक्‍या प्रमाणात योग्य बदली खाद्य म्हणून वापरता येते. शिवाय दुधाची गुणवत्ता वाढते. जनावरांची तब्येत चांगली राहून आयुष्यमान वाढते.

संपर्क - डॉ. कादरभाई - 9763707898 
पशुवैद्यकीय चिकित्सालय, सातारा

 

एस.बी. आवारे, कव्हे, जि.सोलापूर

माहिती संदर्भ : अॅग्रोवन

 

2.94736842105
आपल्या सूचना पोस्ट करा

(वरील विषयासाठी जर तुमच्या काही प्रतिक्रिया किंवा सूचना असतील तर या ठिकाणी नोंदवा)

Enter the word
नेवीगेशन

T5 2019/06/27 01:56:6.792388 GMT+0530

T24 2019/06/27 01:56:6.798833 GMT+0530
Back to top

T12019/06/27 01:56:6.447475 GMT+0530

T612019/06/27 01:56:6.466866 GMT+0530

T622019/06/27 01:56:6.506691 GMT+0530

T632019/06/27 01:56:6.507539 GMT+0530