Skip to content. | Skip to navigation

Vikaspedia


T2 2019/10/17 19:25:10.264375 GMT+0530
मुख्य / शेती / पशूपालन / गुरे पालन / म्हशींच्या जाती
शेअर करा

T3 2019/10/17 19:25:10.270309 GMT+0530
Views
  • स्थिती: संपादनासाठी खुला

T4 2019/10/17 19:25:10.300252 GMT+0530

म्हशींच्या जाती

म्हशी बाबत तांत्रिक मार्गदर्शन मिळेल-

दुग्धोत्पादनासाठी म्हशीच्या मुऱ्हा, मेहसाणा, पंढरपुरी, सुरती या जाती चांगल्या आहेत. निवड पद्धतीने म्हशीमध्ये सुधारणा करणे शक्‍य आहे. गोठ्यामध्ये मिळणाऱ्या म्हशींच्या पिढ्यांची वाढ करणे फायद्याचे ठरते.

मुऱ्हा

शरीरबांधा मोठा, भारदस्त व कणखर असतो. एका वेतातील दुधाचे प्रमाण 3000 ते 3500 लिटर असते.

मेहसाणा

ही जात सुरती व मुऱ्हा जातींच्या संकरापासून निर्माण झाली असून, शरीर वैशिष्ट्ये मुऱ्हा जातीशी मिळतीजुळती आहेत. या म्हशी एका वेतात सरासरी 3000 लिटरपर्यंत दूध देतात.

पंढरपुरी

सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा, बेळगाव या ठिकाणी प्रामुख्याने आढळतात. या म्हशी आकाराने मध्यम, पण अतिशय काटक असतात. लांब व निमुळता चेहरा, खांद्यापर्यंत पोचणारी लांब व पिळवटलेली शिंगे ही या जातीची वैशिष्ट्ये आहेत. म्हशींचे वजन साधारण 400 किलो असते. पारड्या वयाच्या 25 ते 30 महिन्यांत गाभण राहतात आणि 35 ते 40 महिन्यांत पहिल्यांदा वितात. मध्यम शरीर, लवकर वयात येणाऱ्या पारड्या, कमी भाकडकाळ, पहिल्या वेताचे कमी वय, उत्तम प्रजोत्पादन व दुग्धोत्पादन क्षमता आणि दुग्धोत्पादनाचे सातत्य या गुणांमुळे दुधासाठी ही जात चांगली आहे. हे सर्व गुण एकत्रितपणे इतर जातींत आढळत नाहीत. या म्हशी एका वेतात 1500 ते 1800 लिटर दूध देतात.

सुरती

शरीरबांधा मध्यम, कान लांबट, रुंद व शिंगांनी झाकलेले असतात. भुवयांचे केस पांढरे, डोळे मोठे व शिंगे मध्यम व विळ्याच्या आकाराची असतात. शरीराचा रंग भुरा व मानेवर ठळक पांढरे आडवे पट्टे असतात. एका वेतातील दुधाचे उत्पादन 1800 लिटर असते. जास्त काळ दूध देते. दुधात स्निग्धांश जास्त प्रमाणात असतात.


संपर्क - 0231-2692416 
सर्व समावेशक पंढरपुरी म्हैस सुधार प्रकल्प, शेंडापार्क, कोल्हापूर

स्त्रोत: अग्रोवन

3.12222222222
विनय गुजर Feb 12, 2018 06:57 PM

सर मला मैस पालन करायच आहे़

लोन मी ९९६०९५९५९९ plez

आकाश अशोक कल्याणकर Oct 30, 2017 02:57 PM

आत गोगदारी पोस्ट बाचोटी ता कंधार डिस्ट नांदेड स्टेट महाराष्ट्र पिन 431714

सूनील Oct 23, 2017 03:35 PM

मला म्हैसपालन करायचे आहे.माहिती द्य

आकाश बिटणे Sep 20, 2017 10:38 AM

मला म्हशी पालन व्यवसाय कराचा आहे आणी मला माहीती पाहीजे

Ganesh garule Sep 18, 2017 09:49 PM

Sir mazya kade sadhya pacha mhashi ahe ani dudh pan bharapur d'etat tyana Gotha bandhayacha AHE margdarshan karave ani dudh wadhavanyasàthi khurakh kasa dyava yachi mahiti sanga mo-97*****69

आपल्या सूचना पोस्ट करा

(वरील विषयासाठी जर तुमच्या काही प्रतिक्रिया किंवा सूचना असतील तर या ठिकाणी नोंदवा)

Enter the word
नेवीगेशन

T5 2019/10/17 19:25:10.587104 GMT+0530

T24 2019/10/17 19:25:10.593707 GMT+0530
Back to top

T12019/10/17 19:25:10.162680 GMT+0530

T612019/10/17 19:25:10.180673 GMT+0530

T622019/10/17 19:25:10.253158 GMT+0530

T632019/10/17 19:25:10.254215 GMT+0530