Skip to content. | Skip to navigation

Vikaspedia


T2 2019/10/17 16:40:5.178746 GMT+0530
मुख्य / शेती / पशूपालन / गुरे पालन / जनावरांची योग्य देखभाल
शेअर करा

T3 2019/10/17 16:40:5.184129 GMT+0530
Views
  • स्थिती: संपादनासाठी खुला

T4 2019/10/17 16:40:5.213107 GMT+0530

जनावरांची योग्य देखभाल

जागतिक पशुवैद्यक संघटनेचे प्रमुख ध्येय म्हणजे पशू आरोग्य, देशभाल, त्याचबरोबरीने मानवी आरोग्याबाबत जागृती आणणे.

जागतिक पशुवैद्यक संघटनेचे प्रमुख ध्येय म्हणजे पशू आरोग्य, देशभाल, त्याचबरोबरीने मानवी आरोग्याबाबत जागृती आणणे. त्यासाठी संशोधनाच्या माध्यमातून योग्य उपचार पद्धतीचा विकास, औषधेनिर्मितीवर भर देण्यात आला आहे. येत्या काळात पशू आरोग्य आणि संगोपनाच्या दृष्टीने पशुवैद्यक नवीन नियमावली तयार करीत आहेत. त्याचबरोबरीने जागतिक पशू आरोग्य संघटनेच्या माध्यमातून शिक्षण, आरोग्य, संशोधन आणि संस्थेची कार्यपद्धती याबाबतही विशेष नियमावली तयार होत आहे.

पशुवैद्यक दिन

दर वर्षी एप्रिल महिन्याचा शेवटचा शनिवार हा जगभरात पशुवैद्यक दिन म्हणून साजरा केला जातो. इंग्लंडमधील प्रा. जॉन गमजी यांनी 14 ते 18 जुलै 1863 मध्ये जर्मनीमधील हॅम्बुर्ग येथे युरोपमधील पशुवैद्यकांची बैठक बोलावली होती. या बैठकीमध्ये आंतरराष्ट्रीय पशुवैद्यक कॉंग्रेसची स्थापना झाली. या कॉंग्रेसचे पुढे जागतिक पशुवैद्यक संघटनेमध्ये रूपांतर झाले. ही संघटना जगभरातील पशुवैद्यकांचे प्रतिनिधित्व करते. जगभरातील 90 राष्ट्रीय पशुवैद्यक संघटना आणि 12 जागतिक पशुवैद्यक संघटना या संघटनेशी जोडलेल्या आहेत. या दिवशी विशेष कार्यक्रमांच्या माध्यमातून पशुवैद्यकांना विशेष गुणवत्ता पारितोषिकांने सन्मानित करण्यात येते.

जनावरे ही आपल्या शेती, संस्कृती आणि आरोग्याचा आधार. पशुपालनाने खऱ्या अर्थाने शेतकऱ्याला आर्थिक ताकद दिली. गेल्या काही वर्षांत मानवी आरोग्याबाबत जग जसे जागरूक झालेय,त्याचप्रमाणे आपल्याकडे असणाऱ्या जनावरांचे आरोग्य, आहार, त्यांचा सांभाळ याबाबत जागरुकता आली आहे. जसे आपण डॉक्‍टरांना आपल्या घरचाच सदस्य मानतो, त्याच पद्धतीने पशुपालक आणि पशुवैद्यकाचे संबंध असतात. त्यातूनच पशुपालक आपल्या गोठ्यातील जनावरांच्या आरोग्याबाबत निर्धास्त असतो. त्यामुळे यंदाच्या जागितक पशुवैद्यक दिनाचे घोषवाक्‍य आहे "जनावरांची योग्य देखभाल'. या घोषवाक्‍याच्या माध्यमातून पशुवैद्यकाचे जनावरांच्या आरोग्याच्या दृष्टीने कसे महत्त्वाचे स्थान आहे हे अधोरेखित होते.

यंदाचे घोषवाक्‍य "जनावरांची योग्य देखभाल"

जागतिक पशुवैद्यक संघटनेचे प्रमुख ध्येय म्हणजे पशू आरोग्य, देशभाल, त्याचबरोबरीने मानवी आरोग्याबाबत जागृती आणणे. त्यासाठी संशोधनाच्या माध्यमातून योग्य उपचार पद्धतीचा विकास, औषधेनिर्मितीवर भर देण्यात आला आहे. येत्या काळात पशू आरोग्य आणि संगोपनाच्या दृष्टीने पशुवैद्यक नवीन नियमावली तयार करीत आहेत. त्याचबरोबरीने जागतिक पशू आरोग्य संघटनेच्या माध्यमातून शिक्षण, आरोग्य, संशोधन आणि संस्थेची कार्यपद्धती याबाबतही विशेष नियमावली तयार होत आहे.

सन 2015 मध्ये 32 वी जागतिक पशुवैद्यक कॉंग्रेस तुर्की देशाची राजधानी इस्तंबूलमध्ये होणार आहे.

नवतंत्रज्ञानाचा प्रसार...

जागतिक पशुवैद्यक संघटनेमध्ये 80 हून अधिक देशांतील पशुवैद्यक संघटनांचा सहभाग आहे. त्याच बरोबरीने विभागनिहाय, विषयनिहाय संघटनांचाही सहभाग आहे. या माध्यमातून जगभरातील पशुवैद्यक क्षेत्रातील संशोधन, शिक्षण आणि तंत्रज्ञानाची देवाणघेवाण केली जाते. जनावरे, तसेच लोकांच्या आरोग्याचे रक्षण हे या संघटनेचे प्रमुख ध्येय आहे. जागतिक पशुवैद्य संघटना ही जागतिक अन्न संघटना, जागतिक आरोग्य संघटना यांच्या बरोबरीने विविध उपक्रमांत सहभागी असते.

- फाऊझी किचरीड,
अध्यक्ष, जागतिक पशुवैद्यक संघटना

स्त्रोत : अग्रोवन

3.13043478261
तारकाचिह्नांवर जा आणि मूल्यांकन देण्यासाठी क्लिक करा
Sahyadri Nisarga Mitra May 11, 2014 06:34 AM

"जनावरांची योग्य देखभाल" ह्या उद्देशाला अनुसरून सह्याद्री निसर्ग मित्र ह्या संस्थेने ’पशु तपासणी नोंद पत्र’ (केस पेपर) रायगड, रत्नागिरी आणि सिंधूदुर्ग जिल्ह्यातील काहि पशूपालांना प्रायोगिक तत्वावर दिली आहेत. ह्या नोंद पत्रावर प्रत्येक गुरांना तपासणीची संपूर्ण माहिती तारीखवार ठेवता येईल. पुढील उपचार करताना ह्या नोंदी नक्कीच उपयोगात येतील.
भारतामधे गुरांच्या उपचारासाठी ’डायक्लोफेनॅक’ हे औषध वापरण्यास जरी २००६ पासून बंदी असली तरी कोकणातील काहि भागात अप्रशिक्षीत लोकांव्दारे हे औषध वापरले तसेच काहि औषध विक्रेत्यांमार्फत माणसांच्या उपचारासाठीचे हे औषध गुरांच्या उपचारासाठी विकले जाते. हे एक वेदनाशामक औषध आहे. पण हे औषध दिलेले जनावर काहि कारणास्तव मेले तर त्याचे मास खाऊन गिधाडे मरतात. गिधाडांच्या नाशास हे औषध कारणीभूत ठरले आहे. सह्याद्री निसर्ग मित्र गिधाड संवर्धनावर काम करत आहे. अशा ’पशु तपासणी नोंद पत्र’ (केस पेपर) मुळे ’डायक्लोफेनॅक’ दिले गेले आहे का ह्याचीहि माहिती कळू शकेल.
पशुपालांनी हि ’डायक्लोफेनॅक’ न वापरण्याची मागणी उपचारादरम्यान करून आपली जागरुकता दाखवली पाहिजे.
अशा पध्दतीच्या नोंद पत्राची माहिती हवी असल्यास सह्याद्री निसर्ग मित्र ह्या संस्थेला संपर्क करावा.

आपल्या सूचना पोस्ट करा

(वरील विषयासाठी जर तुमच्या काही प्रतिक्रिया किंवा सूचना असतील तर या ठिकाणी नोंदवा)

Enter the word
नेवीगेशन

T5 2019/10/17 16:40:5.471553 GMT+0530

T24 2019/10/17 16:40:5.487059 GMT+0530
Back to top

T12019/10/17 16:40:5.110225 GMT+0530

T612019/10/17 16:40:5.129096 GMT+0530

T622019/10/17 16:40:5.168649 GMT+0530

T632019/10/17 16:40:5.169482 GMT+0530