Skip to content. | Skip to navigation

Vikaspedia


T2 2019/10/17 16:29:27.087601 GMT+0530
मुख्य / शेती / पशूपालन / गुरे पालन / वळूमधील नपुंसकतेवर उपाय
शेअर करा

T3 2019/10/17 16:29:27.094829 GMT+0530
Views
  • स्थिती: संपादनासाठी खुला

T4 2019/10/17 16:29:27.160515 GMT+0530

वळूमधील नपुंसकतेवर उपाय

वळूमधील नपुंसकतेवर उपाययोजना बाबतची माहिती येथे दिलेली आहे.

१) वळूचा उपयोग नैसर्गिक रेतनाकरिता होतो. बहुतांश गावांमध्ये रेतनासाठी जातिवंत वळू मर्यादित संख्येत असतात, त्यामुळे रेतनाकरिता त्यांचा वापर वारंवार होतो.

२) एका आठवड्यात जास्तीत जास्त चार वेळेस रेतनासाठी वळू वापरावा. यापेक्षा जास्त वेळा व नियमित वळूच्या वापरामुळे त्यांच्या वीर्यातील शुक्राणूंची संख्या कमी होते. अशा परिस्थितीत या वळूपासून गर्भधारणा होण्याची शक्यता कमी असते.

३) जर वीर्यातील शुक्राणूंची संख्या कमी झाली असेल, तर अशा वळूस वीर्य संकलनातून किंवा नैसर्गिक रेतनातून आराम देणे अत्यंत आवश्यक आहे. केवळ आरामामुळेच या विकारापासून मुक्तता मिळते.

४) या व्यतिरिक्त मृत शुक्राणू (डेड काउंट), दूषित शुक्राणू (अबॅनार्मल स्पर्म काउंट), पुरुष संप्रेरक (टेस्टेस्टेरॉन)ची कमतरता इ. कारणे वळूमध्ये नपुंसकता निर्माण करतात.

उपयुक्त औषधी वनस्पती

अश्वगंधा

असगंध किंवा ढोरकामोनी या नावाने ही वनस्पती ओळखली जाते. शुक्राणूंची संख्या कमी होणे, पुरुष संप्रेरकाची कमतरता या आजारात अश्वगंधा वनस्पती वापरता येते. संपूर्ण वनस्पतीचा वापर औषधीत होतो. 
मात्रा : 
मोठ्या जनावरांमध्ये : १५-२० ग्रॅम 
लहान जनावरांमध्ये : १०-१५ ग्रॅम 
प्रमाण : दिवसातून दोन वेळेस द्यावी

शतावरी

नर प्रजनन संस्थेच्या आजारात शरीर दौर्बल्य व शुक्राणूंचे विकार यात शतावरीचा उपयोग चांगला होतो. 
शतावरीच्या मुळ्या औषधीत वापरतात. 
मात्रा : 
मोठ्या जनावरांमध्ये : २०-३० ग्रॅम 
लहान जनावरांमध्ये : १०-१५ ग्रॅम 
प्रमाण : दिवसातून दोन वेळेस द्यावी

केवच

ही वनस्पती केवच, क्रोमच अशा नावाने ओळखली जाते. ही वनस्पती सर्वत्र मोठ्या प्रमाणात आढळते. या वनस्पतीचे बी अत्यंत उपयुक्त आहे. 
मात्रा : 
मोठ्या जनावरांमध्ये : १५-२० ग्रॅम 
लहान जनावरांमध्ये : ५-१० ग्रॅम 
प्रमाण : दिवसातून दोन वेळेस द्यावी

ज्येष्ठमध

चवीने गोड असणारा ज्येष्ठमध या आजारात देखील उपयुक्त आहे. 
मात्रा : 
मोठ्या जनावरांमध्ये : २०-३० ग्रॅम 
लहान जनावरांमध्ये : १०-१५ ग्रॅम 
प्रमाण : दिवसातून दोन वेळेस द्यावी

सफेद मुसळी

या आजारात सफेद मुसळी अत्यंत गुणकारी आहे. 
मात्रा : 
मोठ्या जनावरांमध्ये : १०-१५ ग्रॅम 
लहान जनावरांमध्ये : ५-७ ग्रॅम 
प्रमाण : दिवसातून दोन वेळेस द्यावी
शिलाजीत : नैसर्गिक स्वरूपात मिळणारा हा एक खडक आहे.
शुद्ध स्वरूपातील शिलाजीत औषाधीत वापरावा.

मात्रा :
मोठ्या जनावरांमध्ये : ४०० ते ५०० मिलिग्रॅम
लहान जनावरांमध्ये : १०० ते २०० मिलिग्रॅम 
प्रमाण : दिवसातून दोन वेळेस द्यावे
एकत्रित वापर : सर्व वनस्पतींचा एकत्रित वापर अत्यंत गुणकारी आहे.
अश्वगंधा - २० ग्रॅम 
केवच - १४ ग्रॅम 
ज्येष्ठमध - ३० ग्रॅम 
शतावरी - २० ग्रॅम 
शिलाजीत - १ ग्रॅम 
सफेद मुसळी १५ ग्रॅम 
या सर्व औषधी एकत्र घेऊन बारीक करून घ्याव्यात. 
मात्रा : 
मोठ्या जनावरांमध्ये : १० ग्रॅम 
लहान जनावरांमध्ये : ५ ग्रॅम 
प्रमाण : दिवसातून दोन वेळेस गुळासोबत किंवा खाद्यासोबत औषधांची मात्रा द्यावी.

 

--------------------------------------------------------------------------------------------

स्त्रोत: अग्रोवन

2.63265306122
दिनेश रमेश ठाकूर May 30, 2015 02:08 PM

मी जळगाव जिल्ह्यतील राहिवाशि असून मला शेळीपालन करायचे आहे तरी मलाचांगल्या जातीवंत शेळीकुठे व कोणत्या जातिच्या शेळ्यांमाझ्या जिल्हात चांगल्या प्रकार वाढतील या विषयीमाहिती सांगवी ही विनंती.

दिनेश रमेश ठाकूर May 30, 2015 11:07 AM

मी जळगाव जिल्ह्यतील राहिवाशि असून मला शेळीपालन करायचे आहे तरी मलाचांगल्या जातीवंत शेळीकुठे व कोणत्या जातिच्या शेळ्यांमाझ्या जिल्हात चांगल्या प्रकार वाढतील या विषयीमाहिती सांगवी ही विनंती.

आपल्या सूचना पोस्ट करा

(वरील विषयासाठी जर तुमच्या काही प्रतिक्रिया किंवा सूचना असतील तर या ठिकाणी नोंदवा)

Enter the word
नेवीगेशन

T5 2019/10/17 16:29:27.899244 GMT+0530

T24 2019/10/17 16:29:27.914124 GMT+0530
Back to top

T12019/10/17 16:29:26.982372 GMT+0530

T612019/10/17 16:29:27.010952 GMT+0530

T622019/10/17 16:29:27.061730 GMT+0530

T632019/10/17 16:29:27.062713 GMT+0530