Skip to content. | Skip to navigation

Vikaspedia


T2 2019/06/16 18:39:6.488200 GMT+0530
मुख्य / शेती / पशूपालन / गुरे पालन / वासरांतील रक्‍ती हगवणी
शेअर करा

T3 2019/06/16 18:39:6.497324 GMT+0530
Views
  • स्थिती: संपादनासाठी खुला

T4 2019/06/16 18:39:6.540806 GMT+0530

वासरांतील रक्‍ती हगवणी

गाई- म्हशींच्या वासरांमध्ये लहानपणी माती चाटण्यास सुरवात झाल्याबरोबर आदिजीवींची अंडी वासरांच्या पोटात प्रवेश करतात

गाई-म्हशींच्या वासरांमध्ये लहानपणी माती चाटण्यास सुरवात झाल्याबरोबर आदिजीवींची अंडी वासरांच्या पोटात प्रवेश करतात, त्यामुळे या रोगाची लागण होते. आतड्यामध्ये हे आदिजीवी प्रादुर्भाव करतात. आतड्यातील पेशींना इजा पोचल्यामुळे त्यांचे आतड्यातील आवरण बाजूस होऊन यातून रक्‍तस्राव होतो.

उपाय योजना


वासरे माती चाटणार नाहीत याची काळजी घ्यावी. माती चाटावयास सुरवात केल्यानंतर शिफारशीत औषधीची मात्रा द्यावी. खनिजयुक्‍त वीट (मिनरल ब्रीक) गोठ्यामध्ये टांगती ठेवावी, त्यामुळे वासरे माती न चाटता विटेस चाटतील.

वासरांचे व्यवस्थापन


वासरे, करडांना जन्मल्यानंतर वेळेत चीक पाजावा. यामुळे नवजात वासरांची, करडांची रोगप्रतिकारक शक्ती वाढते. गाई- म्हशींच्या वासरांना वेळीच शिफारशीत कृमिनाशकाची मात्रा द्यावी. करडे व वासरे माती चाटत असल्यास तातडीने औषधोपचार करावा. जखमांवर तत्काळ उपचार करून घ्यावा. पशुवैद्यकाच्या सल्ल्याशिवाय कुठलेही औषध पाजू नये किंवा औषधोपचार करू नये.

 

डॉ. नरळदकर : 9403847764,

पशुवैद्यकीय व पशुविज्ञान महाविद्यालय, परभणी
विनायक धोंडे, बदनापूर, जि. जालना

 

माहिती संदर्भ :अॅग्रोवन

2.96428571429
आपल्या सूचना पोस्ट करा

(वरील विषयासाठी जर तुमच्या काही प्रतिक्रिया किंवा सूचना असतील तर या ठिकाणी नोंदवा)

Enter the word
नेवीगेशन

T5 2019/06/16 18:39:6.777762 GMT+0530

T24 2019/06/16 18:39:6.784058 GMT+0530
Back to top

T12019/06/16 18:39:6.398059 GMT+0530

T612019/06/16 18:39:6.424588 GMT+0530

T622019/06/16 18:39:6.473903 GMT+0530

T632019/06/16 18:39:6.474785 GMT+0530