Skip to content. | Skip to navigation

Vikaspedia


T2 2019/06/17 18:45:48.242206 GMT+0530
मुख्य / शेती / पशूपालन / शेळी पालन / शेळी-मेंढीच्या जाती
शेअर करा

T3 2019/06/17 18:45:48.248383 GMT+0530
Views
  • स्थिती: संपादनासाठी खुला

T4 2019/06/17 18:45:48.280089 GMT+0530

शेळी-मेंढीच्या जाती

राज्यातील शेळ्या व मेंढ्यांच्या जातींचा विचार करता उस्मानाबादी ही मांसासाठी उपयुक्त असलेली आणि संगमनेरी ही मांस व दुधासाठी उपयुक्त असलेली शेळीची जात आहे.

 

राज्यातील शेळ्या व मेंढ्यांच्या जातींचा विचार करता उस्मानाबादी ही मांसासाठी उपयुक्त असलेली आणि संगमनेरी ही मांस व दुधासाठी उपयुक्त असलेली शेळीची जात आहे. मेंढ्यांमध्ये लोकर व मांसोत्पादनासाठी दख्खनी मेंढी आणि फक्त मांसासाठी मडग्याळ मेंढी फायदेशीर आहे. या सर्व जाती महाराष्ट्रातील दुष्काळप्रवण भागांत अत्यंत कमी व निकृष्ट प्रतीच्या चाऱ्यावर तग धरून राहतातच, शिवाय त्यांची रोगप्रतिकारक क्षमताही चांगली आहे.

उस्मानामाबादी शेळी -

या शेळीत जुळी करडे देण्याचे प्रमाण 60 टक्के आहे. निवड पद्धतीने जुळी करडे देणाऱ्या शेळ्या निवडाव्यात. ही जात मटणासाठी चांगली आहे.

संगमनेरी शेळी -

या शेळ्या रंगाने पांढऱ्या किंवा पांढरट तपकिरी असतात. या शेळीत जुळी करडे देण्याचे प्रमाण 40 ते 50 टक्के आहे. ही जात दूध आणि मांसासाठी वापरली जाते.

माडग्याळ मेंढी -

या मेंढीची शरीरवाढ चांगली आहे. मेंढीच्या कोकराचे जन्मतः वजन तीन ते पाच किलो असते. तीन महिने वयाच्या वेळचे वजन 22 किलो होते. पूर्ण वाढ झालेल्या मेंढीचे वजन 45 ते 50 किलो इतके असते. या मेंढ्याच्या अंगावर लोकर कमी असते.


पैदाशीसाठी नराची निवड -


नर हा कळपातील सुदृढ व त्या त्या जातीचे गुणधर्म दर्शविणारा असावा. पैदाशीचा नर चपळ असावा. पैदाशीचा नर निवडताना दोन जुळ्या नरांतील एक चांगला नर निवडावा, म्हणजे पुढील पिढ्यांत जुळे व तिळे करडे देण्याचे प्रमाण वाढते. पैदाशीच्या नराची प्रजोत्पादन क्षमता चांगली असावी, जेणेकरून एका दिवशी जास्तीत जास्त माद्यांना गर्भधारणा करण्यास तो सक्षम ठरेल. नराचे अंडकोश मोठे व पोटाला चिकटलेले असावे. पैदाशीचा नर उंच, लांब, भरदार छाती असणारा व मानेवर आयाळ असणारा असावा. पैदाशीच्या नरात कोणतेही शारीरिक व्यंग नसावे. पैदाशीचा नर जातिवंत माता-पित्यापासून झालेला असावा. नर निवडताना दीड ते दोन वर्षांचा निवडावा. पैदाशीचा नर निवडताना जातीशी साधर्म्य असणारा, दीड ते दोन वर्षे वयाचा, जुळ्यांतील एक असणारा, सुदृढ, उत्तम प्रजोत्पादन क्षमता असणारा निवडावा, म्हणजे त्याच्यापासून जन्माला येणारी पुढील पिढी चांगल्या गुणवत्तेची होईल. साधारणपणे दीड ते दोन वर्षांच्या नराला 30 शेळ्या / मेंढ्यांच्या पैदाशीला वापरावे. दर दोन वर्षांनी नर बदलावा. हा बदल करताना शक्‍यतो दुसरा नर लांब अंतरावरून आणावा, म्हणजे सकुळ प्रजननास आळा बसून वाईट परिणाम होणार नाहीत. 

संपर्क - 
1) 02426 - 243455 
वरिष्ठ शास्त्रज्ञ, संगमनेरी शेळी संशोधन योजना 
2) 02426 - 294225 
सर्वसमावेशक दख्खनी मेंढी प्रकल्प, 
महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी

 

संदीप गाढे, नांदेड, वसंत शेळके, संगमनेर, जि. नगर

माहिती संदर्भ : अॅग्रोवन

 

3.10483870968
रमेश नाईक Feb 05, 2018 02:04 PM

मला शेळी पालन करायचं आहे शेळ्या कोणत्या व कोठुन घ्यावेत

संज्ञेश BOMBALE Oct 02, 2017 01:01 PM

शेळी पालन माहिती हवी आहे
नो ८६०००५२९९९

शुभम मराठे Aug 16, 2017 06:48 PM

सर मला शेळी पालन करायची आहे

गणेश चौधरी Jul 28, 2017 11:21 PM

सर मला हा वेवसाय चालू करायचा आहे माझ्या कडे जमीन पण आहे त्या साठी मला किती खर्च लागेल कमीत कमी मो नो 95*****77

विजय जाधव Jul 08, 2017 11:26 AM

नमस्कार
मला शेळीपालनात खूप रस आहे, मी याकडे माझी आवड म्हणून पाहत आहे. मला गो पालन तसेच शेळीपालन करावयाचे आहे. त्या संदर्भात तुमच्याकडून काही मार्गदर्शन होईल का. किंवा काही पुस्तक वाचावयास मिळतील का.
धन्यवाद

आपल्या सूचना पोस्ट करा

(वरील विषयासाठी जर तुमच्या काही प्रतिक्रिया किंवा सूचना असतील तर या ठिकाणी नोंदवा)

Enter the word
नेवीगेशन

T5 2019/06/17 18:45:49.334105 GMT+0530

T24 2019/06/17 18:45:49.339989 GMT+0530
Back to top

T12019/06/17 18:45:48.157989 GMT+0530

T612019/06/17 18:45:48.179304 GMT+0530

T622019/06/17 18:45:48.230006 GMT+0530

T632019/06/17 18:45:48.230943 GMT+0530