Skip to content. | Skip to navigation

Vikaspedia


T2 2019/10/17 06:22:59.553679 GMT+0530
मुख्य / शेती / पशूपालन / शेळी पालन / महाराष्ट्रातील शेळी-मेंढीपालन
शेअर करा

T3 2019/10/17 06:22:59.559179 GMT+0530
Views
  • स्थिती: संपादनासाठी खुला

T4 2019/10/17 06:22:59.588700 GMT+0530

महाराष्ट्रातील शेळी-मेंढीपालन

राज्यात शेळी-मेंढीपालन व्यवसाय हा शेतीला पुरक व्यवसाय म्हणून किफायतशीर ठरलेला आहे

राज्यात शेळी-मेंढीपालन व्यवसाय हा शेतीला पुरक व्यवसाय म्हणून किफायतशीर ठरलेला आहे.पशुपालन व्यवसाय हा राज्याच्या अर्थव्यवस्थेतील एक महत्वाचा भाग आहे कारण राज्यातील ७० टक्के लोकसंख्या उपजीविकेसाठी शेतीवर अवलंबून आहे. शेळी-मेंढीपालन व्यवसाय दुष्काळी व निमदुष्काळी भागात मेंढपाळांकडून विशेषत: धनगर समाजाकडून केला जातो. शेळयांपासून मांस, दुध, कातडी, लेंडीखत आणि याबरोबरच मेंढयापासून लोकर उत्पादन मिळते.

हा व्यवसाय अत्यंत कष्टमय असुन मेंढपाळ ऊन, वारा, पाऊस यांचा विचार न करता आणि सर्व सुखसोयी न उपभोगता दिवस रात्र मेंढयांच्या कळपात राहून हा व्यवसाय करतात.अतिपाऊस, रोगराई यामुळे हजारो मेंढया मृत्युमुखी पडतात. हा व्यवसाय परंपरागत पध्दतीने केला जात असल्यामुळे मेंढपाळ विमा वैगेरे उतरवित नाहीत. मेंढपाळांच्या मुलांना शिक्षणापासुन वंचित रहावे लागते. वाढते शहरीकरण व दिवसेंदिवस कमी होत जाणारी गायरान क्षेत्रे त्यामुळे हा व्यवसाय पुढे टिकून राहणे कठीण झाले आहे. महाराष्ट्र राज्यात लोकरीची कुठलीही संघटित बाजारपेठ नाही.

महाराष्ट्रातील शेळया-मेंढयांची संख्या:-

 

अ.क्र. विभाग मेंढयांची संख्या लोकर उत्पादन (मे.टन) सन २००८-२००९ शेळयांची संख्या दुध उत्पादन सन २००८-२००९
मुंबई (कोकण) ३१२६ १२.९५९ ३५२११२ १०.१८६
नाशिक १३७७३७६ ५६६.२२५ ३१७३५५५ ७७.६९२
पुणे १६२६९७६ ७७७.११२ २३६९०३७ ६३.७७८
औरंगाबाद २३५५०९ १५८.३९२ ११८५१६५ ४६.७९५
लातुर १६५९१० ८१.५०८ ९१९३९५ १९.७९५
अमरावती १९८५४४ ७४.२९८ १४४०८१० ३९.१६३
नागपूर ६९८९० ३६.७७३ १५४११०७ २०.२६९
३२५७५६२ १७०७.२८७ १०९८११८१ २७७.२५०

महाराष्ट्रातील शेळी-मेंढी पालन व्यवसाय :-

 

राज्यातील मेषपालन व्यवसाय जवळपास एक लाख कुटुंबांकडून केला जातो, तर ९५ टक्के खेडयामध्ये ४८ लाख कुटुंबाकडून शेळीपालन केले जाते.
महाराष्ट्रातील मांसाचे उत्पादन:-
महाराष्ट्र राज्याच्या सांख्यिकी विभागाच्या माहितीनुसार सन २००८-२००९ मध्ये शेळया-मेंढयापासून मिळणा-या मांसाचे उत्पादन हे एकूण मांस उत्पादनाच्या ३४.५२ टक्के (मेंढी ११.३४ टक्के आणि शेळी २३.१८ टक्के) आहे. यामध्ये महाराष्ट्रात शेळया-मेंढयापासून मिळणारे सरासरी उत्पादन हे ११ कि.ग्रॅ एवढे आहे.
महाराष्ट्र राज्यातील सन २००८-२००९ मधील मांस उत्पादनाचा तक्ता खालिलप्रामाणे आहे.

अ.क्र. प्रकार कत्तल केलेल्या प्राण्यांची संख्या सरासरी मांस उत्पादन/ प्राणी एकूण मांस उत्पादन टक्केवारी
बैल ५११.४२१ १२६.२२३ ६४.५५३ २५.२१
म्हशी ७०३.११५ १३८.७३८ ९७.५४९ ३८.१०
मेंढया २४६६.१८३ ११.७७२ २९.०३३ ११.३४
शेळया ५११२.८३८ ११.६११ ५९.३६६ २३.१८
वराह २१८.४०४ २५.२७४ ५.५२० २.१५

 

महाराष्ट्र राज्यातील वधगृहे

 

अ.क्र. जिल्हा वधगृहाची संख्या अ.क जिल्हा वधगृहाची संख्या
बृहन्मुंबई १७ बीड ११
ठाणे १८ औरंगाबाद ११
रायगड १९ जालना
सिंधुदुर्ग २० बुलढाणा ४७
नाशिक १० २१ परभणी
धुळे २२ नांदेड १७
नंदुरबार २३ हिंगोली ११
जळगांव १९ २४ अकोला २८
अहमदनगर २५ वाशिम १४
१० पुणे २६ अमरावती २६
११ सातारा १२ २७ यवतमाळ ३०
१२ सांगली २८ वर्धा
१३ कोल्हापूर १३ २९ नागपूर १४
१४ सोलापूर ३० भंडारा
१५ लातूर ३१ गडचिरोली
१६ उस्मानाबाद ३२ चंद्रपूर
एकूण ३३८

 

शेळया-मेंढयापासून मिळणा-या मांसाची निर्यात:-


जगातील सन २००७ मध्ये मेंढयापासून मिळणा-या मासांचे उत्पादन ८.८९ दशलक्ष टन तर शेळयापासून मिळणा-या मांसाचे उत्पादन ५.१४ दशलक्ष टन होते. भारताचा शेळयांपासून मिळणा-या मांसाच्या उत्पादनामध्ये दुसरा तर मेंढयांपासून मिळणा-या मांसाच्या उत्पादनामध्ये सातवा क्रमांक लागतो. सन २००६-२००७ मध्ये शेळया-मेंढयाच्या मांसाचे निर्यात शुल्क ६५.८७ कोटी होते. हे आता सन २००७-०८ मध्ये वाढून १३४.१० कोटी एवढे झालेले आहे.
लोकर उत्पादन:-
राज्यातील लोकर प्रामुख्याने काळी-पांढरी-मिश्र रंगाची आहे. लोकर कातरणी ही वर्षातून दोनदा केली जाते. पहिली जून-जुलैमध्ये तर दुसरी ही साधारणत: त्यानंतर सहा महिन्यानंतर केली जाते. महाराष्ट्र राज्यातील मेंढयांपासून सरासरी ५८५ ग्रॅम एवढी लोकर उत्पादित होते. सन २००८-०९ मधील राज्याचे लोकरीचे उत्पादन १७०७ मेंटन एवढे होते.
राज्यात एकूण उत्पादित होणा-या लोकरीपैकी २० टक्के लोकर घोंगडया व जेन उत्पादनाची वापरली जाते तर उर्वरित ८० टक्के लोकर उत्तरेकडील राज्यातील हरियाणा, पंजाब येथील व्यापारी, मिल मालक लष्करासाठी लागणा-या बरॅक ब्लँकेटच्या उत्पादनासाठी खरेदी करतात.

 

 

राज्यातील लोकरीचे प्रमुख बाजार खालीलप्रमाणे

 

अ.क्र. बाजाराचे नांव जिल्हा अ.क्र. बाजाराचे नांव जिल्हा
लोणंद सातारा १५ पारनेर अहमदनगर
फलटण सातारा १६ लोणी अहमदनगर
म्हसवड सोलापूर १७ श्रीरामपूर अहमदनगर
नाझरे सोलापूर १८ नेवासा अहमदनगर
महूद सोलापूर १९ पाथर्डी अहमदनगर
करमाळा सोलापूर २० शिरुर पुणे
सांगोला सोलापूर २१ दौंड पुणे
जुनोनी सोलापूर २२ जालना जालना
नातेपुते सोलापूर २३ परळी बीड
१० जवळा सोलापूर २४ धारुर बीड
११ पिलीव सोलापूर २५ मनमाड नाशिक
१२ ढालगांव सांगली २६ सिन्नेर नाशिक
१४ रशिन अहमदनगर २७ नांदगांव नाशिक
१४ संगमनेर अहमदनगर २८ विजापूर औरंगाबाद

 

शेळीपासून मिळणा-या दुधाचे उत्पादन:-


सन २००८-०९ मध्ये राज्याचे शेळीपासून मिळणा-या दुधाचे उत्पादन २७७.२४८ हजार में.टन होते. महाराष्ट्रातील शेळयांचे एका दिवसाचे सरासरी उत्पादन २१९ ग्रॅम्स आहे. राज्यामध्ये उत्पादित होणा-या दुधापैकी एकूण ४ टक्के हिस्सा शेळयांच्या दुधाचा आहे.
महाराष्ट्र राज्यातील दुध उत्पादनाचा तपशिल खालिलप्रमाणे आहे.

 

अ.क्र. प्रकार दुध देणा-या प्राण्यांची संख्या (लाख) सरासरी दैनंदिन दुध उत्पादन एकूण दुध उत्पादन (में.टन)
संकरित गायी ११८० ६.५४१ २८१७.१६६
गायी (संकरित गायी वगळून) १९४३ १.५०३ १०६६.२४८
म्हैस २३९५ ३.७६८ ३२९४.४९५
शेळी ३४७५ ०.२१९ २७७.२४८
७४५५.१५७

 

महाराष्ट्र राज्यातील शेळया-मेढयांचे प्रमुख बाजार

 

अ.क्र.

 

बाजार गावांचे नाव

 

तालुका

जिल्हा

बाजार दिवस

रेणापुर

रेणापूर

लातूर

शुक्रवार

मुरुड

लातूर

लातूर

मंगळवार

खाजगी

उमरगा

उस्मानाबाद

गुरूवार

नैकनूर

बीड

बीड

रविवार

बार्शी

बार्शी

सोलापूर

शनिवार

वैराग

बार्शी

सोलापूर

बुधवार

कळंब

कळंब

उस्मानाबाद

सोमवार

अणपूर

तुळजापुर

उस्मानाबाद

गुरुवार

परांडा

परांडा

उस्मानाबाद

रविवार

१०

पारोदा

उस्मानाबाद

उस्मानाबाद

रविवार

११

भूम

भूम

उस्मानाबाद

गुरूवार

१२

येणपूर

उमरगा

उस्मानाबाद

सोमवार

१३

उस्मानाबाद

उस्मानाबाद

उस्मानाबाद

गुरुवार

१४

जळकोर

तुळजापूर

उस्मानाबाद

शनिवार

 

राज्यातील शेळी-मेंढी पालन करणा-या सहकारी संस्था:-


महाराष्ट्रात एकण २२५० शेळी-मेंढयांच्या सहकारी संस्था आहेत. त्यांचा तपशिल खालिलप्रमाणे
१. पश्चिम महाराष्ट्र - ४५०
२. मराठवाडा - ३८०
३. विदर्भ - १७०
४. कोकण - २५
५. खानदेश - १२००
एकूण - २२२५

महाराष्ट्र राज्यातील शेळया-मेंढयासाठी कार्यरत असलेल्या अशासकीय संस्था
१. निंबकर अग्रिकल्चर रिसर्च इन्सिटयुट (NARI) फलटण.
२. BAIF डेव्हलपमेंट रिसर्च फॉऊंडेशन उरळीकांचन पुणे.
३. अंतरा, पुणे.
४. BOSCO, ग्रामिण विकास केंद्र, कडेगांव, नगर-पुणे- मार्ग, अहमदनगर.
५. रुरल अग्रिकल्चर रिसर्च इन्सिटयुट नारायणराव (RAIN).
६. कृषी विज्ञान केंद्र बारामती जिल्हा पुणे.

 

स्त्रोत: पशु संवर्धन विभाग महाराष्ट्र शासन

3.05714285714
मच्छिंद्र साळुंके, नाशिक Jun 08, 2018 08:06 AM

सर माहिती खरोखर छान आहे.

संतोष पाटील Nov 03, 2017 12:46 AM

सर मला शेलीपालन करायचे आहे

योगेश अरुण देसले Jun 28, 2017 04:54 AM

सर मला शेळी पालन करायचे आहे

भरत वामनराव वानखडे राहणार परतवाडा ता- अचलपूर जि अमरावती Jun 22, 2017 04:07 PM

सर मला बकरी पालन कराचे आहे मार्गदर्शन हवं आहे प्लझ सर 73*****75 हा व्हॉts अप no आहे

Anonymous Jun 15, 2017 04:03 PM

मला बंदिस्त शेळी पालन करावयाचं असून त्यासाठी १ एक्कर पुरेशी आहेका , त्यांत शेळ्यांच खाद्य आणि शेड होऊ शकतेक ?
कृपया मला माहिती द्यावी .

आपल्या सूचना पोस्ट करा

(वरील विषयासाठी जर तुमच्या काही प्रतिक्रिया किंवा सूचना असतील तर या ठिकाणी नोंदवा)

Enter the word
नेवीगेशन

T5 2019/10/17 06:22:59.961076 GMT+0530

T24 2019/10/17 06:22:59.967477 GMT+0530
Back to top

T12019/10/17 06:22:59.498036 GMT+0530

T612019/10/17 06:22:59.516927 GMT+0530

T622019/10/17 06:22:59.542711 GMT+0530

T632019/10/17 06:22:59.543529 GMT+0530