Skip to content. | Skip to navigation

Vikaspedia


T2 2019/06/16 18:01:49.142197 GMT+0530
मुख्य / शेती / पशूपालन / शेळी पालन / शेळीनिवड आणि तांत्रिक मार्गदर्शन
शेअर करा

T3 2019/06/16 18:01:49.147685 GMT+0530
Views
  • स्थिती: संपादनासाठी खुला

T4 2019/06/16 18:01:49.177935 GMT+0530

शेळीनिवड आणि तांत्रिक मार्गदर्शन

शेळीपालनासाठी उस्मानाबादी आणि संगमनेरी शेळी चांगली आहे. शेळ्या विकत घेताना पशुतज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार खरेदी कराव्यात. एकदा वेत झालेली (व्यायलेली) शेळी विकत घेणे चांगले असते.

  1. शेळीपालनासाठी उस्मानाबादी आणि संगमनेरी शेळी चांगली आहे. शेळ्या विकत घेताना पशुतज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार खरेदी कराव्यात. एकदा वेत झालेली (व्यायलेली) शेळी विकत घेणे चांगले असते. तिची आई जुळी करडे देणारी शेळी मिळत असेल, तर अशा शेळीची पैदास विकत घेणे चांगले असते.
  2. दुभती शेळी निवडताना तिचे वय, करडांची संख्या, दुधाचे प्रमाण इत्यादी गोष्टींकडे लक्ष द्यावे. दुभती शेळी चपळ असावी. शेळीपालनाचे यश पैदाशीसाठी वापरलेली शेळी व बोकड यावर अवलंबून आहे, म्हणून उत्पादनाच्या उद्दिष्टांसाठी योग्य शेळी व बोकडांची निवड करावी.
  3. शेळी आकाराने मोठी असावी. तिची मान लांब असावी. तोंडापासून शेपटीपर्यंत असणारा लांबपणा हेही महत्त्वाचे लक्षण आहे. केस मऊ व चमकदार दिसणारे असावेत. बांधा मोठा असावा, जेणेकरून दोन किंवा अधिक करडांना शेळी आपल्या गर्भाशयात जोपासू शकेल.
  4. शेळीचे सर्व दात बळकट व सुस्थितीत असावेत. शक्‍यतो एक ते दोन वर्षे वयाचीच (दोन ते चार दाती) शेळी विकत घ्यावी. पाय सरळ, पिळदार व खूर (टाचा) उंच असावेत. चरताना अंतर पार करण्यासाठी मजबूत पायांचा उपयोग होतो.
  5. शेळी विकत घेताना तिची कास नीट पारखून घ्यावी. तिला कासदाह तर नाही ना, याची तपासणी करावी. दुभत्या शेळीची धार काढून पाहावी. दुधाचे प्रमाण, दुधाचा रंग, कासेवर सूज या गोष्टी पारखून घ्याव्यात.


संपर्क - 02426-243455 
संगमनेरी शेळी संशोधन योजना, 
महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी.

स्त्रोत: अग्रोवन

3.125
तारकाचिह्नांवर जा आणि मूल्यांकन देण्यासाठी क्लिक करा
गोटु पाटील बिल्लाळीकर Jul 22, 2015 09:24 AM

मला बंदिस्त शेळी पालन करने करीता शासन योजना आहे का?96*****77

आपल्या सूचना पोस्ट करा

(वरील विषयासाठी जर तुमच्या काही प्रतिक्रिया किंवा सूचना असतील तर या ठिकाणी नोंदवा)

Enter the word
नेवीगेशन

T5 2019/06/16 18:01:49.353496 GMT+0530

T24 2019/06/16 18:01:49.359458 GMT+0530
Back to top

T12019/06/16 18:01:49.087340 GMT+0530

T612019/06/16 18:01:49.107652 GMT+0530

T622019/06/16 18:01:49.131848 GMT+0530

T632019/06/16 18:01:49.132639 GMT+0530