অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

शेळीपालन- नेहमी विचारले जाणारे प्रश्न

शेळीपालन- नेहमी विचारले जाणारे प्रश्न

१. शेळी पालनासाठी लहान पिल्ले/ करडे कोठे मिळतील?

उत्तर: शेळीचे लहान करडू माहितीसाठी औरंगाबाद येथील शासकीय शेळी पैदास केंद्र पडेगाव येथे संपर्क साधावा. किंवा  नजीकच्या पशुसंवर्धन विस्तार अधिकारी यांच्याशी संपर्क साधून या संबंधी अधिक माहिती घ्यावी.

२. शेळी पालन केल्या नंतर त्याची विक्री कशी करायची?

उत्तर: स्थानिक गुरांच्या बाजारपेठेत बोकड विक्री करता येतात. मादी शेळ्या काही शेळी प्रकल्पांना देता येतात. शेळी फार्म सुरु आल्यावर ग्राहक फार्म वरून सुद्धा शेळ्या/बोकड विकत घेऊन जातात असा अनुभव आहे.

३. शेळी पालनासाठी काही शासकीय योजना आहेत का? त्या साठी कुणाशी संपर्क करावा?

उत्तर: शेळी पालनाविषयी काही सरकारच्या योजना आहेत. अधिक माहितीसाठी आपल्या जिल्ह्यातील उप आयुक्त पशुसंवर्धन कार्यालयाशी संपर्क साधावा.

४. शेळी पालनासाठी उत्तम जात कोणती?

उत्तर: उस्मानाबादी शेळी दूध आणि मांसासाठी प्रसिध्द आहे. बोअर (अफ़्रिकन) जातीची शेळी खास मांसासाठी जास्त फायदेशीर आहे. उस्मानाबादी शेळीला संपूर्ण शेतात फ़िरुन वेगवेगळा चारा खाण्याची सवय असते. बोअर जातीच्या शेळ्या ह्या गायी म्हशी सारख्या चारा खातात. आपण आपल्याकडे उपलब्ध असलेल्या सोयीनुसार वरीलपैकी जातीची निवड करावी.

५. बोअर जातीच्या शेळ्या कुठे उपलब्ध होतील?

उत्तर: बोअर जातीच्या बोकड करिता निंबकर सीड्स फलटण येथे संपर्क साधावा. फोन Phone: 02166 - 222298, 221375.

६. शेळीपालनाविषयी संपूर्ण माहीती द्यावी.

उत्तर: शेळीपालन या विषयी च्या अधिक माहिती साठी आपण विकासपीडिया http://mr.vikaspedia.in/ या मराठी विकासपीडिया वेबपोर्टला भेट द्या/ जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी कार्यालयास किंवा जवळच्या कृषी विद्यापीठाला भेट द्या. अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

http://mr.vikaspedia.in/agriculture/animal-husbandry/92c915930940-92a93e932928

७. शेळी पालन व्यवसाय सुरु करण्यासाठी पहिल्यादा काय करायला लागेल?

उत्तर: शेळी पालन करण्या पूर्वी या बाबतची सर्व माहिती घ्यावी, या विषयावर प्रशिक्षणे उपलब्ध आहेत,त्या प्रशिक्षणात सहभागी व्हावे. काही सुरु असलेल्या शेळी फार्म ला भेट द्यावी आणि नंतरच सुरु करावे !!!

८. शेळ्यांना चारा/ खाद्य काय द्यावे? आणि कोणत्या वेळेत द्यावे?

उत्तर: १ लिटर पेक्षा जादा दुध देणाऱ्या शेळ्यांना ३-४ किलो हिरवा चार/दिवस, वाळलेला चारा १ किलो, १००-२०० ग्राम खुराक देणे. सेवरी, अंजन, हदगा, बाभूळ, सुबाभूळ, बोर, वाद, पिंपळ इ. झाडांचा पाला शेळ्या आवडीने खातात.

९. शेळ्यांना चारा कोणत्या वेळी व काय द्यावा?

उत्तर: १ लिटर पेक्षा जादा दुध देणाऱ्या शेळ्यांना ३-४ किलो हिरवा चार/दिवस, वाळलेला चारा १ किलो, १००-२०० ग्राम खुराक देणे. सेवरी, अंजन, हदगा, बाभूळ, सुबाभूळ, बोर, वाद, पिंपळ ए. झाडांचा पाला शेळ्या आवडीने खातात.

१०. शेळी पालनासाठी प्रशिक्षण केंद्र व पत्ता, शेळ्या मिळण्याचे ठिकाण या संबंधी माहिती द्या.

शेळी पालनासाठी पशुसंवर्धन विभागामार्फत प्रशिक्षण राबवले जातात. प्रशिक्षणासाठी आपण आपल्या जिल्ह्यातील जिल्हा उप आयुक्त पशुसवर्धन यांच्याशी संपर्क साधावा आणि योग्य मार्गदर्शन घ्यावे. तसेच आपल्या जवळच्या पशुमहाविद्यलय किंवा काही ठिकाणी चालू असलेल्या शेळी फार्मला भेट द्यावी

शेळी पालन व्यवसाया संबधी योजना बाबत अहिल्याबाई होळकर शेळी व मेंढी विकास महामंडळ गोखलोनगर पुणे ४११०५३ महात्माफुले विकास महामंडळ जिल्हा उद्योग केंद्र यांचेशी संपर्क साधावा.

शेळया मिळण्याससाठी संपर्क-

१. अहिल्यादेवी होळकर, शेळी, मेंढी विकास महामंडळ, गोखलेनगर पुणे- ४११०५३, फोन - 020-25667895

२. निमकर सीड्स प्रायवेट लिमिटेड -http://www.indiaboer.com/index.php , Phone: 02166 - 222298, 221375

११. शेळ्यांच्या नोंदी कशा ठेवाव्यात?

उत्तर: शेळ्यांच्या नोंदी कशा प्रकारे ठेवता येतील? या माहितीसाठी आपण पुढील लिंकवर क्लिक करावे

http://mr.vikaspedia.in/agriculture/animal-husbandry/92c915930940-92a93e932928/93694793394092a93e93292893e924940932-92894b90292693593994091a947-90592892894d92f93893e92793e930923-92e93992494d92494d935.

१२. थंडीत करडांची कोणती काळजी घ्यावी.

उत्तर: या संबंधी अधिक माहितीसाठी पुढील लिंकवर क्लिक करा.

http://mr.vikaspedia.in/agriculture/animal-husbandry/92c915930940-92a93e932928/925902921940924-91593092193e90291a940-91593e93391c940-915936940-91894d92f93e935940

उत्तर: या संबंधी अधिक माहितीसाठी पुढील लिंकवर क्लिक करा.

http://mr.vikaspedia.in/agriculture/animal-husbandry/92c915930940-92a93e932928/93694793394d92f93e90291a940-92893f935921-915936940-91593093e935940

१३. कोकण कल्याण शेळीबाबत माहिती द्या.

उत्तर: या संबंधी अधिक माहितीसाठी पुढील लिंकवर क्लिक करा.

http://mr.vikaspedia.in/agriculture/animal-husbandry/92c915930940-92a93e932928/91594b915923-91592894d92f93e933-93694793394092c93e92c924-92e93e93993f924940-92694d92f93e935940

माहिती स्रोत: मराठी विकासपीडिया

अंतिम सुधारित : 7/25/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate