অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

शेळीपालनाची पंचसूत्री

शेळीपालन  हा प्रामुख्याने  अल्पपूधारक, भूमिहीन  शैतकरी/मजूर, ग्रामीण महिला व कोरडवाहू भाग असा आर्थिकदृष्ट्या व नैसर्गेिक कमतरता असलेल्या  भागात  करावयाचा  उदरनिर्वाहाल पूरक म्हणून मान्यता पावलेला  व्यवसाय आजपर्यंत होता. या व्यवसायाचे  दिसून आलेले  महत्व  व उपयुक्तता तसंच लागणारं अत्यल्प भांड्वल, कायमस्वरूपी  उपलब्ध असलेल बाजारपेठ यामुळे शेळीपालन या व्यवसायाकडं मोठ्या प्रणाणावर लोक आकर्षित झाले आहेत. दुग्धव्यवसाय हल्ली  परवडेनासा झाल्यामुळं बरंच दुग्धव्यवसायिक मोठ्या प्रणाणावर शेळीपालनाकडे  वळत आहे.

मात्र , या पद्धतीने शेळीपालन करावयास हवे याचा योग्य  विचार न करता चुकीच्या शेळीपालन  पद्धती, नवीन जातीच वापर, आधुनिकतेच्या नावाखाली गोठ्यांवर  केलेला वारेमाप खर्च , त्याचबरोबर बाहेरील  राज्यांतून हरिंपत्ती नावाने येणारा संवदड  शमीचा पाला शेतकरी विकत घेऊन शेळ्यांना खाऊ घालत आहे.   दुर्दैवाणे  अत्यंत फायदेशीरअसलेल  शेळींपालन व्यवसाय केवळ भ्रामक  संकल्पनांचा वापर केल्यामुळे अडचणीत सापडला आहे.

सद्यस्थितीचा अभ्यास करता शेळीपालन व्यवसायाची विभागणी पारंपारिक शेळीपालन आकृष्ट होऊन आधुनिक प्रसारण माध्यमे उदा. इंटरनेट  , फेसबुकच्या  माध्यमाचा वापर करून चुकीच्या संकल्पना उचलून शेळीपालनाकडे  वळत आहे. त्याचबरोबर अशा गरजवंताना हेरून शेलीपलनावर प्रशिक्षण देणाऱ्या संस्था व काही सल्लगार उदयास आले. आहेत . आणि कळत नकळत शेळीपालन नेमके कसे करावे ,याबाबत विवेचन करण्यात येत आहे. जेणेकरून नव्याने शेळीपालनाकडे वळणारे व्यावसायिक चुकीच्या मार्गावर जाणार नाहीत.

शेळीपालनाची पंचसूत्री,

  1. जातींची निवड
  2. आहार व्यवस्थापन
  3. गोठाबांधणी व व्यक्स्थापन
  4. आरोग्य  व्यवस्थापन
  5. पणन व्यवस्थापन/विक्री व्यवस्थापन

जातींची निवड

सद्यस्थितीत केवळ शेळीच्या  नवनवीन जातींच्या जाहिराती  शेळीपालकांच्या यशोगाथा यांचे  अंधानुकरण करून बरंचसे  शेळीपालक अडचणीत सापडले  दिसतात. वास्तवीक कृषि विद्यापीठ, पशुसंवंधन विभाग, केंद्रीय  शेळींपालन संशोधन संस्था तसंच भारतीय कृषि अनुसंधान परिषद यांनी सन १९४१ पासून शंळ्यांच्या विविध जाती,


देशी तसंच विदेशी जाती वापरुन संकराद्वारे शेळीसुधार कार्यक्रम  मोठ्या प्रणाणावर राबवून अत्यंत सखोल  संशोधनातून शेळीपालनात स्थानिक जातींचा वापर करण्याच्या सूचना  दिलेल्या आहेत . तसेच  पशुसंवर्धन खाते, महाराष्ट्र शासनाने देखील  राज्याचं पशुपैदास धोरण ठरवताना शेळीपालनात स्थानिक जातीचा  वापर करण्याचं धोरण स्पष्टपणे दिले आहेत. तरी देखील दुर्दैवाने बरेच शेतकरी सिरोही , जामुनापारी , सोजत,तोतापुरी यांसारख्या जातींचा वापर करताना दिसतात. बोअरसारखी विदेशी जातही बरेचसे शेतकरी वापरात आहेत. यासाठी शेळीपालकाना नम्रपणे शिफारशीत करण्यात येते कि , शेळीपालन करण्यासाठी आपल्याकडील स्थानिक जातीचाच वापर करा. निसर्गतः वातावरण , चाऱ्याची उपलब्धता  यानुसार महारष्ट्राला चार प्रमुख जाती दिलेल्या आहेत. विभागनिहाय या जातीचे वर्गीकरण पुढीलप्रमाणे
  1. मराठवाडा , पश्चिम महाराष्ट्राच्या  कोरडवाहू भागासाठीउस्मानाबादी शेळ
  2. अहमदनगर , नाशिक, पुणे या भागासाठी संगमनेरी शेळी
  3. कोकण विभागासाठी कोकण कन्याळ.
  4. विदर्भासाठी बेरारी. आपण आपल्या भागातील शेळ्याच बारकाईन निरीक्षण केल्यास आपल्या असे लक्षात  येईल की, या पूर्वी केलेल्या विविध जातींच्या मिश्रणातून  ४० त ८० टक्के  या विविध जातीच्या मिश्रतून तयार झालेल्या आहेत. त्यामुळं शेळ्यांची निवड करताना जातींपैक्षा शैळ्यांच्या गुणवत्तेला जास्त महत्व देण्यात  यावं. म्हणजेच  आपणास संगमनेरी  जात पाळावयाची असल्यास आपल्या भागातील शेळ्यानमधूनच २ ते ३ करडे देणारी,दोन वर्षातून तीन वित्ते देणारी , दुधाचे प्रमाण १.५ ते २ लिटरपेक्षा जास्त असणारी शेळी निवडावी . मात्र , पैदाशीसाठी जातिवंत बोकड योग्य ठिकाणाहून व्यवस्थित पाहणी करून आणावा . जेणेकरून हळूहळू आपल्याकडे जोतीवंत शेळ्यांचा कळप तयार होईल .

आहार व्यवस्थापन

शेळीपालन व्यवसायाचा बारकाईने अभ्यास केल्यास आपल्या निदर्शनास येईल की, आहार व्यवस्थापनावर एकूण खर्चाच्या किमान ७० ते ८० टक्के खर्च झालेला आहे. वस्तूतः शेळी हा प्राणी निसर्गाने मानवाला दिलेले एक असे संयंत्र आहे की, यांच्याद्वारे कुठलेही जनावर खात नसलेला चारा, शेतीतील दुय्यम पदार्थ, झाडपाला यांचे रूपांतर आपल्याला उपयुक्त असे दूध, मांस, कातडी व लोकर यामध्ये सारखा घटक त्याचबरोबर सुबाभळीमधील 'मायमोसीन' सारखा घटक शेळी सहज पचवू शकते. मात्र, शेळीच्या या बलस्थानाकडे दुर्लक्ष करून बरेच नवीन शेळीपालक शेळ्यांसाठी विशिष्ट चारा, पशुखाद्य यांचा वापर करीत आहेत. या चुकीच्या आहार व्यवस्थापनामुळे शेळ्यांचा आहारावरील खर्च वाढतोच आहे. मात्र, त्याचा गंभीर परिणाम उपलब्ध चारा स्रोतावर होत आहे. त्यामुळे शेळी माणसालाही आहारासाठी प्रतिस्पर्धी ठरू पाहते आहे.

आहारावरील खर्च कमी करण्यासाठी पुढील बाबींचा अवलंब करावा

अ) शक्यतो बंदिस्त शेळीपालन टाळावे.

ब) शेळी आपली ७० ते ८० टक्के भूक ही द्विदल चा-यावर भागविते. ही नैसर्गिकक्षमता लक्षात घेऊन शेळ्यांच्या आहारात जास्तीतजास्त प्रमाणात झाडपाल्याचा वापर करावा. शेळीपालन करण्यापूर्वी आपल्या शेताच्या बांधावर तसेच जेथे जेथे मोकळी जागा आहे त्या ठिकाणी लिंब, बाभूळ, सुबाभूळ, हादगा, शेवगा अशी दुहेरी उपयोगाची झाडे बेहडा, अर्जुन अशा निरनिराळ्या झाडांची लागवड करावी.

क) आपल्या शेतात उत्पादित होणारी सर्व दुय्यम उत्पादने उदा. कडबा या सर्व गोष्ठींचा शेळ्यांच्या आहारात जास्तीतजास्त वापर करावा.

ड) शेळ्यांना हिरवा चारा घालताना त्यातील पाण्याचे प्रमाण ६० ते ७० टक्केपेक्षा जास्त असू नये, याची काळजी घ्यावी.

ई) शेळ्यांना चारा देताना कुट्टी करून गव्हाणीतुनच द्यावा. शक्य असल्यास चान्याच्या पेंढ्या टांगून ठेवा म्हणजे चान्याचा वापर पूर्ण क्षमतेने होईल व चा-यावरील खर्च आपोआप कमी होईल.

फ) शेळ्यांना खाद्य देताना विकतचे शेळीखाद्य वापरण्याचा अट्टाहास टाळा. शेळ्यांच्या खाद्याची गरज आपल्याकडे उपलब्ध असलेले गहू,

मका, सातू, कडधान्याची चुणी यांच्याद्वारे भागवावा. शेळीखाद्य घरीच तयार करण्यासाठी खालील कोष्टकाचा वापर करावा.

धान्य उदा. मका, गहू, ज्वारी भाताचा कोंडा, ५० ते ६० टक्के
गव्हाचा कोंडा इ. सरकी, शेंगदाणा यासारख्या तेलबियांची पेंड १० ते १५ टक्के
हरभरा, तूर, सोयाबीन इ. कडधान्याची चुणी २० ते २५ टक्के
मीठ १ टक्के
क्षारमिश्रण २ टक्के

खाद्यावरील खर्च कमी करण्यासाठी वरील कोष्टकानुसार आपल्याकडे उपलब्ध असलेल्या पदार्थाचा वापर करावा, म्हणजे खाद्यावरील खर्च कमी होईल.

ग) अपारंपरिक चारा व खाद्य स्रोतांचा वापर आपल्याकडे असणा-या नावाखाली नव्याने प्रचलित होत असलेल्या हायड्रोपोनिक्स, अॅझोला यांचा अत्यल्प प्रमाणात वापर करा.

गोठा बांधणी/ व्यवस्थापन

निसर्गाने शेळ्या व मेंढ्या या प्राण्यांची निर्मिती 'विनाविहार विनाआहार’ या तत्वाने केली आहे. याच प्राण्यांना कुठल्याही विशिष्ट प्रकारच्या गोठ्याची आवश्यकता नसते. मात्र, अतिऊन, वारा, पाऊस, हिंस्र श्वापदे यांपासून संरक्षण करण्यासाठी कमीतकमी खर्चात उपलब्ध साधनसामुग्रीचा वापर करून शेळ्यांसाठी सुयोग्य गोठा बनवावा. बरेच शेळीपालक आपल्या गोठ्यात माचणाचा वापर करतात. वस्तूत: फक्त अतिपावसाच्या प्रदेशात माचणाचा वापर इष्ट ठरतो. गोठा बांधताना त्याची लांबी पूर्व-पश्चिम ठेवावी. छत इंग्रजी A आकाराचे बांधा, छताची उंची मध्यभागी १० ते १५ फूट व कडेला ६ ते ८ फूट अशी ठेवावी. गोठ्यातील जमीन शक्यतो मुरमाची चांगली, सिमेंट कोब्याचा वापर करू नका. त्याऐवजी गोठ्यात विटा अंथराव्यात. गोठ्याच्या व्यवस्थापनात प्रामुख्याने मलमूत्राचा नीट निचरा होण्याची काळजी घ्यावी, गोठा कोरडा राहण्यासाठी चुन्याच्या भुकटीचा वापर करावा, गोठा दररोज झाडून घ्यावा तसेच गोठ्यातील खाचखळगे वेळच्यावेळी भरून काढावेत. गोचीड, पिसवा यांचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी महिन्यातून १ ते २ वेळा गरजेनुसार गोठा

स्वच्छ करुन गोचीड व पिसवांचे नियंत्रण करावे.

आरोग्य व्यवस्थापन

शेळ्यांच्या आरोग्य व्यवस्थापनात तीन महत्वाच्या बाबींकडे लक्ष द्यावे.

  1. योग्य वेळी लसीकरण: शेळ्यांमधील लसीकरणाचे पुस्तकी तक्ते न वापरता पशूवैद्यकाच्या सल्ल्याने आंत्रविषार व पीपीआर या दोन जंतनिमुर्लन वर्षातून ३ ते ४ वेळा दरवेळी वेगवेगळ्या जंतनाशकाचा वापर करून पशुवैद्यकाच्या सल्ल्याने करावे.
  2. आजारी जनावरांची योग्य विल्हेवाट लावावी.
  3. पणन विक्री व्यवस्थापन

यशस्वी शेळीपालनाचे महत्वाचे सूत्र म्हणजे शेळ्यांचे विक्री व्यवस्थापन. बहुतांशी शेळी व्यावसायिक शेळीपालन म्हणजे ईदसाठी बोकड विक्रेते या एकाच संकल्पनेतून करताना दिसून येतात. दुर्दैवाने ईदच्या बाजारात बोकडांची आवक वाढल्याने अपेक्षित भाव बोकडांना मिळत नाही व दुर्दैवाने ब-याचदा तोट्यात व्यवसाय येतो. शेळीपालन करताना बाजारपेठेचा अभ्यास केल्यास आपल्या लक्षात येईल की, स्थानिक बाजारात एक वर्षांच्या आतले व २0 ते २५ कि.ग्रॅ. वजनाच्या बोकडाच्या मासासाठी मागणी आहे. याउलट इंदसाठी १ वषांच्या पुढचे व जास्तीतजास्त वजन असणा-या बोकडांची खरेदी केली जाते. म्हणजेच ईदसाठी केलेले बोकड ईदच्या बाजारात विकला गेला नाही तर पुढच्या ईदपर्यंत सांभाळण्याची जबाबदारी आपल्याला घ्यावी लागते आणि याच ठिकाणी शेळीपालकाचा निर्णय चुकतो. म्हणूनच आपल्याकडे जन्माला येणा-या करडांपैकी विक्री करण्यासाठी पुढीलप्रमाणे नियोजन करावे.

● १o ते १५ टक्के बोकड पैदाशीसाठी विकावेत.

● १o ते १५ टक्के बोकड ईदसाठी तयार करावेत.

● ४0 ते ५0 टक्के बोकड स्थानिक बाजारात विक्रीसाठी तयार करावेत.

● बोकडांची विक्री करताना शक्यतो वजनानुसारच करावी, त्याकरिता

बोकडांचे वजन × प्रचलित मटणाचा दर  /  २

या सुत्राचा सर्वसाधारणपणे अवलंब करावा.

● ईद पैदाशीचे बोकड/पाठी विकताना जास्त दर ठेवावा. अशारितीने विक्री व्यवस्थापन केल्यास आपल्या व्यवसायात नफ्याचे प्रमाण वाढेल. नवीन शेळीपालकांसाठी पुढील काही धोक्याची वळणे निर्देशित करीत आहोत.

  1. शेळीपालनात मुरघास, हायड्रोपोनिक्सचा जास्तीचा वापर.
  2. शेळ्यांची निर्यात.
  3. शेळ्यांमधील कृत्रिम रेतन.

शेळीपालकांनो यशस्वी शेळीपालनासाठी दिलेल्या पंचसूत्रीचा वापर केल्यास आपला व्यवसाय कदापिही तोट्यात येणार नाही, हे निश्चित.


स्त्रोत - कृषी विभाग महाराष्ट्र शासन

 

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate