Skip to content. | Skip to navigation

Vikaspedia


T2 2019/10/14 06:26:5.975305 GMT+0530
मुख्य / शेती / पशूपालन / शेळी पालन / शेळीपालनात नोंदवहीचे महत्त्व
शेअर करा

T3 2019/10/14 06:26:5.981403 GMT+0530
Views
  • स्थिती: संपादनासाठी खुला

T4 2019/10/14 06:26:6.017782 GMT+0530

शेळीपालनात नोंदवहीचे महत्त्व

शेळीपालन हा व्यवसाय नफ्यात करावयाचा असेल, तर गोठाबांधणीसाठी कमीत कमी खर्च व स्वतःचा चारा तयार केल्यास हा व्यवसाय उत्तम आहे.

शेळीपालन हा व्यवसाय नफ्यात करावयाचा असेल, तर गोठाबांधणीसाठी कमीत कमी खर्च व स्वतःचा चारा तयार केल्यास हा व्यवसाय उत्तम आहे. शेळीपालनामध्ये वेगवेगळ्या गोष्टींच्या नोंदीसाठी विशेष महत्त्व आहे. शेळीपालनामध्ये तक्त्यांनुसार विविध नोंदी ठेवणे खूप आवश्‍यक आहे. जर शेळीपालकांनी नोंदी ठेवल्या तर तो शेळीपालन व्यवसाय नफ्यात आल्याशिवाय राहत नाही.

भारतात शेळीला गरिबांची गाय म्हणतात. विशेषतः ग्रामीण भागातील ७० टक्के गरीब महिला, सुशिक्षित बेरोजगार, अल्पभूधारक, मजूर व भूमिहीन लोक हा व्यवसाय किफायतशीरपणे करतात. भारतात शेळीच्या जवळपास २० जाती आहेत. त्यामध्ये जमुनापारी, सिरोही, सुरती आणि महाराष्ट्रातील उस्मानाबादी व संगमनेरी शेळ्या या जातींना विशेष महत्त्व आहे.

शेळीपालनामध्ये चांगला व सकस चारा उपलब्ध झाल्यास शेळी २ वर्षांत ३ वेळा विते. २ करडे देणाऱ्या शेळ्यांना विशेष महत्त्व आहे. बोकडाच्या मटणासाठी धार्मिक बंधने नाहीत. चांगल्या प्रतीचे मटण, दूध, खत (लेंडीखत) व कातडी इत्यादी उत्पन्न मिळते. शेळीला १२-१५ चौ. फूट जागा व करडास ७-८ चौ. फूट बंदिस्त जागा व २५ चौ. फूट मोकळी जागा आवश्‍यक असते.

आपल्याला जर शेळीपालन हा व्यवसाय नफ्यात करावयाचा असेल, तर गोठाबांधणीसाठी कमीत कमी खर्च व स्वतःचा चारा तयार केल्यास हा व्यवसाय उत्तम आहे. शेळीपालनामध्ये वेगवेगळ्या गोष्टींच्या नोंदीसाठी विशेष महत्त्व आहे. जर आहाराच्या नोंदी, पिलांच्या नोंदी, गाभणकाळाच्या नोंदी व इतर नोंदी जर आपण ठेवू शकलो नाही तर हे शेळीपालन व्यवसाय तोट्यात नेणारे प्रमुख कारण मानले जाते.

शेळीपालनामध्ये किंवा कोणत्याही पशुपालन व्यवसायामध्ये नोंदवही नसणे ही एक चिंतेची बाब म्हणण्यास काहीही हरकत नाही.

नोंदवहीचे महत्त्व व प्रमुख कारणे -

१) अपेक्षित वंशावळीची मादी व नर ओळखण्याकरिता.
२) शेळी व्यवस्थापनेमध्ये -
- शेळीची उत्पादनक्षमता चाचणी.
- अनुवंश व पैदाशीसाठी नर व मादी निवड.
- औषधोपचार नोंदी.
- शास्त्रोक्त शेळीपालन व प्रक्षेत्र व्यवस्थापन.
३) शेळीपालनातील उत्तम व निकृष्ट शेळ्या निवडून निकृष्ट प्रक्षेत्रामधून काढून टाकणे.
४) जर सर्व नोंदी असतील तर एखाद्या अडचणीवर मात करून शेळीचे उत्पादन वाढविण्यासंबंधी त्वरित निर्णय घेता येतो.
५) शेळीपालनामध्ये पुढे दिलेल्या वेगवेगळ्या तक्त्यांनुसार विविध नोंदी ठेवणे खूप आवश्‍यक आहे. जर पुढे दिल्याप्रमाणे शेळीपालकांनी नोंदी ठेवल्या, तर तो शेळीपालन व्यवसाय नफ्यात आल्याशिवाय राहत नाही.

विक्री नोंदवही -

विक्रीची तारीख ---- जनावराचा बिल्ला क्रमांक ---- विक्री वेळेस वय ---- विक्री वेळेसचे वजन ---- विक्री किंमत ---- कोणाला विकले ---- कापण्यासाठी/ पैदाशीसाठी

करडांच्या वजनांची नोंदवही -

करडाचा बिल्ला क्रमांक ---- नर/मादी ---- करडाची जन्मतारीख ---- जन्मतः वजन ---- वजनाची तारीख ---- वजन (कि.ग्रॅ.) ---- शेरा

शेळ्यांच्या वजनांची नोंदवही -

शेळीचा बिल्ला क्रमांक ---- वजनाची तारीख ---- वजन (कि.ग्रॅ.) ---- वजन वाढ/घट ---- शेरा

शेळी विण्याची नोंदवही -

शेळीचा बिल्ला क्रमांक ---- संकराची तारीख ---- वापरलेला बोकड बिल्ला क्र./नाव ---- शेळी गाभ गेली का? होय/नाही ---- शेळी व्यायल्याची तारीख ---- करडांची संख्या ---- करडांचा बिल्ला ---- करडाचे वजन ---- शेरा
---- ---- ---- ---- ---- नर ---- मादी ---- एकूण ---- क्रमांक/नाव/वर्णन ---- जन्मतः ---- ३ रा महिना ---- ६ वा महिना ---- १ वर्ष ----

प्रत्येक शेळीबद्दलच्या माहितीची नोंदवही -

शेळीचा बिल्ला क्रमांक ---- शेळीचे वर्णन ---- जन्मतारीख/ विकत घेतेवेळचे (अंदाजे) वय ---- खरेदी तारीख (खरेदी केली असल्यास) ---- शेळीचा जन्मप्रकार एक/ जुळे/ तिळे ---- शेळीची जात ---- शेळी वंशावळ ---- शेळीच्या विण्याच्या तारखा ---- शेरा
---- ---- ---- ---- ---- ---- आई ---- बाप ---- दिनांक ---- शेळी व्यायली गाभाडली ---- एकूण करडांची संख्या
---- ---- ---- ---- ---- ---- ---- ---- ---- ---- नर ---- मादी ---- एकूण ----

कळपातील एकूण शेळ्यांची संख्या दर्शविणारी नोंदवही -

सुरवातीची संख्या ---- संख्येत वाढ व कारणे ---- संख्येत घट व कारणे ---- दिवसअखेर जनावरे
प्रौढ ---- करडे ---- एकूण ---- नवीन जन्मलेली करडे ---- नवीन खरेदी ---- ---- प्रौढ ---- करडे ---- एकूण
नर ---- माद्या ---- नर ---- माद्या ---- नर ---- माद्या ---- नर ---- माद्या ---- नर ---- माद्या ---- नर ---- माद्या ---- ---- नर ---- माद्या ---- नर ---- माद्या ---- नर ---- माद्या

रोजचा औषधोपचार नोंदवही -

तारीख ---- बिल्ला क्रमांक ---- लक्षणे ---- उपचार

मरतूक नोंदवही -

जनावराचा बिल्ला क्रमांक ---- मृत्यूची तारीख ---- मृत्यूचे कारण

डॉ. तेजस शेंडे, ९९७०८३२१०५
(लेखक पशू अनुवंश व पशुपैदास विभाग, क्रा. ना. पा. पशुवैद्यकीय महाविद्यालय, शिरवळ येथे सहायक प्राध्यापक आहेत.)

------------------------------------------------------------------------------------------------

स्त्रोत: अग्रोवन

3.15662650602
गजानन Sep 03, 2017 10:13 PM

मला शेळीपालन विषयी माहीती हवी , कृपया मला मार्गदर्शन करावे माझा व्हाट्सआप नंबर 99*****96

chandrakant yadav Aug 14, 2017 04:36 PM

mala shelyanvishay mahiti havi ahe mo.72*****35

जयवंत Jun 15, 2017 05:35 PM

whatsapp ग्रुप असेल तरadd92*****49 murbad ठाणे
फक्त शेळी पालन ग्रुप

निलेश जगताप Jun 07, 2017 05:43 PM

मला शेळी पालन करायचे आहे . मार्गदर्शन करावे माझा व्हाट्स अँप नंबर ९७६३८३६०६१
आभारी आहे

Dr kurukkar May 30, 2017 09:26 PM

I like to start goat farm, pls suggest me how can I do project report.

आपल्या सूचना पोस्ट करा

(वरील विषयासाठी जर तुमच्या काही प्रतिक्रिया किंवा सूचना असतील तर या ठिकाणी नोंदवा)

Enter the word
नेवीगेशन

T5 2019/10/14 06:26:6.406452 GMT+0530

T24 2019/10/14 06:26:6.412655 GMT+0530
Back to top

T12019/10/14 06:26:5.910789 GMT+0530

T612019/10/14 06:26:5.939978 GMT+0530

T622019/10/14 06:26:5.964097 GMT+0530

T632019/10/14 06:26:5.964994 GMT+0530