Skip to content. | Skip to navigation

Vikaspedia


T2 2019/06/26 17:55:46.676577 GMT+0530
मुख्य / शेती / पशूपालन / शेळी पालन / शेळ्या-मेंढ्यांतील आंत्रविषार रोग
शेअर करा

T3 2019/06/26 17:55:46.683827 GMT+0530
Views
  • स्थिती: संपादनासाठी खुला

T4 2019/06/26 17:55:46.726806 GMT+0530

शेळ्या-मेंढ्यांतील आंत्रविषार रोग

कोवळे गवत शेळ्या-मेंढ्यांनी भरपूर खाल्ल्यामुळे आंत्रविषार आजार होतो.

आंत्रविषार आजार

कडक उन्हाळ्यानंतर पावसाळा सुरू होऊन कोवळे गवत जास्त प्रमाणात दिसून येते. हे कोवळे गवत शेळ्या-मेंढ्यांनी भरपूर खाल्ल्यामुळे आंत्रविषार आजार होतो. लहान कोकरांना, करडांना जास्त दूध पाजणे. अतिकर्बयुक्त पदार्थ म्हणजे मका, गहू, ज्वारी इ. जास्त प्रमाणात खाण्यात आल्यास याची लक्षणे दिसतात. 
या आजाराची लक्षणे म्हणजे करडे, कोकरे निस्तेज दिसतात, दूध पीत नाहीत, सुस्त, एका जागेवर बसून राहतात. पातळ हिरव्या रंगाची संडास होते. तोंडास फेस येतो. बाधित पिल्ले हवेत उडी मारून जमिनीवर पडतात. चक्कर येते. मोठ्या शेळ्या-मेंढ्या 24 तासांपर्यंत राहतात. त्यांच्यामध्ये तोंडातून फेस येणे, लाल येणे, अडखळत चालणे, दात खाणे, तोल जाणे, गोल फिरणे, श्‍वासोच्छ्वासास त्रास होणे आणि शेवटच्या टप्प्यात पोटफुगी, जुलाब ही लक्षणे आढळून येतात.

उपचार

अल्प मुदतीचा आजार असल्यामुळे प्रभावी उपचारपद्धती नाही, पण पशुवैद्यकांच्या सल्ल्याप्रमाणे प्रतिजैविके द्यावीत, त्यामुळे पोटातील विष शोषण्याचे प्रमाण कमी होते व जिवाणूंची वाढ होणे थांबते. कोवळे, लुसलुशीत हिरवे गवत जास्त प्रमाणात खाऊ घालू नये. लहान करडांना, कोकरांना गरजेपेक्षा जास्त दूध पाजू नये. अतिकर्बयुक्त पदार्थ (ज्वारी, मका इ.) जास्त प्रमाणात खाऊ घालू नये. गाभण शेळ्या-मेंढ्यांना पशुतज्ज्ञांकडून योग्य कालावधीत आंत्रविषार लसीकरण करून घ्यावे.
संपर्क - डॉ. साखरे - 9423759490

 

सुभाष फराटे, जालना

माहिती संदर्भ : अॅग्रोवन

3.06666666667
Vijay raju rumne Aug 27, 2016 10:38 PM

Sir mazya kadhe ek mendha haye to char divsa pasun jast kahi khat naay ani tyachya tondala thodasa fes pan yeto laal galalya saarkha jibh pan thodi laal diste mi davakhanyat sudha nehla pan aamchya hithe itka mahiti samjnara davakhana nit naaye pan please tumhi mala kahi tari upchar saanga maza mobile नो-77*****84

pandurang badad Jul 22, 2016 06:55 PM

सर माझा शेळी पालन हा वेवसाय आहे. सर बकरीला खूप संडास लागली आहे. आणि लहान करडांना तोंडाला फोड येत आहे. या वर उपचार सांगावा कृपया लवकरात लवकर माहिती द्यावी ही विनंती 99*****93,91*****03,95*****23

Ganesh Sakharkar Jul 16, 2016 06:53 PM

Mala sheli palan vishai chi sarva mahiti krupya mazya mail var pathva mazya kade sheti nahi sarkar chya yojna, bank loan, anudan baddal please mahiti pathva

KASHI Jul 09, 2016 01:07 PM

BENIFIT

गोविंद वाघमारे Apr 02, 2016 10:00 PM

मेंढ्याना अर होणारे आजार व उपाय.

आपल्या सूचना पोस्ट करा

(वरील विषयासाठी जर तुमच्या काही प्रतिक्रिया किंवा सूचना असतील तर या ठिकाणी नोंदवा)

Enter the word
नेवीगेशन

T5 2019/06/26 17:55:46.948517 GMT+0530

T24 2019/06/26 17:55:46.955145 GMT+0530
Back to top

T12019/06/26 17:55:46.567604 GMT+0530

T612019/06/26 17:55:46.598538 GMT+0530

T622019/06/26 17:55:46.650203 GMT+0530

T632019/06/26 17:55:46.651289 GMT+0530