অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

बदक पालन

बदक पालन एक उत्कृष्ट जोडधंदा:

बदक पालन हा व्यवसाय पु्र्वेकडील राज्यात त्याचप्रमाणे तामीलनाडुमध्ये मोठ्या प्रमाणावर केला जातो. ज्या ठिकाणी कुक्कुट पालनास पोषक असे हवामान नाही तेथे हा व्यवसाय चांगल्या पद्धतीने करतात त्यांच्याकडे अशणा-या बदकांची संख्या ८ ते १० असुन ती मोकाट सोडलेली असतात व वर्षाकाठी ६० ते ७० अंडी देतात. परंतू हाच व्यवसाय शास्त्रीय पद्धतीचा अवलंब करुन केला तर त्यात बराच फायदा होतो.

बदकांची अडी सकसः बदक पालन हा व्यवसाय अंडी आणि मांस उत्पादनाकरीता केला जातो. बदकांच्या अंड्यंना आजतरी विशेष मागणी नाही, याचे प्रमुख कारण म्हणजे यांचे उत्पादन आपल्याकडे फारच कमी आहे . जी काय अंडी किंवा पक्षी उपलब्ध असतात, ती प्रामुख्याने हॉटेलमध्ये वापरली जातात . दुसरे कारण बदकांच्या अंड्याला एक प्रकाराचा उग्र वास असल्या कारणाने त्यांची मागणी कमी असते. परंतु ज्यांनी ही अंडी खाण्यास सुरुवात केली ते हळूहळू ही अंडी पसंत करतात.


१०० ग्रॅम खाण्याजोग्या अंड्यात असणारी पोषणमुल्ये

 

विवरण

कोंबडी

बदक

अंड्याचे सरासरी वजन (ग्रॅम)

५०

७०

अंड्यातील पाण्याचे प्रमाण (ग्रॅम)

७४.५७

७०.८३

उर्जा (कॅलरीज)

१५८

१८५

प्रथिने (ग्रॅम)

१२.१४

१२.८१

स्निग्ध पदार्थ (ग्रॅम)

१५.१५

१३.७७

पिष्टमय पदार्थ (ग्रॅम)

१.२०

१.४५

खनिज पदार्थ

०.९४

१.१४

बदकाच्या जातीः

बदकांच्या जातीचे वर्गिकरण तीन गटात केले जाते.

१.  मांस उत्पादनाकरीताः यामध्ये  प्रामुख्याने आयलेसबरी , पेकीन यांचा समावेश आहे. या शिवाय राऊन्स , मसतोव्होस किंवा व्हाईट इंडियन रनर्स हे सुद्धा मांस उत्पादनकरिता वापरतात.

२.  अंडी उत्पादनाकरीताः यात प्रामुख्याने खाकी कॅम्पबेल, मॅगपाईज काळे किंवा निळे ऑरपिंगटस आणि व्हाईट स्टनब्रिज इत्यादीचा समावेश होतो. यासर्व जातीत खाकी कॅम्पबेल ही जात अत्यंत विकसित झाली असून , या जातीची वर्षासाठी २५० ते ३०० अंडे देतात.

३.  शोभेची बदकेः यात प्रामुख्याने टील , विडजन , पीनटेल ,पॉकहार्ड , करोलीना आणि शोव्हेलीअर या जातीचा समावेश होतो . ही बदके अत्यंत शोभीवंत असून , त्यांचे रंग सोनेरी , लाल , जांभळा , निळा , पांढरा ,पिवळा इत्यादी रंगाच्या विविध छटा युक्त असतात.

बदक पालन फायदेशीर होण्यासाठी या गोष्टीकडे द्याः

१)   बदकांच्या घरावर जास्त खर्च करु नका.

२)   दिवरभर बदके चरण्यास सोडल्यास त्याचा खाद्यावरील निम्मा खर्च कमी होतो.

३)   चांगल्या जातीची बदके ठेवा.

४)   दिवसातुन एक वेळा तरी बदकांचे निरक्षण करुन आजारी बदके आढळल्यास अलग करा. या गोष्टी काटेकोरपणे पाळल्या गेल्या तर हा व्यवसाय फायदेशीर होऊ शकतो.

या व्यवसायात एक दिवसाची पीले आणून त्याचे संगोपन करावे आणि नंतर साधारणपणे २० ते २२ आठवड्याचची झाल्यानंतर अंडी उत्पादनास सुरुवात होते. साधारणपणे १ वर्षात २७५ ते २९० अंडी उत्पादन असे एकंदर १८ महीने बदके ठेवावीत. हा व्यवसाय सुरु करतांना खालील बाबींकडे विशेष लक्ष द्यावे.

१) धंद्याचे प्रमाणः सूरुवातीला हा व्यवसाय लहान प्रमाणावर सुरु करावा. धंद्यातील यश, आणि अनुभव , त्यात येणा-या अडचणी व त्यावर घ्यावयाचे निर्णय , या बाबींचा अभ्यास झाल्यानंतर हा व्यवसाय हळूहळू सहज वाढविता येतो.

 

२) जागाः शक्य झाल्यास भाड्याने जागा मिळवावी म्हणजे गुंतवणुक कमी राहील. जागा स्वतःची असल्यास उत्तम .जागा शक्य तोवर नदी, नाले, तलाव किंवा सरोवर यांच्या आसपास असावी. यामुळे बदकांना लागणारे पाणी मुबलक मिळते. तसेच बदकांना नैसर्गी़क खाद्य ही उपलद्ध होते त्यामुळे त्याच्या खाद्यावरील खर्च काही प्रमाणात ( शेकडा ५० टक्के पर्यंत ) कमी होऊ शकतो.

३) भांडवलः हा व्यवसाय सूरु करतांना इतर धंद्याच्या तुलनेने कमी भांडवल लागते . भांडवल दोन प्रकारचे लागत असून त्यात अ) अनावर्ति खर्चःम्हणजे स्थिर किंवा दीर्घमुदतीचे भांडवल यात प्रामुख्याने बदकांना लागणा-या घरांची बांधणी , त्याच्या संगोपनात लागणारे खाद्य, पाणी यांची भांडी इत्यादीचा समावेश असतो. ब) आवर्ती खर्चः यात प्रामुख्याने खाद्य , मजुरी , औषध , विज देयक ,पशु विमा (बदकांचा वार्षिक विम्याचा हप्ता ), इत्यादीचा समावेश असतो.

४)  मजुरीः बदकांच्या युनिटला एक स्वयंरोजगार असल्यास इतर मजुराची आवश्यकता भासत नाही . पुढे व्यवसायाचा व्याप वाढल्यानंतर मजुरीवरील खर्चही वाढतो. साधारणपणे ५०० ते १००० बदकाकरीता एक मजूर ठेवणे जरुर असते.

५)  घरेः बदकाची घरे तात्पुरत्या स्वरुपाची असावी साधारणपणे  बास, बल्ली, तुह्राट्य़ा , पर्ह्याट्या ,तट्टे यांच्या साह्याने तयार केलेल्या घरांना खर्च कमी लागतो. बदकाकरीता पाण्याच्या उपलब्धेनूसाल स्थलांतरीत करण्याजोगी घरे बांधावी . ही घरे तयार करीत असतांना ३० ते ४० बदकाकरीता एक घर याप्रमाणे घरे तयार करावी.

६)  उपकरणेः बदकांच्या घरात लारणारी उपकरणे म्हणजे खाद्याची व पीण्याची भांडी होय. यातही बदकांच्या घरात जर सिंमेटची नाली तयार करुन त्यात पाणीपुरवठा केल्यास २४ तास स्वच्छ पाणी त्यांना मिळते. साधारणपणे २० बदकाकरीता १ खाद्याचे भांडे लागते. यानुसार खाद्याची भांडे किंवा ट्रे तयार करावीत. या शिवाय अंडी साठवण्याकरीता जाळीचे कपाट लागते.

७)  मिळकतः या व्यवसायाला प्रामुख्याने अंडी विक्रीपासुनच मिळकत मिळते . एक दिवसांची पिले आणुन संगोपन केल्यामुळे सुरुवातीला २० ते २२ आठवडे ही पिले पोसणे जरुर असते. एकदा बदकांचे अंडी उत्पादनास सुरवात झाल्यवर मिळकतीस सुरुवात होते. अलीकडे शासन ८ ते१० आठवड्याची पिले जर विकत घेतली तर घरी आणल्यानंतर २ महीन्यात उत्पादनास सुरुवात होते शिवाय पिलांना सुरुवातीच्या ३ ते ४ आठवडे पोसणे अत्यंत जिकरीचे असते त्यात बरीच पीले मृत्युमुखी पडण्याची शक्यता असते. जर ८ ते १० आठवड्यातील पीले विकत घेतली तर ही सुद्धा काळजी  मिटते.

शंभर बदकांच्या व्यवस्थापनेवर लागणारा खर्च व त्यापासून मिळणारे उत्पन्न

अ) अनावर्ती खर्च

बदकाचे घर २४० चौ. फुट २० फुट लांब व १२ रुंद रु. ४० /- प्रति चौ. फुट (कच्चे घर बास, तट्टे ,तु-हाटी व अँसबेसटॉसचे छत)

९६००/-

घराबाहेर तारेचे कुंपन (जाळी) १५०० चौ.फुट

४५००/-

६ फुट व्यासाचे ११/३ फुट खोल पाण्याचे टाके

१०००/-

ब्रुडर , खाद्य , अंड्याचे ट्रे इत्यादी प्रती बदक १० रु. प्रमाणे

१०००/-

११० बदकांच्या पिलांची किंमत १० रु. प्रती पिला प्रमाणे

११००/-

तराजु व वजने

४००/-

इतर अवांतर खर्च

४००/-

एकंदर रुपये

१८,०००/-

 

ब) आवर्ती खर्च:

आवर्ती खर्च हा एकंदर दिड वर्षाकरीता दिला कारण १ दिवसाचे पिले घेतल्यावर ६ महिने अंड्यावर येईपर्यंतचा काळ व नंतर १ वर्ष अंडी उत्पादनाचा काळ

१.

खाद्य: ० ते २० आठवडे १२ कि. प्रती बदक आणि अंडी उत्पादनाचा १ वर्षाचा काळ
५० किलो प्रती बदक एकंदर खाद्य ६२ कि. म्हणुन १०० बदकांना ६.२ मेट्रीक टन /५००० प्रति टन

३१,०००/-

प्रति बदक लस औषधी ५ रु. प्रमाणे

५००/-

विद्युत देयके प्रति माह १०० रु. प्रमाणे १८ महिणे

१८००/-

बदकांच्या घरावर घसारा १० टक्के

१०००/-

भांडी व इतर साहीत्यावर घसारा १५ टक्के

१५०/-

१०० बदकांचा विमा १५० रु. प्रती शेकडा

१५०/-

बँकेचे व्याज कृषीकरीता १२ टक्के दराने आवर्ति खर्चावर (१८००० रुपयांवर)

२१६०/-

एकंदर खर्च

३६,६६0/-

 

क) उत्पन्न

अंडी विक्री २५,००० अंडी (प्रती पक्षी सरासरी २५० अंडी) रु.१.५० प्रती अंडे प्रमाणे

३७,५००/-

खत विक्री १०००/- रु. प्रति टन खत

३,०००/-

बारदाना ( रिकामे पोती ) प्रती नग १० रु. प्रमाणे १५० पोती

१,५००/-

वर्षाच्या शेवटी १०० बदकाच्या प्रती ८० रु. प्रमाणे बिक्री (प्रत्येक बदकाचे सरासरी वजन अडीच किलो) बदकाचे मृत्युचे प्रमाण धरले नाही कारण विमा काढलेला आहे.

८,०००/-

एकूण उत्पन्न ५०,०००

ड)

एकंदर उत्पन्न रु.

५०,०००/-

- उत्पादन खर्च

३६,०००/-

एकंदर नफा

१३,३४०/-

इ)

बँक परतीचा हप्ता

 

प्रति वर्ष ३६,०००रु. प्रमाणे

३६००/-

प्रति वर्षीकरीता १०० पिल्लाची खरेदी रु.१० प्रमाणे

१०००/-

एकंदर रु.

४६००/-

निव्वळ नफा १३३४०-४६०० = ८७४० /-

८७४०/- रु. नफा दिड वर्षाच्या कालावधीत मिळणार आहे. प्रति वर्ष रु. ५८२६/-

१)  वरील बदक पालन प्रकल्प बांधणी ही नविन व्यवसाय करणा-या पशूपालकांना सुरवातीस फक्त १०० बदका करीता आहे. जर पक्ष्यांची संख्या वाढविली तर नफ्याचे प्रमाण वाढते.

२)  या प्रकल्पात खाद्यावरील संपूर्ण खर्च दाखविण्यात आलेला आहे. जर बदकाकरीता आसपास नदी, सरोवर, तळे, नाल्या किंवा भाताची शेती असेल तर त्या प्रमाणात खाद्यावरील खर्च ५० % कमी केल्या जाऊ शकतो ज्यामुळे नफ्याचे बरेच प्रमाण वाढते.

३)  प्रस्तूत प्रकल्पात पक्षांचा विमा काढलेला असल्यामुळे मृत्युचे प्रमाण धकलेले नाही.


बदकांची उपलब्धता - साधारण सुधारीत जातींची ६० ते ७५ दिवसांची पिल्ले ही सप्टेंबरपासून एप्रिलपर्यत खालील ठिकामी उपलब्ध असतात.

१)   सेन्ट्रल डक ब्रिडींग फार्म, हिसार गट्टा, बंगलोर.

२)   स्टेट पोल्ट्री फार्म, गोबरडंगा, २४ परगाणा जिल्हा ( पश्चिम बंगाल ).

३)   दिपोद्य कृषी व्कास केंद्र, रामशी, जलपायगुरी ( दक्षिण बंगाल ).

४)   रिझनल डक ब्रिडींग फार्म, अगरताला ( त्रिपूरा )

५)   स्टेट पोल्ट्री फार्म, कृषिनगर, नाडीया.

६)   डक ब्रिडींग फार्म, देसाईगंज, वडसा जि. गडचिरोली ( महाराष्ट्र ).

७)   बदक विस्तार केंद्र, कैलारुले, जि. कृष्णा ( आंध्र प्रदेश ).

८)   आराम डक फार्म, सिबसागर.

९)   हरियाना कृषी विद्यापीठ, हिसार.

स्त्रोत : विस्तार व प्रशिक्षण संचलनालय, महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ, नागपूर

 

बदक पालन

अंतिम सुधारित : 4/22/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate