অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

पदार्थांच्या गरजेनुसार करा पॅकेजिंग

निरनिराळ्या प्रकारचे पॅकिंग साहित्य व त्यावरील डिझाईनमुळे प्रक्रियायुक्त पदार्थ ग्राहकांमध्ये लवकर लोकप्रिय होतात. प्रक्रिया युनिटमध्ये तयार झाल्यापासून थेट ग्राहकांपर्यंत पोचेपर्यंत सुरक्षितपणे पदार्थाची साठवण वाहतूक व विक्री सुलभ करण्यासाठी योग्य पॅकेजिंगची आवश्‍यकता असते.
फळे व भाजीपाल्यापासून तयार केलेले प्रक्रियायुक्त पदार्थ टिकवून ठेवण्यासाठी तसेच साठवण व विक्री व्यवस्थेसाठी पॅकेजिंग करावे लागते. ग्राहकांना आकृष्ट करण्यासाठी आकर्षक वेस्टन असणे आवश्‍यक असते.
1) प्रक्रिया पदार्थांच्या भौतिक व रासायनिक गुणधर्मानुसार धातू, काच, प्लॅस्टिक, लवचिक फिल्म यांपासून तयार केलेले साहित्य पॅकेजिंगसाठी वापरले जाते.

धातूपासून तयार केलेले डबे

स्टील आणि ऍल्युमिनिअम पत्र्याचा वापर करून वेगवेगळ्या आकाराचे डबे वापरले जातात. हे साहित्य वाहतुकीस व हाताळणीस अतिशय सुटसुटीत असल्याने अशा साहित्याचा वापर केला जातो. उदा. टीन प्लेट कॅन्स, स्टील कॅन्स, ऍल्युमिनिअम कॅन्स. 
आ) काचेच्या बाटल्या व बरण्या ः विविध आकारात आणि वजनाच्या उपलब्ध आहेत. यांचे वजन जास्त असल्यामुळे वाहतुकीस महाग ठरतात. हाताळणीमध्ये फुटण्याची शक्‍यता असते.

प्लॅस्टिक पॅकिंग साहित्य

प्लॅस्टिकपासून तयार केलेले डबे, खोकी, बाटल्या, बरण्या, पिशव्या हे साहित्य अन्नपदार्थ पॅकिंगसाठी वापरले जाते. पॅकिंगसाठी आता प्लॅस्टिक पॉलिइथाईल, पॉलिअक्रीलो नायट्राईट, पॉलिप्रोपिलीन, पॉलिकार्बोनेट, नायलॉन असे घटक वापरले जातात. उदा. कठीण प्लॅस्टिक कंटेनर, बाटल्या, टेट्रापॅक कॅन्स, उच्च तापमानास टिकणारे डबे, लवचिक प्लॅस्टिक पिशव्या, धातुयुक्त फिल्म.

प्रक्रियायुक्त पदार्थांची विक्री व्यवस्था

प्रक्रियायुक्त पदार्थांची विक्री करताना प्रथम आपल्या मालाची मागणी निर्माण करावी. त्यासाठी जाहिरात, आकर्षण पॅकिंग, कमीत कमी किंमत, उत्तम प्रत हे घटक लक्षात घ्यावेत. 
1) उत्पादनावर आधारित विक्री व्यवस्था ः एखाद्या पदार्थाची बाजारात कमतरता असल्यास अशा संधीचा फायदा घेऊन उपलब्ध तयार माल किंवा कमीत कमी वेळात माल तयार करून बाजारात पुरवठा केला जातो. 
2) विक्रीवर आधारित विक्री व्यवस्था ः या प्रकारात बाजारात मुबलक प्रमाणात मालाची उपलब्धता असते. अशावेळी त्या पदार्थाची उत्तम प्रत, गुणवत्ता आकर्षक पॅकिंग, वाजवी किंमत यासंबंधी जाहिरात करून जास्तीत जास्त विक्री करावी. 
3) ग्राहकांच्या पसंतीवर विक्री व्यवस्था ः यामध्ये ग्राहकांना अपेक्षित असलेली प्रत व चव, स्वाद, रंग, किंमत, दिखाऊपणा इत्यादी घटकावर आधारित मालाची विक्री केली जाते.
ग्राहकाच्या आरोग्य सुरक्षिततेसाठी ः 
उत्पादनाच्या वेस्टनाच्या लेबलवर पदार्थाचे नाव, वजन, तयार झाल्याची तारीख, वापराची अंतिम तारीख, विक्रीची किंमत, प्रक्रियायुक्त पदार्थ तयार करण्यासाठी वापरण्यात आलेला कच्चा माल, त्याचे प्रमाण, स्वरक्षक रसायने आणि त्यांचे प्रमाण, पदार्थाच्या गुणवत्तेबाबत आयएसआय, ऍगमार्क, एफपीओ यांच्या प्रमाणकांचा होल्मार्क असणे आवश्‍यक आहे.
संपर्क ः 02427-255525 
(लेखक कृषी विज्ञान केंद्र दहिगाव ता. शेवगाव जि. नगर येथे कार्यरत आहेत)

स्त्रोत: अग्रोवन

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate