Skip to content. | Skip to navigation

Vikaspedia


T2 2019/10/17 05:28:40.603459 GMT+0530
मुख्य / शेती / कृषी यशोगाथा / पशुपालन / पोल्ट्रीतून आर्थिक प्रगती
शेअर करा

T3 2019/10/17 05:28:40.609059 GMT+0530
Views
 • स्थिती: संपादनासाठी खुला

T4 2019/10/17 05:28:40.634226 GMT+0530

पोल्ट्रीतून आर्थिक प्रगती

कोणत्याही शेतीपूरक व्यवसायाचे तांत्रिक प्रशिक्षण आणि बाजारपेठेची माहिती असेल, तर तो व्यवसाय निश्‍चितपणे आर्थिकदृष्ट्या फायदेशीर ठरतो.

कोणत्याही शेतीपूरक व्यवसायाचे तांत्रिक प्रशिक्षण आणि बाजारपेठेची माहिती असेल, तर तो व्यवसाय निश्‍चितपणे आर्थिकदृष्ट्या फायदेशीर ठरतो. असाच काहीसा अनुभव नागपूर येथील सहेजादखान पठाण यांचा आहे. नागपूर पशुवैद्यकीय महाविद्यालयात कुक्कुटपालनाचे प्रशिक्षण आणि नागपूर परिसरातील बाजारपेठेचा अभ्यास करून त्यांनी आता कुक्कुटपालनात चांगला जम बसविला आहे.

डॉ. मुकुंद कदम
नागपूर येथील जाफरनगर येथील सहेजादखान पठाण यांनी बारावी पास झाल्यानंतर आयटीआय डिप्लोमा कोर्स केला; परंतु बराच काळ प्रयत्न करून म्हणावी तशी नोकरी मिळाली नाही, त्यामुळे नोकरीऐवजी काही स्वयंरोजगार करता येईल का, याची चर्चा मित्रांच्या बरोबरीने सुरू केली. या चर्चेमध्येच त्यांना नागपूर पशुवैद्यकीय महाविद्यालयाच्या कुक्कुटपालनाच्या विभागातर्फे राबविण्यात येणाऱ्या मांसल कोंबडीपालन प्रशिक्षणासंबंधी माहिती मिळाली. येथील तज्ज्ञांशी चर्चा करून सन 2011 मध्ये अल्प मुदतीचे मांसल कोंबडीपालन प्रशिक्षण पूर्ण केले. या प्रशिक्षणाच्या माध्यमातून पक्ष्यांच्या जाती, पक्ष्यांचे आरोग्य व्यवस्थापन, लसीकरण, खाद्य व्यवस्थापनाची तांत्रिक माहिती मिळाली. याच बरोबरीने कुक्कुटपालनासाठी बॅंक तसेच सरकारी योजनांची माहिती मिळाली. या प्रशिक्षणातून सहेजादखान पठाण यांच्या मनात पोल्ट्री व्यवसायाबद्दलची अधिक उत्कंठा निर्माण झाली. पोल्ट्री फार्म सुरू करण्यापूर्वी त्यांनी नागपूर शहरालगतचे सर्व कोंबडी फार्म पिंजून काढले. लोकांशी व्यवसायाच्या आर्थिक गणिताबाबत चर्चा केली. त्यानंतरच स्वतःचा पोल्ट्री फार्म सुरू करण्याचा निर्णय घेतला.

सुरू केला कुक्कुटपालन व्यवसाय

1) स्वतःची जमीन नसल्याने सहेजादखान पठाण यांना पोल्ट्री फार्म सुरू करण्यामध्ये अडचण होती; परंतु नोकरीऐवजी स्वतःचा उद्योग सुरू करण्याचा निर्णय पक्का असल्याने त्यांनी पहिल्यांदा कोंबडी विक्रीचा व्यवसाय करण्याचे ठरवले. त्यासाठी नागपूर शहरात नातेवाइकांच्या जागेवर कोंबडी विक्रीचे लहानसे दुकान सुरू केले. यामुळे कोंबडी खरेदी-विक्रीचा अंदाज आला. यातील आर्थिक व्यवहार कळाला. ग्राहकाला किती वजनाची कोंबडी लागते, नेमक्‍या कोणत्या महिन्यात मागणी असते हे समजले. पोल्ट्रीमध्ये पक्ष्यांचे व्यवस्थापन कसे केले जाते हेसुद्धा लोकांच्या चर्चेतून समजले. 
2) पहिले सहा महिने जवळपासच्या पोल्ट्री फार्ममधून कोंबड्यांची खरेदी करून दुकानात विक्री सुरू केली. 
3) याचदरम्यान मित्रांच्या कडून नागपूरपासून 12 किलोमीटर अंतरावरील गोमतळा गावात एक पोल्ट्री फार्म रिकामा असल्याचे समजले. त्या मालकाशी चर्चा करून दरमहा आठ हजार रूपये भाडे तत्त्वावर पोल्ट्री फार्म चालवण्यास घेतला. कोंबड्यांच्या व्यवस्थापनामध्ये सहेजादखान पठाण यांना दोन्ही भाऊ आणि वडिलांची चांगली मदत मिळते.

असा आहे पोल्ट्री फार्म


 • एका शेडची लांबी साधारणतः 40 फूट व रुंदी 25 फूट. दुसऱ्या शेडची लांबी साधारणतः 70 फूट व रुंदी 30 फूट.
 • शेडची बांधणी पूर्व-पश्‍चिम दिशेने आहे. शेडची आतील उंची 12 फूट, तर बाजूची उंची 10 फूट आहे.
 • जुन्या पद्धतीची शेड असल्यामुळे बाजूची भिंत दीड फूट आहे. त्यावर छतापर्यंत जाळी बसवली आहे.
 • ऊन किंवा पाऊस शेडमध्ये येऊ नये म्हणून दोन्ही बाजूंनी खाद्याची पोती वापरून पडदे लावले जातात.
 • दोन्ही शेडमध्ये एका बॅचमध्ये साधारण 3000 पक्षी सांभाळले जातात.

खाद्य व पाण्याचे नियोजन

पक्ष्याच्या खाद्य व्यवस्थापनाबाबत सहेजादखान म्हणाले, की खाद्य घटकात ज्याने बचत केली तो या व्यवसायात नफा कमवितो. खाद्य हा मांसल कोंबडीपालनातील महत्त्वाचा घटक असल्यामुळे खाद्य गुणवत्तेमध्ये कुठल्या प्रकारची कमतरता पक्ष्यांची वाढ खुंटवण्यास कारणीभूत ठरू शकते. खाद्य आणि आरोग्य व्यवस्थापनासाठी तज्ज्ञांचा सातत्याने सल्ला घेतला जातो, त्यामुळे कोंबड्यांचे आरोग्य चांगले राहते. खर्चात बचत होते. 
1) सध्याच्या परिस्थितीत बाजारात उपलब्ध असलेले चांगल्या प्रतीचे खाद्य पक्ष्यांना दिले जाते. सुरवातीच्या 14 दिवसांपर्यंत प्री स्टार्टर, 28 दिवसांपर्यंत स्टार्टर आणि त्यानंतर पक्षी विक्री होईपर्यंत फिनीशर खाद्य पक्ष्यांना दिले जाते. 
2) दिवसातून साधारण दोन ते तीन वेळा पक्ष्यांना खाद्य दिले जाते. उन्हाळ्यात पक्षी दिवसा कमी खात असल्यामुळे रात्रीच्या वेळी खाद्य दिले जाते. खाद्य भांडे दोन तृतीयांश भरले जाते. जेणे करून पक्षी खाद्य खाताना वाया जात नाही. 
4) पोल्ट्री फार्मजवळ विहीर आहे. या विहिरीचे पाणी टाकीत घेऊन निर्जंतूक करून पक्ष्यांना दिले जाते. पक्ष्यांना लागणारी औषधे पाण्यातूनच दिली जातात. जेणे करून सर्व पक्ष्यांना पिण्याच्या पाण्यातून ते योग्य प्रमाणात उपलब्ध होतात. पाण्यासाठी स्वयंचलीत ड्रींकर बसविले असल्याने पक्ष्यांना गरजेप्रमाणे पाणी उपलब्ध राहते.

प्रतिबंधक उपाययोजनेवर भर


 • पक्ष्यांची प्रत्येक बॅच येण्यापूर्वी आणि नंतर पोल्ट्री फार्म निर्जंतूक केला जातो. बाजूचा परिसर स्वच्छ ठेवला जातो, त्यामुळे कोंबड्यांचे आरोग्य चांगले राहते.
 • पक्ष्यांना प्रथम तीन दिवस पाण्यातून प्रतिजैविके दिली जातात.
 • पाच ते सहा दिवसांनी पक्ष्यांना लासोटा व 13-14 दिवसांनी गंबोरोची लस दिली जाते, तसेच 21 दिवसांनी लासोटा बुस्टर लसीकरण केले जाते.
 • पक्ष्यांवर ताण येऊ नये म्हणून लसीकरणाच्या आधी व नंतर पाण्यातून जीवनसत्त्वे दिली जातात.
 • महिन्यातून एकदा किंवा दोनदा शेडच्या बाहेरून पाच टक्के फॉरमॅलिन द्रावणाची फवारणी केली जाते.
 • लसीकरण व प्रतिजैविकाचा दिवस वगळता पक्ष्यांना क्‍लोरीनेटेड पाणी पिण्यासाठी दिले जाते.

असे आहे पक्ष्यांचे नियोजन


 • एका बॅचमध्ये तीन हजार पक्ष्यांचे व्यवस्थापन केले जाते.
 • एक दिवसाची पिले सर्वप्रथम छोट्या शेडमध्ये सोडली जातात. त्यांचे खाद्य व्यवस्थापन, लसीकरण शिफारशीनुसार केले जाते.
 • चार आठवड्यांनंतर पक्ष्यांचे वजन एक किलो 200 ग्रॅम होते. या पक्ष्यांना बाजारात मागणी असल्याने साधारण 1000 पक्ष्यांची विक्री केली जाते. यातून मिळालेला नफा पुढील काळात पक्ष्यांच्या व्यवस्थापनाला उपयोगी ठरतो.
 • उरलेले 2000 पक्षी मोठ्या शेडमध्ये सोडले जातात. हे सहा आठवड्यांपर्यंत सांभाळले जातात. त्यांचे वजन सरासरी दोन किलोपर्यंत होते.
 • या दरम्यान पहिल्या शेडमध्ये साफसफाई करून पुढील पक्ष्यांची बॅच मागवली जाते. वर्षातून एकापाठोपाठ आठ बॅचेस घेतल्या जातात.
 • साधारणपणे डिसेंबरपासून जूनपर्यंत पक्ष्यांचे दर चांगले राहतात. बाजारपेठेची मागणी लक्षात घेऊन पक्ष्यांच्या बॅचेसचे नियोजन केले जाते.
 • सर्वसाधारण छोट्या पक्ष्यांना जास्त भाव मिळतो. सेहजादखान शक्‍यतो जास्तीत जास्त पक्षी स्वतःच्या दुकानात विकतात. उरलेले पक्षी परिसरातील व्यापाऱ्यांना बाजारपेठेतील दरानुसार विकले जातात.
 • बुधवार, शुक्रवार आणि रविवार या दिवशी कोंबड्यांना चांगली मागणी राहते.
 • किरकोळ विक्री करून एका बॅचमागे ( 42 दिवसांची एक बॅच) सर्व व्यवस्थापन आणि मजुरी खर्च वजा जाता साधारण 25 हजार रुपये नफा सहेजादखान यांना मिळतो.

प्रशिक्षण ठरले फायद्याचे

 • चांगल्या जातीच्या पिलाची ओळख.
 • पक्ष्यांचे आरोग्य, खाद्य व्यवस्थापनाबाबत मार्गदर्शन.
 • लसीकरण व औषधोपचाराचे तंत्र कळाले.
 • विक्री तंत्राचे मार्गदर्शन.


सहेजादखान पठाण - 9326487071 
डॉ. मुकुंद कदम - 8149051060
(लेखक नागपूर पशुवैद्यक महाविद्यालयामध्ये कुक्कुटपालनशास्त्र विभागात सहायक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत)

माहिती संदर्भ :अॅग्रोवन

 

 

2.97959183673
तारकाचिह्नांवर जा आणि मूल्यांकन देण्यासाठी क्लिक करा
युवराज तिवरे May 16, 2019 08:27 AM

कुकुट पालन संदर्भात प्रशिक्षण कुठे मिळेल

Siddharth chavhan Mar 27, 2018 10:37 PM

कोबंळी च्या पिलान वर होणारी बिमारी बंदल माहिती व औषध सांगा

कुशल पवार Feb 13, 2018 02:04 PM

मला प्रोजेक्ट साठी महिती हवी आहे प्लस पूर्ण महिती द्या ९७६३३७००१२ माझा इमेल कुशलपवार१@गमाची.com

Gajanan guhade Feb 02, 2018 01:03 PM

सर मला अंडे देणाऱ्या कोंबडी विषयावर माहीती पाहीजेत
1)1000 कोंबड्यासाठी शेड किती × किती चा पाहीजेत
खर्च,ओषध कोणती,कोंबड्याची जात,इत्यादी

दिपक सहाणे Jun 28, 2017 08:02 PM

मला हे जाणून घ्यायचे आहे कि, एका कोंबडीला एका दिवसात किती किलो खाद्य लागते.
महिन्याचा एका कोंबडीचा खर्च किती असतो...
माझा नंबर आहे 97*****91

आपल्या सूचना पोस्ट करा

(वरील विषयासाठी जर तुमच्या काही प्रतिक्रिया किंवा सूचना असतील तर या ठिकाणी नोंदवा)

Enter the word
नेवीगेशन

T5 2019/10/17 05:28:40.879057 GMT+0530

T24 2019/10/17 05:28:40.885045 GMT+0530
Back to top

T12019/10/17 05:28:40.514066 GMT+0530

T612019/10/17 05:28:40.531765 GMT+0530

T622019/10/17 05:28:40.592725 GMT+0530

T632019/10/17 05:28:40.593677 GMT+0530