Skip to content. | Skip to navigation

Vikaspedia


T2 2019/10/17 06:12:31.710860 GMT+0530
मुख्य / शेती / कृषी यशोगाथा / पशुपालन / लाटेत टिकाव- मेंढेपाळाची द्विधावस्ता
शेअर करा

T3 2019/10/17 06:12:31.716886 GMT+0530
Views
  • स्थिती: संपादनासाठी खुला

T4 2019/10/17 06:12:31.744457 GMT+0530

लाटेत टिकाव- मेंढेपाळाची द्विधावस्ता

खंडू कोळपे मेंढ्या पाळणे हे वडिलांकडून शिकला. छोटे कोकरू जन्मल्यानंतर त्याची आई जी काळजी घ्यायची ते तो बघून शिकला आपले काका-काकू , आजी-आजोबा यांचे निरीक्षण करून व त्यांना मदत करता करता खंडू शिकला .

लाटेत टिकाव- मेंढेपाळाची द्विधावस्ता

खंडू कोळपे मेंढ्या पाळणे हे वडिलांकडून शिकला. छोटे कोकरू जन्मल्यानंतर त्याची आई जी काळजी घ्यायची ते तो बघून शिकला आपले काका-काकू , आजी-आजोबा यांचे निरीक्षण करून व त्यांना मदत करता करता खंडू शिकला . उन्हाळ्यामध्ये शेतकऱ्यांच्या शेतामध्ये मेंढ्य़ा चारत असतांना शेतक-यांकडुन वेगवेगळय़ा वनस्पती विषयी खंडु शिकाला. हे सर्व टीव्ही , फोन, प्रचार प्रसार, सामाजिक कार्यकर्त्यांची  फळी या पुर्वीची परिस्थीती होती. खंडु कोळपेला लिहता, वाचता येत नाही. त्याला जे सर्व माहिती आहे तो आपल्या स्मरणात ठेवतो . खंडू हा धनगर असून भारतातील महाराष्ट्र राज्यामधील पलायन ग्रस्त मेंढपाळ या समुदायामधील एक . आजपर्यंत भारतामध्ये बहुतेक मेंढीपालन हे वडीलोपर्जीत  , स्थलांतरीत ,पारंपारिक पद्धतीने जीवनाधार म्हणून होत आहे. कित्येक शेकडो वर्षांपासुन त्यांचा समुदाय मेंढीपालन करीत होता. समुदाय़ा मधील सामुहीक ज्ञान हे, त्यांच्या दैनंदीन पध्दती जसे-गाणी, नृत्य,कथा यां माध्यमातुन जिवंत राहत. खास रात्री गावांमधील क्डीलधारी मंडळी कडुंन खुल्या वर्गामध्ये हजारो चांदण्य़ा व हस-या चंद्राच्या साक्षीने ते शिकायचे. या सर्व ज्ञानाचे अनुभवाचे दस्ताऐवजीकरण करण्याकरीता तेथे कुठल्याही प्रकारची पुस्तके, रेकॉर्ड किंवा कागद नव्हती. परंतु ज्ञान हे एका पिढी कडुन दुस-या पिढीकडे सातत्याने जात होते. ते केवळ कित्येक वर्षांच्या दैनंदीन सवयी, कृती व निरीक्षणाने. हे त्यांच्या संस्कृतीमध्येच रुजुन गेले होते. त्यांच्या होऊन बसले होते.

खंडुनी आपल्या मुलांना शाळेमध्ये टाकले. खंडुचा मोठा मुलगा हा चांगला हुशार वीद्यार्थी होता. शासकिय नोकरी मिळण्याकरीता त्यास महा विद्यालयीन तसेच पदवी पर्यंत शिक्षण घेण्यास प्रोत्साहीत केले. मेंढीपालनाकरीता त्याची आता कसल्य़ाही प्रकारची मदत होत नव्हती. दुसरा मुलगा हा शाळेमध्ये फार हुशार नव्हता त्यामुळे त्यास मेंढीपालन करीता प्रोत्साहीत करण्यात आले. तो आता जवळच्या पशुधन विस्तार केंद्रामध्ये जाउन वेगवेगळय़ा प्रशिक्षणामध्ये सहभागी होउन नवीन –नवीन  कल्पना घेऊन यायचा, बोलायचा. त्यातील काही कल्पना हया खंडुच्या व समुदायाच्या मेंढीपालनामधील 50 वर्षांचे ज्ञान यापेक्षा पुर्णतः भिन्न होत्या. ते आधुनीक वर्ग खोली मध्ये लख्ख प्रकाशामध्ये दिलेले ज्ञान हयामध्ये रंगीत चार्टस चा वापर प्रामुख्याने व्हायचा. आकर्षक व वेगवेगळय़ा कलरची पत्रके, घट्टी पत्रीका घेवुन तो घरी परतायचा.

दुपारनंतरच्या कडक उन्हामध्ये चिंचेच्या झाडाखाली विश्रांती घेत मेंढ्या अचानक मृत्युमुखी पडल्या. खंडु व त्याच्या सहकार्यांनी शवविच्छेदन  केल्यानंतर त्यांना पानाच्या आकाराचे मेंढय़ाच्या यकृतावरती ठिपके आढळले. काही जेष्ठ मेंढपाळांसोबत चर्चा केल्यानंतर त्यांना कळलं की हल्ली चराई क्षेत्रामध्ये यकृताच्या आजारा पासुन संरक्षण मिळण्याकरीता काही विशिष्ठ पध्दतीच्या वनस्पती आढळत नाहीत. मेंढ्य़ाचा मृत्यु व धोके कमी करण्याकरीता अशा पध्दतीची वनस्पती असलेली चराई क्षेत्र शोधान्याकरीता प्रयत्न करण्यात आले. परंतु तशी चराई क्षेत्र शोधणे एवढे सोपे नव्हते. गेल्या काही कालावधी मध्ये पर्यावरणामध्ये पुष्कळ बदल घडुन आलेत ज्यामुळे या संपुर्ण पर्यावरण साखळीमध्ये काही बहुपयोगी, मुल्यवान वनस्पती झपाटयाने नष्ट झाल्य़ात. घराईच्या क्षेत्र बदलण्या करीता खंडुच्या दुस-या मुलाची सहमती नव्हती. प्रशिक्षणामधुन मिळालेली औषध घेवुन तो समोर आला. त्याच्यासोबतच इतरही कुटुंबामधील मुल प्रशिक्षणामध्ये सहभागी झाली , होती त्यानीही हा औषधीचा प्रयोग तात्काळ केला . काही दिवसानंतर काही मेंढ्यांमध्ये   गर्भपात झाला. त्यामुळे औषधी व मेंढ्याचा गर्भपात यामध्ये काही संबंध असल्याचे त्यांना समजले. त्यांच्या पैकी कोणीही हे सांगु शकलं नाही की गाभण जणाक्रांकरीता वरील औषध सुरक्षीत आहे की,नाही? खंडूने ह्या औषधांचा वापर ताबडतोब बंद केला आधुनिक उपाय योजनांमधील ही एक मोठी समस्या आहे. एकतर त्यांची योग्य व पुरेशी चाचणी घेतलेली नसते आणि मेंढपाळानी ते नुकसान सहन करावे ही अपेक्षा असते. म्हणुनच हल्ली मेंढपाळ आपली जनावरे लवकर मार्केट मध्ये विकायला आणतात. जास्त कालावधीपर्यंत जनावरांचे संगोपन ते करु इच्छीत नाहीत. 2-3  महिन्य़ा मध्येच जनावरे मार्केटमध्ये नेऊन विक्री केल्या जाते.  दुसरीकडे विस्तार विभागा मधील शास्त्रज्ञ मेंढ्या किमान 9 महीने ठेवण्याचा सल्ला देतात. परंतु मेंढपाळाचं कोण ऐकतो ?” खंडु मनाशीच बोलला, जो शेतकरी कापसाच्या नवीन जाती आपल्या शेतात पेरतो. त्याला कांही फरक पडत नसेल, पण अश्या शेतामध्ये मेंढ्या चरल्यानंतर त्यांना नवीन समस्यांना तोंड दयावे लागते. हया समस्या पारंपारीक औषधोपचाराने ब-या होत नाहीत. डॉक्टरांची टिम सुध्दा या समस्यांचे योग्य निदान लावण्यामध्ये असमर्थ ठरते. एकाएकी पुष्कळ मेंढ्या मरण पावणे या चमत्कारीक समस्येवर उपचार सोडुन डॉक्टर मेंढपाळाना त्यांची मुळ पैदास बदलावे, किटकनाशकांची फवारणी करणे, कृमी मारण्याचे औषध वापरण्यासंदर्भात सल्ला देतात. पण हे उपचार प्रत्येक क्षेत्रीय पातळीवर खरच तपासलेले आहेत का ? नविन जातीच्या मेंढ्या पाळणे योग्य ठरेल? चाप्याचा तुटवडा व नविन रोगाना त्या तोंड देवू शकतील ? कदाचित त्या जातीच्या मेढ्याचे वजन लवकर वाढत असेलही. परंतू..? एखादं मेंढरू जर रोगानी मरण पावलं तर नुकसान कुणाचे ? खंडु विचार करीत होता. किटकनाशकांचा जहरीला विषारी वास येतो. परंतु वृध्द मेंढपाळ जो डोक्यावर फेटा घालतो, ज्याला लिहता, वाचता येत नाही मोबाईल वापरता येत नाही त्याचं कोण ऐकणार..?

आज त्याच्या मुलाला काम करण्याकरिता छोट्यायंत्र , ट्रँकटर  हवा आहे . मळणी यंत्र पाहीजे, पाँवर ट्रोलर, मोटार सायकल, हवी आहे. आणि हो मोबाइल पण हवा आहे. त्याला संगणक तसेच इंटरनेट च्या वापराविषयी पण माहीती आहे. त्याला जवळच्या विस्तार हवामान तसेच बाजारभाव संदर्भात संदेश मिळतात परंतु संदेश/ माहीती लवकर विसरून जाते व गरजेच्या वेळी आठवत नाही. जुन्या काळी महत्वाच्या सवयी / माहीती ही लोकांच्या जगण्याची पध्दती, संस्कृती व त्यांचे दैनंदीन अस्तीत्व यामध्येच सामावलेली होती. व त्यामाध्यमातुन ती जिवंत राहायची. ते आपसामध्ये संवाद साधायचे की मेंढ्यांची योग्य व विशिष्ट्र पध्दतीने काळजी घेतली नाही तर देव कोपेल. ते आपसामध्ये समाज व पर्यावरणा विषयी आदर बाळगण्यास शिकवण देत असे. विशेष गवत उगवल्यानंतरच ते मेंढ्यांच स्थलांतर करीत परंतु आता सद्य परिस्थीती मध्ये खंडुची मुलं व त्याचे मित्र हे त्यांच्या समुदायामधील जेष्ठ मंडळींच्या या विचारांवर हसतात. तरूणांच्या मते जेष्टांचे विचार म्हणजे अशास्त्रीय, आधुनिकता नसलेले व दुर्लक्षित आहेत.

परंतु शास्त्रीय दृष्टीकोण म्हणजे काय ? आधुनीक म्हणजे काय ? ज्ञान म्हणजे काय ? विशेष गवत जे यकृताच्या आजारापासुन मेंढ्यांच संरक्षण करते. अशा पध्दतीची खुप मौल्यवान गवतं तसेच वनस्पती खूप दूर्मिळ झाली. बॉटलमधील औषध सहज उपलब्ध होते. परंतु पर्यावरणामधील औषध हल्ली खुप दुर्मीळ होत चालली आहेत. प्रत्येकठिकाणी तुम्हास लोक वातावरणामधील बदलांच्या संदर्भात बोलतांना आढळतात आणि ते खुप कठीण होत आहे. नेहमीच्या पध्दतीमध्ये मेंढीपालन काही विशीष्ठ चिन्ह , खुणा यांवर अवलंबून असत परंतु ते काही आता वैध राहिलेलं नाही . होय कदाचित काही पारंपारिक पद्धती भाविश्यांमध्ये काम करणार नाहीत परंतु सद्यस्थितीमधील आधुनिक पद्धती पण काम करणार नाही. खंडूला या बाबत खात्रीच वाटते.

खरी समस्या आहे कुठे?

ज्यापद्धतीने खंडू सारखा मेंढपाळ कोंडीत सापडला , त्यापद्धतीने अनेक छोटे मेंढपाळ तसेच छोटे शेतकरी , गरीब वर्ग संपूर्ण जगातील कोंडीत सापडलेले आहेत. खास करून नवीन उभरत्या अर्थव्यवस्थेमध्ये मोबाईल व इंटरनेटच्या जगामध्ये फक्त पारंपारीक ज्ञान हे रोजच्या बदलांना व आव्हानांना तोंड देण्यास पुरेसे नाही. सातत्याने वेगवेगळया पातळीवर खुप बदल होत आहेत. छोटे शेतकरी व पशुधारक मोठ्या प्रमाणांमध्ये प्रभावीत झालेले आहे. गोंधळलेल्या स्थीतीमध्ये झुंज देण्यास समर्थ नसल्यामुळे मेंढपाळ नाहीशे होण्याच्या मार्गावर आहेत. म्हणुन समस्या नेमकेपणाने कशात आहे ?

माहीतीचा आशय

शेती व पशुधन संगोपन म्हणजे एकप्रकारे मानवजातीमधील हजारो वर्षांपासुन साठवलेले ज्ञान होय. नवीन माहीती व ज्ञान हे त्यामध्ये सातत्याने जात वाढत राहील. भुतकाळामध्ये माहीतीची आदान प्रदान खुप संथ गतीने व्हायचे. त्यामुळे बराचसा विकसनशील समुदाय विकसीत समुदायांमधील आधुनीकतेपासुन दुर राहयचा. परंतु आज ही परीस्थीती बदललेली आहे. बटणाच्या एका क्लिष्कवर खुप काही माहीती सवयीमध्ये उतरविणे हे शक्य होत नाही. खास करून छोटे शेतक-यांना हे खुप अवघड वाटते.

माहीतीचा आराखडा

शेतकरी किंवा शेतीशी संबंधीत समुदाय एका विचीत्र परिस्थीतीमध्ये सापडलेला असुन तो त्यामधुन मार्गकृमन करीत असतांना स्वतःला समाज व बाजारामधील सातत्याने वाढत जाणा-या गरजा यांमध्ये नेहमी अद्यावत ठेवु इच्छीतो. बहुदा जास्तीत जास्त शेतकरी व सामाजीक कार्यकर्ते हे निखळ किंवा जास्तीत जास्त माहीतीने भाराउन गेलेले दिसतात, उपयोगी आवश्यक माहिती व अनावश्यक माहिती ही वेगळी करण्याची फार मोठी समस्या कदाचित त्यांना भेडसावत आहे.

माहीती आदानप्रदानाचे स्त्रोत

अलीकडच्या काळामध्ये माहितीचे स्त्रोत सुध्दा खुप वाढले - जसे पडणा-या ज्ञानामध्ये रूपांतरीत होईलच असे नाही. तसेच ते खात्री देउ शकत नाहीत की कुठली माहीती विश्वासार्ह आहे आणि कुठली नाही, कुणावरती विश्वास ठेवायचा? कोण चुकीच्या दिशेने घेवुन जात आहे.

माहितीचा प्रवाह

माहितीचा प्रवाह हा बहुतेक एकतर्फीं असतो. हा प्रवाह प्रयोगशाळा, संशोधन केंद्र किंवा धोरण ठरविणारे यांच्याकडुन खाली शेतक-यांपर्यंत विस्तार कार्यकर्त्यांच्या मार्फत होत असतो. त्याची माहीती एका व्यक्तीकडुन दुस-या व्यक्तीकडे जाते, यांमध्ये खुप माहिती सुटुन जाते. तेथे योग्य किंवा समर्पक आढावा घेणारी यंत्रणा कार्यरत नाही जेणेकरून शेतक-यांच्या समस्या अगदी स्पष्टपणे प्रकाश किरणासारख्या खाली परत जातील व पुढे धोरण कर्त्यांकडे जातील .

हे एक आश्चर्य आहे कि बहुतेक नवीन कार्यक्रम व योजना खूप कमी प्रमाणामध्ये यशस्वी होतात. दुर्दैवाने ह्या सर्व नवीन योजना अंमलबजावणीमध्ये प्रचंड खर्च झालेला असतो.

बदलाची गरज

ज्या मार्गाने किंवा गतीने सर्व पुढे जात आहे. त्यामध्ये सद्यास्थिती मधील विस्तार व शिक्षणाची पद्धती , धेय्य , उद्देश , पोहचणारी यंत्रणा हे संपूर्णपणे बदलणे गरजेचे वाटते

सभोवताली होणाऱ्या बदलामुळे शेतकरी आणि धनगर समाजावर मोठे दुष्परिणाम

आशय पुनरावलोकन

याकरीता शेती पध्दती कडे बघण्याचा नवीन दृष्टीकोण गरजेचा आहे. त्याकरीता पारंपारीक पध्दतींचे पुनरावलोकन करून त्यामधील धोके उत्तर आहे का ? काय नवीन बदल करणे गरजेचे आहे व काय पुर्वीचेच ठेवायचे आहे? नवीन माहीती आधीच्याच ज्ञानामध्ये जमा करायची का, आधुनिक सवयी किंवा पध्दती हया काळाच्या ओघामध्ये कितपत टिकणार हे एखादयाने तपासणे गरजेचे आहे. कुठल्या पध्दती किंवा सवयी हया लहरी हवामान व बाजारामधील चढ-उतारापासुन संरक्षित ठेवतील? काय प्रमाणामध्ये पुर्वीचे ज्ञान कमी करायचे आणि काळजीपुर्वक, एकत्रीतपणे सर्वसमावेशक ज्ञान तयार कसे करणे गरजेचे आहे, की जे ज्याला हवे असेल त्यास उपलब्ध होईल, खास करून विस्तार शिक्षक व शेतक-यांना.

ज्ञानाची साठवन आणि पुर्नःप्राप्ती

जनुकिय साहित्या करीता अगदी दाट काळोखी असलेल्या तंत्रज्ञानापासुन ते शित साठवणुक गृह पर्यंत वेगवळ्या साठवणुकी च्या पध्दती आहेत. त्या प्रमाणे आज माहीतीची साठवण पुर्वीपेक्षा खुप वेगवेगळया पध्दतीने होत आहे. तरीसुध्दा माहीती पर्यंत पोहोच व पुर्न:प्राप्ती ही अत्यल्प असलेल्या समुदायाकरीता समस्या ठरू शकते. माहितीचे सार्वजनिक स्त्रोत निर्माण करणे व त्याचे सार्वजनीक अधिपत्याखाली व्यवस्थापण करणे गरजेचे आहे. ज्या माध्यमातुन विश्वासार्ह आणि निःपक्षपाती माहीती मिळेल. त्यामुळे वेगवेगळया कार्यक्रमाचा यशस्वीता, अयशस्वी त्यामधील वेगवेगळया पध्दती हया सर्वोस्तर पणे बघता येतील. विस्तार कार्यकर्त्यांनी, शेतकरी समुदायांसोबत माहितीची देवाण घेवाण करीत असतांना या गोष्टीकडे दिशा निर्देश करणे गरजेचे आहे.

प्रशिक्षणात्मक बाबींचे पुणर्वालोकन

प्रत्येकाची शिकण्याची एक वेगळी हातोष्ठी असते. लोकांची शिकण्याची पद्धती ठरविण्यामध्ये संस्कृती महत्वाची भूमिका निभावते. यासंदर्भात खूप काम झालेले आहे. परंतु माहिती देवान-घेवाण पद्धती यांवर काम होणे गरजेचे आहे. वेगवेगळ्या गटांकरिता विस्तार कार्यक्रमाचे  नियोजन, आराखडा तयार करीत असतांना शेतकरी समुदाय हा त्यांच्या वेगवेगळया सवयी, कृतीमधुन शिकतो हे डोक्यामध्ये ठेवणे खुपच गरजेचे आहे. प्रशिक्षणा करीता पुरेसा वेळ निश्चित करून, या वेगवेगळय पध्दती काळजीपुर्वक शेतकरी समुदायांकडे हस्तांतरीत होतात याची खात्री करणे आवश्यक आहे. त्याचे संभाव्य धोके ज्यामध्ये पर्यावरणीय परीणामांचा सुध्दा आंतर्भाव असेल. हे तपशीला मध्ये शेतक-यांन समजेल याची खात्री करावी लागेल या ज्ञानाचा व प्रशिक्षणाचा प्रत्यक्षात वापर करित असताना. शेतक-यांच्या सातत्याने भेटी घेवुन, शेती मधील ख-या समस्या ओळखणे व व्यवस्थित नोंदी, दस्तावऐवजीकरण करणे गरजेचे आहे. आलेले अनुभव, पध्दती विकसीत करणाच्या प्रयोग् शाळेकडे पाठवीने व शेतक-यांना सुध्दा माहीतीच्या वेगवेगळय स्त्रोताविषयी माहीती पुरविणे व त्या माहीती पर्यंत कसे पोहचायचे हे कळवीणे गरजेचे आहे. इंटरनेट या सर्व बाबतीत महत्वाची भुमिका निभावु शकते. परंतु पुर्वी उल्लेख केल्याप्रमाणे, खुप जास्त माहीती हे सुध्दा घातक ठरू शकते.

माहीतीच्या प्रवाहाचे पुनर्निदेशन

माहीतीचा प्रवाह हा फक्त एकतर्फीं नको. विस्तार कार्यकर्त्यांना बदलाचे प्रवर्तक म्हणुन पाहिले जाते. नवीन कल्पना प्रयोगशाळेपासुन शेतापर्यंत पोहोचवण्याचे काम ते करतातच एक खुप गुंतागुंतीची / अवघड भुमीक समाजामध्ये करण्याचे ते टाळतात ती म्हणजे प्रत्यक्षात शेतक-यांन भेडसावणाच्या समस्या व त्यांचे प्रश्न नीट समजावून घेऊन ते तंत्रज्ञ व प्रयोग शाळेपर्यंत पोहोचवणे त्यामुळेच या सर्व प्रक्रियेमध्ये विस्तार कार्यकर्ते हे समाज, शास्त्रज्ञ व धोरणकर्ते यांच्यामधील पण एक महत्वाचा दुवा ठरू शकतात. त्यांचे महत्वाचे काम म्हणजे फिल्डमधील त्यांचे विश्लेषण व कृती ठरविने सोपे होईल या नोंदीमध्ये खालील वेगवेगळया बाबींचा समावेश होऊ शकतो जसे मृत्युदर, रोग किंवा पिकांची यशस्वीता व नापीकी, नवीन तंत्रज्ञानाचे अनुभव व व्यवस्थापन पध्दती इत्यादी. अशा पध्दतीना प्रोत्साहीत केल्यामुळे समाजाविषयी त्यांचा दृष्टीकोण केवळ बदलणार नाही तर ते भविष्यामधील वाढत्या अनिश्चितता मध्ये खुप महत्वाची व प्रदिर्घ कालावधीपर्यंत भुमिका करू शकतील. खूप कांही करण्यासारखे आहे. या नवीन बदलाच्या वा-याच्या लाटेत समाज ओढला जातो. नुकसान होते, काही अशा पल्लवीत होतात. अशा मध्ये खंडूसारखे शेतकरी पूर्ण कोलमडून जातील. एकच आशा बाळगली जाऊ शकते की येऊ घातलेल्या विकासाच्या प्रयत्नामध्ये यश आणि नव्या आशा निर्माण व्हाव्यात व हानी कमी व्हावी. आणि त्यांचा ऐतिहासिक, पारंपारिक ज्ञान साठा त्यांना बदलांच्या लाटेत खंबीर व ठाम पणे राहण्यास मदत करेल.

 

स्त्रोत - लिजा इंडिया

3.08333333333
आपल्या सूचना पोस्ट करा

(वरील विषयासाठी जर तुमच्या काही प्रतिक्रिया किंवा सूचना असतील तर या ठिकाणी नोंदवा)

Enter the word
नेवीगेशन

T5 2019/10/17 06:12:31.963321 GMT+0530

T24 2019/10/17 06:12:31.970057 GMT+0530
Back to top

T12019/10/17 06:12:31.641400 GMT+0530

T612019/10/17 06:12:31.659405 GMT+0530

T622019/10/17 06:12:31.699413 GMT+0530

T632019/10/17 06:12:31.700424 GMT+0530