Skip to content. | Skip to navigation

Vikaspedia


T2 2019/10/17 05:31:32.336098 GMT+0530
मुख्य / शेती / कृषी यशोगाथा / पशुपालन / लावंघरची वाटचाल "गीर" गावकडे..!
शेअर करा

T3 2019/10/17 05:31:32.341872 GMT+0530
Views
  • स्थिती: संपादनासाठी खुला

T4 2019/10/17 05:31:32.407528 GMT+0530

लावंघरची वाटचाल "गीर" गावकडे..!

गीरजातीच्या देशी गाई पालनातून सातारा तालुक्यातील लावंघर गावातील गो पालक उत्तम उत्पन्न प्राप्त करत आहेत.

गीरजातीच्या देशी गाई पालनातून सातारा तालुक्यातील लावंघर गावातील गो पालक उत्तम उत्पन्न प्राप्त करत आहेत. वाढत्या उत्पन्नामुळे प्रेरीत होऊन अन्य ग्रामस्थही गीर गो पालनाकडे वळत आहेत. त्यामुळे लावंघर हे गाव गीर गाईंचे गाव अर्थात "गीर" गाव बनू पहात आहे.

साताऱ्यापासून अवघ्या 15 किलो मिटर अंतरावर डोंगराच्या कुसीमध्ये लावंघर हे गाव वसले आहे. इथला शेतकरी सातत्याने आपल्या शेतामध्ये नवनवीन प्रयोग करत असतो. याच प्रयोगशिलतेतून आत्म्याच्या माध्यमातून देशी गाय पालनाचे प्रशिक्षण मिळाल्यानंतर येथील शेतकऱ्यांचा गट गो पालनाकडे वळला. सुरुवातीला गीर जातीच्या 11 गाई विविध शेतकऱ्यांनी पालनासाठी विकत आणल्या. या गाईच्या दूधाला 60 रुपये लिटर इतका भाव गो पालकांना मिळाला. सध्या गीर गाईच्या दुधाला मागणी वाढल्याने आणि हा प्रकल्प यशस्वी ठरल्याने गावातील अन्य ग्रामस्थ या गो पालनाकडे वळले. गुजरातमधून आणखी 15 गाई गो पालकांनी गावामध्ये आणल्या आहेत. याबाबत गो पालकांनी पुढीलप्रमाणे प्रतिक्रिया दिल्या आहेत.

गीर गाईंच्या पालनात दररोज 200 ते 250 रुपये फायदा मिळू लागला आहे. यापूर्वी रोजगारासाठी दुसऱ्या गावात जायची वेळ येत होती. परंतु गीर गाई पालनातून उत्तम रोजगार आणि उत्तम उत्पन्न मिळू लागले आहे. भविष्यामध्ये या प्रकल्पाच्या माध्यमातून दुधापासून होणारी उत्पादने, गोमुत्र त्यापासून निर्माण होणारी उत्पादने आणि गोवऱ्या आदी उत्पादन घेऊन त्याची विक्री करण्यात येणार आहे.
- उद्धव नाना पवार

संत ज्ञानेश्वर बचत गट असून आत्माच्या माध्यमातून प्रशिक्षण घेतल्यानंतर गीर गाई पालनाचा प्रकल्प सुरु केला. यापासून चांगले पैसे आम्हाला मिळत आहेत. भविष्यातही विविध उत्पादने घेऊन त्यापासून रोजगार निर्मिती करणार आहोत.
- सुजाता चंद्रकांत पवार

देशी गाईचे दूध औषधी मानले जाते. देशी गाईचे शेण तिचे गोमुत्र याचा वापर खत तसेच किटकनाशक म्हणून केला जातो. आत्माच्या माध्यमातून देशी गाईंचे संगोपन शास्त्रशुद्ध पद्धतीने आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन करण्याचा शेतकऱ्यांचा मानस आहे.
- गणेश घोरपडे, प्रकल्प संचालक आत्मा

गावामध्ये उत्पादन होणारे गीर गाईंचे दूध गावातीलच तरुण रोजगारावर मागणीकर्त्यांना पुरवितात. यामुळे बेरोजगार तरुणांना रोजगार निर्मिती झाली आहे. सध्या केवळ दुधाची विक्री करण्यात येत असून या दुधाला मागणी वाढत आहे. भविष्यामध्ये या दुधापासून तूप, दही, ताक अशी उत्पादने घेण्याचा गावकऱ्यांचा मानस आहे. त्यासाठी अन्य ग्रामस्थ गो पालनाकडे आकर्षित होत आहेत. गीर गाईंच्या पालनातून चांगले उत्पन्न मिळू लागल्याने लावंघरची वाटचाल "गीर"गावकडे होऊ लागली आहे.
- प्रशांत सातपुते,
जिल्हा माहिती अधिकारी, सातारा

 

स्त्रोत - महान्युज

3.0625
सुरज आत्माराम देशमुख May 16, 2016 10:03 AM

गौमाता~राष्ट्रमाता

आपल्या सूचना पोस्ट करा

(वरील विषयासाठी जर तुमच्या काही प्रतिक्रिया किंवा सूचना असतील तर या ठिकाणी नोंदवा)

Enter the word
नेवीगेशन

T5 2019/10/17 05:31:32.737240 GMT+0530

T24 2019/10/17 05:31:32.743880 GMT+0530
Back to top

T12019/10/17 05:31:32.247336 GMT+0530

T612019/10/17 05:31:32.264928 GMT+0530

T622019/10/17 05:31:32.325202 GMT+0530

T632019/10/17 05:31:32.326192 GMT+0530