Skip to content. | Skip to navigation

Vikaspedia


T2 2019/06/26 17:14:2.645744 GMT+0530
मुख्य / शेती / कृषी यशोगाथा / पशुपालन / कुक्कुट पालन व्यवसाय
शेअर करा

T3 2019/06/26 17:14:2.651013 GMT+0530
Views
  • स्थिती: संपादनासाठी खुला

T4 2019/06/26 17:14:2.677345 GMT+0530

कुक्कुट पालन व्यवसाय

या विभागात शिवाजी सुखदेव शिंदे, रा. एकांबा, जिल्हा वर्धा यांच्या कुक्कुट पालन या व्यवसायाची यशोगाथा दिली आहे.

माझे नाव शिवाजी सुखदेव शिंदे, रा. एकांबा, वय ५० वर्षे,व्यवसाय सुरूवातीला रोजमजुरी करत होतो. अशा परिस्थितीत गावातील व्यक्ती यांच्याकडुन १० टक्के व्याज दराने ३००० रू. कर्ज रक्कम घेवुन ११ कोंबडया व १ कोबंडा असे १२ नग ३००० रूपयात खरेदी करून व्यवसायाला सुरूवात केली.

सहभागातून कुकुट पालन

१५.२.२०१३ ला नाबार्ड संचालित सर्वांगीण पाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रमा अंतर्गत पशुपालन कार्यक्रमातून ६०० रूपयाचा सहभाग भरून सावित्री ज्योतीराव फुले पाणलोट समिती एकांबा कडून ३००० रू मिळाले. या रकमेतुन ११ कोबडया व १ कोंबडा एकुण १२ नग खरेदी केली. या कोबडयांना खाण्याकरीता २५ किलो गहू, व २५ किलो तांदुळ एक महिन्याचे खाद्य म्हणून घेतो. तसेच महिन्यामध्ये २५० रूपये औषधी यावर खर्च होतो. अशाप्रकारे महिण्याला ९८० रूपये खर्च करतो. त्याच बरोबर उन्हाळयाच्या दिवसामध्ये गरम हवे पासून संरक्षण होण्याकरिता शेतालगतच पाणी वाहून नेणारी नाली आहे. या नालीवर तराटे, पराटी टाकुन नाली झाकून ठेवल्या जाते. यामुळे उन्हाळयाच्या दिवसात थंड वातावरण निर्मिती होते. उन्हाळयामध्ये गरम हवेपासून रक्षण होण्याकरिता या नाल्याच्या ओलाव्यामुळे कोंबडया नालीच्या बसतात.

कुकुट पालनापासून उत्‍पन्‍न

आज या कोंबडयापासून प्रति दिवस १० अंडी मिळतात. प्रति अंडी १० रूपये १०० रू रूपये दररोज मिळतात. ७ ते ८ महिण्यामध्ये पशुखाद्य व औषधी खर्च होता २०००० रूपये नगदी नफा झालेला आहे. आजच्या घडीला २०००० रूपये किमंतीच्या कोंबडयांचे पशुधन आहे. आज माझ्या जवळ छोटी - मोठी एकुण ७५ नग आहे. आज मला चांगल्या प्रकारे रोजगार मिळाला आहे या उपक्रमासाठी अर्थ सहाय्य दिल्याबद्दल नाबार्ड कार्यक्रमाचा आभारी आहे.

 

आशय लेखक : महेश शेळके (वर्धा)

2.96116504854
vishal itankar Nov 20, 2013 11:16 AM

मला कुकुट पालन व्यवसाय सुरु करायचा आहे मला ब्यान्केकडून किती कर्ज मिळू शकते आणि व्यवसाय सुरु करण्यासाठी किती खर्च लागेल मला व्यवसाय सुरु करण्यासाठी एवढी मदत हवी आहे
माझा पत्ता आत कालंभ पोस्त येरला धोटे
तह काटोल dist नागपूर
email id itankarvishal9 @gmail .com
मो no 98*****53

आपल्या सूचना पोस्ट करा

(वरील विषयासाठी जर तुमच्या काही प्रतिक्रिया किंवा सूचना असतील तर या ठिकाणी नोंदवा)

Enter the word
नेवीगेशन

T5 2019/06/26 17:14:2.903403 GMT+0530

T24 2019/06/26 17:14:2.909456 GMT+0530
Back to top

T12019/06/26 17:14:2.582511 GMT+0530

T612019/06/26 17:14:2.600969 GMT+0530

T622019/06/26 17:14:2.635080 GMT+0530

T632019/06/26 17:14:2.635894 GMT+0530