Skip to content. | Skip to navigation

Vikaspedia


T2 2019/06/17 18:31:44.679687 GMT+0530
मुख्य / शेती / कृषी यशोगाथा / शाश्वत शेती / फायदेशीर व्यावसायिक शेती
शेअर करा

T3 2019/06/17 18:31:44.698261 GMT+0530
Views
  • स्थिती: संपादनासाठी खुला

T4 2019/06/17 18:31:44.778179 GMT+0530

फायदेशीर व्यावसायिक शेती

बाजारपेठेचा अंदाज घेत शेतमाल पिकविण्यावर भर दिला, तर शेती आणि जीवनही कसे समृद्ध होते, याचे मूर्तिमंत उदाहरण पांडव उमरा (ता. जि. वाशीम) येथील साबळे दाम्पत्य ठरले आहे.

‘केल्याने होत आहे रे, आधी केलेचि पाहिजे’ असा विचार संतांनी दिला. त्याच विचारातून प्रेरणा घेत शेतीमध्ये कष्ट उपसणारे पांडव उमरा (ता. जि. वाशीम) येथील साबळे दाम्पत्य आज निराशेच्या गर्तेतून बाहेर पडले आहे. अल्पभूधारक म्हणजे सुमारे तीन एकर क्षेत्रधारक राजू साबळे यांनी गावातील अन्य तीन शेतकऱ्यांच्या मदतीने विहीर खोदली होती. शेतीसाठी लागणाऱ्या पाण्याचे समान वितरण होणे अपेक्षित असताना एकाच शेतकऱ्याला विहिरीचे पाणी कसेबसे पुरायचे. त्यामुळे इतर शेतकऱ्यांची आबाळ होत होती. त्यामुळेच गेल्या वर्षीच्या रब्बी हंगामात अर्धा एकरावर पेरलेला गहू पाण्याअभावी वाळला. त्यामुळे राजू यांनी शेतात पाण्याचा संरक्षित स्त्रोत निर्माण करण्याचा निर्णय घेतला.

शोषखड्ड्याचे केले विहिरीत रूपांतर

राजू यांच्याकडे विहीर खोदण्यासाठी पैसा नव्हता. त्यामुळे पर्यायाच्या शोधात असताना त्यांना स्वयं शिक्षण प्रयोग या स्वयंसेवी संस्थेच्या शोषखड्ड्याविषयी माहिती मिळाली. तीन मीटर खोल व सहा मीटर रुंद आकाराच्या खड्ड्याचे काम करण्यासाठी संस्था २५०० रुपये आकारते. श्रमदानातून हे काम व्हावे असे अपेक्षित असते. कष्ट उपसण्याची तयारी असलेल्या राजू यांनी त्यास तयार दर्शविली. अशासकीय संस्थेकडे त्यांनी त्यानुसार लाभार्थी हिस्सा म्हणून २५०० रुपये दिले. श्रमदानातून खड्डा खोदाईसाठी जेसीबी यंत्राची मदत झाली.

शोषखड्‌डा तर तयार झाला. त्याचे रूपांतर पुढे विहिरीत करण्यासाठी राजू यांनी प्रयत्न केले. त्यासाठी पारंपरिक शेतीतील अर्थार्जनातून गाठीशी जमणारे पैसे राजू यांनी उपयोगात आणले. पत्नीचीही मदत झाली. जेसीबी, श्रमदान या माध्यमातून तीस फूट खोल विहीरच साकारण्यात आली. थोड्याशा प्रयत्नांतून हे मोठे कार्य तडीस गेले, याचा राजू यांना आनंद झाला. आज याच विहिरीतील पाण्याचा उपयोग ते शेतीसाठी करतात. पिकाला पाणी देण्यासाठी अशासकीय संस्थेकडून अनुदानावर तुषार संचाचा पुरवठा होतो. त्याकरिता १७ हजार रुपयांचा लोकवाटा घेतला जातो. ३० पाइप व आठ नोझल दिले जातात. त्यासोबतच कृषी विभागाकडून मिळणाऱ्या अनुदानासाठीही शेतकरी पात्र ठरतात, त्यामुळे अत्यल्प किमतीत तुषार संच मिळतो. साबळे कुटुंबाने या योजनेचा लाभ घेतला.

आठवडी बाजार आणि गावोगावी विक्री !

राजू यांच्याकडे खरिपात सोयाबीन, तूर आदी पिके असतात. त्यानंतर भाजीपाला पिके लावली जातात. भाजीपाला बाजार समितीत नेऊन विकला, तर मनासारखे दर मिळत नाहीत, असे राजू यांच्या पत्नी विद्या सांगतात.  भाजीपाला नाशवंत शेतमाल असल्यामुळे, तो वेळीच विकला गेला नाही, तर नुकसान संभवते. त्यामुळे भाजीपाला पिकांचे विक्री व्यवस्थापन साधता आलेच पाहिजे, त्याशिवाय ही पीक पद्धती फायदेशीर ठरूच शकत नाही, हे त्यांनी मनाशी पक्के बाळगले. जिल्हा किंवा तालुक्‍यातील बाजारात व्यापाऱ्यांना भाजीपाला विकण्याऐवजी आठवडी बाजारात बसून थेट भाजीपाला विक्री करण्यावर या कुटुंबाने भर दिला आहे.

शुक्रवारी पार्डी येथे, तर रविवारी वाशीम आठवडी बाजारात भाजीपाल्याची थेट विक्री केली जाते. आठवडी बाजारात अपेक्षित विक्री न झाल्यास सायकलवर टोपली बांधून लगतच्या खेड्यांमध्येही विक्री केली जाते. त्यामध्ये कोंडाळा, तांदळी, सावंगा, माळेगाव व पांडव उमरा या गावांचा समावेश आहे. शहरात भाजीपाल्याचे दर कितीही वाढत असले तरी, गावपातळीवर त्यात मोठे चढउतार होत नाहीत, असा त्यांचा अनुभव आहे. गावपातळीवर विविध भाजीपाला पिकांना सरासरी ३० ते ४० रुपये प्रतिकिलोचा दर मिळतो, असे त्यांनी सांगितले.

भेंडी, चवळी, गवार, ढेमसे, मिरची आदी विविध प्रकारचा भाजीपाला साबळे कुटुंब घेतात. प्रत्येकी दहा गुंठ्यावर त्यांची लागवड केली जाते. या वर्षी प्रथमच विहिरीच्या पाण्याचा अंदाज घेत त्यांनी भाजीपाला लागवड क्षेत्र निर्धारित केले होते. १० गुंठे क्षेत्रातून त्यांना भेंडीचे दहा क्‍विंटलपर्यंत उत्पादन झाले. सात रुपये प्रतीकिलो दराने गावोगावी विक्री करण्यात आली. भेंडीच्या विक्रीतून सात हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले. उत्पादनखर्च सुमारे दोन हजार रुपये आला.

दहा गुंठे क्षेत्रावरील चवळी उत्पादनासाठी दीड हजार रुपये खर्च, तर तीन हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले. दहा गुंठे क्षेत्रावरील ढेमसे पिकात एक हजार रुपये उत्पादनखर्च, तर विक्रीतून एक हजार ८६२ रुपयांचे उत्पन्न मिळाले.  गवारविक्रीतून चार हजार रुपयांचे अर्थार्जन झाले. मिरची पिकातून सुमारे ५०० रुपयांचे उत्पन्न मिळाले.  साबळे दाम्पत्य दोन एकरांवर सोयाबीन व त्यात तुरीचे आंतरपीक घेतात. सोयाबीनची एकरी उत्पादकता १५ क्विंटलपर्यंत, तर तुरीचे उत्पादन नऊ क्‍विंटलपर्यंत मिळते.  सोयाबीनची विक्री चार हजार रुपये प्रती क्‍विंटल दराने त्यांनी केली आ

- राजू साबळे -९५५२६२०९६४

साबळे दाम्पत्याच्या

शेतीची वैशिष्ट्ये

  • एकूण तीन एकर क्षेत्रापैकी एक एकरावर भाजीपाला लागवड.
  • बाजारात व्यापाऱ्यांना भाजीपाला विकण्याऐवजी जिल्हा व तालुका स्तरावरील आठवडी बाजारात विक्री
  • सायकलवरूनही गावोगावी जाऊन भाजीपाला विक्री.
  • या प्रयत्नांमुळे उत्पन्नाचे मार्जिन वाढले.
  • भाजीपाला पिकांना सरासरी ३० ते ४० रुपये प्रतीकिलो

--------------------------------------------------------------------------------------------

स्त्रोत: अग्रोवन

3.12307692308
आपल्या सूचना पोस्ट करा

(वरील विषयासाठी जर तुमच्या काही प्रतिक्रिया किंवा सूचना असतील तर या ठिकाणी नोंदवा)

Enter the word
नेवीगेशन

T5 2019/06/17 18:31:45.439634 GMT+0530

T24 2019/06/17 18:31:45.446282 GMT+0530
Back to top

T12019/06/17 18:31:44.417529 GMT+0530

T612019/06/17 18:31:44.436379 GMT+0530

T622019/06/17 18:31:44.638423 GMT+0530

T632019/06/17 18:31:44.639473 GMT+0530