Skip to content. | Skip to navigation

Vikaspedia


T2 2019/06/19 06:35:14.305151 GMT+0530
शेअर करा

T3 2019/06/19 06:35:14.310700 GMT+0530
Views
  • स्थिती: संपादनासाठी खुला

T4 2019/06/19 06:35:14.340002 GMT+0530

आठवडी बाजार

नांदेड येथील बुधवारचा आठवडी बाजार. त्या बाजारापासून थोडे दूर मुख्य रस्त्यावर, मे च्या रणरणत्या उन्हात 10 बारा वर्षाचा मुलगा आणि त्याचे वडिल असे दोघेजन ‘ फक्त दहा रूपयात, गोड टरबूज घेवून जा ’ फक्त दहा रूपयात टरबूज....दहा रूपयात टरबूज...’ असे अळीपाळीने हाकारत होते.

नांदेड येथील बुधवारचा आठवडी बाजार. त्या बाजारापासून थोडे दूर मुख्य रस्त्यावर, मे च्या रणरणत्या उन्हात 10 बारा वर्षाचा मुलगा आणि त्याचे वडिल असे दोघेजन ‘ फक्त दहा रूपयात, गोड टरबूज घेवून जा ’ फक्त दहा रूपयात टरबूज....दहा रूपयात टरबूज...’ असे अळीपाळीने हाकारत होते.

समोर ट्रॅक्टरभर हरव्यागार टरबूजांचा ढिग पडलेला होता. लोक उन्हाची परवा न करता दोन, तीन, पाच असे टरबूज विकत घेत होते. त्या प्रत्येकाला टरबूजाच्या गोडी विषयी अर्वजून माहिती बाप-लेक सांगत होते. एखाद्या दुसर्‍याचे टरबूज गडबडीत हातातून पडून फुटले तर त्याला ते म्हणत होते, ‘राहू द्या साहेब, दुसरे बदलून घ्या, हा शेतकर्‍याचा माल आहे , बागवानाचा नाही.’ असे अवर्जून सांगत होते. या दिलदार शेतकर्‍याचे नाव आहे, पुरभाजी माधवराव तिडके, रा. दिग्रस (नांदला) ता. अर्धापूर, जि.नांदेड. सोबत दहा बारा वर्षाचा मुलगा.

व्यवसायाने शेतकरी असलेले पुरभाजी तिडके हे एक प्रयोगशिल शेतकरी आहेत. स्वतःच्या सात एक्कर शेतात त्यांनी दोन बोअर पाडले आहेत. त्यामुळे पाण्याची सोय बर्‍यापैकी आहे. गहू ,ज्वारी, सोयाबीन, ऊस, हळद या सारख्या पारंपारीक पिकांसोबत टरबूजासारखे 75 दिवसाचे उन्हाळी पिक त्यांनी यावर्षी आपल्या शेतातील 30 गुंठे जमीनीवर घेतले आहे. यात त्यांना 75 दिवसात खर्च वजा जाता  1 लाख रूपयांचा निव्वळ नफा मिळाला आहे. फक्त सकाळी 1तास व संध्याकाळी एक तास ठिबकने पाणी देवून त्यांना टरबूजांचा पहिला बहार 18 टन निघाला. तो त्यांनी शेतातून 8.50 प्रति किलो प्रमाणे विकला,  दुसरा बहार 8 टन निघाला आहे.

टरबूजाच्या पहिल्या बहराचा माल वजनाने जास्त भरत होता, पूर्वीचा अनुभव नसल्याने त्याची वाहातून करणे अवघड होते. त्यामुळे त्यांनी तो शेतातून विक्री केला, परंतु दुसर्‍या बहाराचा माल अकाराने लहान असल्याकारणाने त्याला बागवान लोक फूकट भाव मागत होते. इतक्या कष्टाने पिकविलेले टरबूज फुकट भाव बागवानाला द्यायचे आणि तो त्याचे तिप्पट-पाचपट  करून विकणार व भरपूर नफा मिळवणार हे तिडके यांना पटले नाही. त्यामुळे त्यांनी हे टरबूज स्वतःच विकायचा निर्णय घेतला.

आणि मग एक उत्पादक शेतकरी स्वतःच्या मालाचा विक्रेता झाला.

नांदेड हे जिल्हयाचे शहर त्यांना जवळ असल्याने त्यांनी नांदेड येथील आनंदनगर, तरोडा नका या ठिकाणी टिरबूज विक्री सुरू केली. स्वतःच्या मालाची त्यांनी स्वतःच किंमत ठरवून 1 ते 1.5 किलो वजनाच्या टरबूजाचा एक नग 10 रूपये या प्रमाणे त्यांनी विक्रीला सुरूवात केली. ग्राहकांनी त्यांना भरघोस प्रतिसाद दिला. या टरबूजाच्या शेतीमध्ये आलेले यश पाहून तिडके यांनी पुढील वर्षी 1 एक्कर टरबूज आणि एक एक्कर खरबूज लावण्याचे ठरविले आहे. त्या संपूर्ण टरबूज आणि खरबूजाची विक्री े स्वतः करणार असल्याचे ते आत्मविश्‍वासने सांगत होते.

आत्महत्याग्रस्त मराठवाडयातील शेतकरी जोपर्यंत आपल्या उत्पादनाची विक्री आपल्या मनाप्रमाणे भाव ठरवून करणार नाही, तो पर्यंत शेती व्यवसाय व शेतकरी नफ्यात येणार नाही. हे माहित असणारे असंख्य शेतकरी आहेत. पण त्याचे  वास्तवात आणाारे एक उदाहरण म्हणजे पुरभाजी माधवराव तिडके हे आहेत. सध्या अनेक शेतकर्‍यांनी टरबूजाचे पिक घेतले आहे.

परंतु ते आपल्या शेतातून त्यांचा माल 3 ते 8 रूपये किलोने विकत असतानाच पुरभाजी तिडके यांनी आपले टरबूज दहा रूपये किलो या त्यांना परवडणार्‍या भावत विकून भरपूर नफा मिळवून, सर्व टरबूज उत्पादक शेतकर्‍यांन समोर एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे. त्यांचे हे यश सर्व शेतकर्‍यांना प्ररणा देणारेचं आहे. कौतुकास्पद आहे.

लेखक - उन्मेष गौरकर, नांदेड

3.26666666667
आपल्या सूचना पोस्ट करा

(वरील विषयासाठी जर तुमच्या काही प्रतिक्रिया किंवा सूचना असतील तर या ठिकाणी नोंदवा)

Enter the word
नेवीगेशन

T5 2019/06/19 06:35:14.950302 GMT+0530

T24 2019/06/19 06:35:14.956393 GMT+0530
Back to top

T12019/06/19 06:35:13.764846 GMT+0530

T612019/06/19 06:35:13.785303 GMT+0530

T622019/06/19 06:35:14.294318 GMT+0530

T632019/06/19 06:35:14.295431 GMT+0530