Skip to content. | Skip to navigation

Vikaspedia


T2 2019/10/14 06:52:41.927050 GMT+0530
मुख्य / शेती / कृषी यशोगाथा / शाश्वत शेती / आत्मा च्या सहकार्यांने टोमॅटो शेती
शेअर करा

T3 2019/10/14 06:52:41.933028 GMT+0530
Views
  • स्थिती: संपादनासाठी खुला

T4 2019/10/14 06:52:41.970395 GMT+0530

आत्मा च्या सहकार्यांने टोमॅटो शेती

वर्धा जिल्ह्यातील आर्वी तालुक्यात खरिपात प्रामुख्याने कापूस, तूर व सोयाबीन तर रब्बीत गहू, हरभरा ही पिके घेतली जातात.

वर्धा जिल्ह्यातील आर्वी तालुक्यात खरिपात प्रामुख्याने कापूस, तूर व सोयाबीन तर रब्बीत गहू, हरभरा ही पिके घेतली जातात. तालुक्यात सिंचनाच्या मुबलक सोयीसुविधा उपलब्ध असल्या, तरी भाजीपाला पिकाचे क्षेत्र फार कमी प्रमाणात आहे. तालुक्यातील भाजीपाल्याचे मुख्यतः क्षेत्र रोहणा, स्सुलाबाद, सालधरा व परसोडी या गावांत मिरची, वांगी व टोमॅटो ही पिके प्रामुख्याने घेतली जातात. तालुक्यात भाजीपाला पिकाचे क्षेत्र वाढविण्याच्या दृष्टीने व भाजीपाला पिकांवरील मोठ्या प्रमाणात होणा-या रासायनिक कीटकनाशकाचा वापर कमी करण्याकरिता कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा, 'आत्मा’मार्फत सन २०१४-१५ या वर्षात एकात्मिक कोड व रोग व्यवस्थापनाअंतर्गत तालुक्यातील रसुलाबाद या गावाची निवड करून टोमॅटो पिकाचे एकूण २० प्रात्याक्षिके घेण्यात आली.

प्रात्यक्षिकाद्वारे शेतक-यांना मार्गदर्शन

रासायनिक कीटकनाशकांचा वापर कमी करणे, जैविक खते वापरणे तसेच उत्पादनात वाढ करणे आहे, हा प्रात्यक्षिकाचा उद्देश होता. हे प्रात्यक्षिक राबविल्यामुळे शेतक-यांना पिकामधील येणा-या विविध कीड व रोगांवर होणा-या अतिरिक्त खर्चावर उपाययोजना व जैविक कीटकनाशक पुरवठा करून व तज्ज्ञांमार्फत मार्गदर्शन करण्यात आले. ज्यामुळे शेतक-यांच्या भाजीपाला पिकांच्या उत्पादनात वाढ होण्यास व लागवड खर्च कमी करण्यास मोठ्या प्रमाणात मदत झाल्याचे निदर्शनास आले.

उद्दिष्टे

  1. एकात्मिक कोड व रोग व्यवस्थापन शेतक-यांमध्ये प्रचार व प्रसार करणे.
  2. रासायनिक कीटकनाशकांचा वापर कमी करणे.
  3. शेतक-यांना पटवून देणे.
  4. पिकाच्या उत्पादकता व उत्पादनाच्या गुणवत्तेत वाढीबाबत शेतक-यांना मार्गदर्शन.

रसुलाबाद हे गाव वर्धा व पुलगाव मार्केटच्या लगत असल्यामुळे गावातील शेतक-यांचा कल भाजीपाला पीक उत्पादनाकडे सातत्याने वाढत आहे. त्यामुळे कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणे (आत्मा)मार्फत एकात्मिक कोड व रोग व्यवस्थापन विषयावर टोमॅटो पिकाचे प्रात्याक्षिक घेण्याचे नियोजन करण्यात आले. 'आत्मा'अंतर्गत या टोमॅटो प्रात्यक्षिकाला राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स (आर.सी.एफ.) सोबत जोडून संयुक्त प्रात्यक्षिक म्हणून आर.सी.एफ.मार्फत जैविक खतपुरवठा करण्यात आला. या प्रात्यक्षिकाकरिता २o लाभार्थ्यांची निवड केली. त्यांना प्रकल्प संचालक कार्यालय, आत्मा, वर्धामार्फत एकात्मिक कोड व रोग निविष्ठांचा वापर, पाणी व्यवस्थापन, जैविक खतांचा वापर व पिकावरील कोड व रोगांवर तज्ज्ञांकडून शेतक-यांना मार्गदर्शन करण्यात आले.

 

स्त्रोत - कृषी विभाग महाराष्ट्र शासन

 

3.07692307692
आपल्या सूचना पोस्ट करा

(वरील विषयासाठी जर तुमच्या काही प्रतिक्रिया किंवा सूचना असतील तर या ठिकाणी नोंदवा)

Enter the word
नेवीगेशन

T5 2019/10/14 06:52:43.089141 GMT+0530

T24 2019/10/14 06:52:43.096335 GMT+0530
Back to top

T12019/10/14 06:52:41.719244 GMT+0530

T612019/10/14 06:52:41.737938 GMT+0530

T622019/10/14 06:52:41.914997 GMT+0530

T632019/10/14 06:52:41.916026 GMT+0530